Somnath Suryawanshi Case | सुरेश धस यांचा दुटप्पीपणा, विरोधकांचा हल्लाबोल Special Report
दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी परभणी ते मुंबई लॉंग मार्च काढण्यात आला लाँग मार्च नाशिक येथे आला असताना त्या ठिकाणी परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर भाजप आमदार सुरेश धस अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या संदर्भात आश्वासन दिले आणि काही पोलिसांवर कारवाई केली यानंतर हा लॉन्ग मार्ग स्थगित करण्यात आला त्याठिकाणी सुरेश धस यांनी केलेल्या पोलिसांना माफ करण्याच्या वक्तव्यामुळे आता राजकारण चांगलेच तापले आहे पाहूयात एक खास रिपोर्ट….
बरोबर दोन महिन्यांपूर्वीच म्हणजे १० डिसेंबरला परभणीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची विटंबना झाली यानंतर ११ डिसेंबर रोजी परभणी बंदचा आवाहन करण्यात आलं याच बंद दरम्यान काही समाजकंटकांनी जोरदार हिंसा केली पोलिसांनी कारवाई करत अनेकांना अटक केली याच कारवाईदरम्यान न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा 15 डिसेंबर रोजी मृत्यू झाला 16 डिसेंबर रोजी सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर संध्याकाळी याच आंदोलनाचे नेते विजय वाकोडे यांचाही हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला दोन कुटुंबावर आघात झाला प्रकरण देशपातळीवर पोचले विविध ठिकाणी आंदोलन झाली.दोन्ही कुटुंबांना न्याय काही मिळाला नाही.
BYTE:- विजयाबाई सूर्यवंशी सोमनाथची आई
BYTE:- प्रेमानंद सूर्यवंशी सोमनाथचा भाऊ
परभणीत अनेक दिवस धरणे आंदोलन करूनही न्याय मिळत नसल्यामुळे परभणीतील आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी बैठक घेऊन लॉंग मार्च काढण्याचा निर्णय घेतला 17 जानेवारी रोजी परभणीहून हा लॉन्ग मार्च निघाला परभणी जालना संभाजीनगर आणि नाशिक इथपर्यंत 22 दिवसांचा प्रवास करून लॉन्ग मार्च पोहोचला लॉंग मार्च नाशिकला पोहोचल्यानंतर परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर भाजप आमदार सुरेश धस तसेच अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे हे तिथे पोहोचले त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली एक पोलीस उपनिरीक्षक आणि तीन पोलिस अमालदारांना निलंबित करण्यात आले तसेच इतर 14 मागण्या संदर्भातही आश्वासित करण्यात आले यानंतर हा लॉंग मार्क स्थगित करण्यात आला यावेळी बोलताना सुरेश धस यांनी पोलिसांना मोठ्या मनाने माफ करण्याबाबत वक्तव्य केले आणि याच वक्तव्यामुळे आता राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा वादंग निर्माण केलाय..
सुरेश धस यांची ती व्हिडीओ क्लिप
वडेट्टीवार बाईट
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळ काँग्रेसचे नेते विजय वडेंटीवार सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया,rpi सचिन खरात गटाचे सचिन खरात,आंबेडकरी नेते राहुल प्रधान,पॅंथर दिपक केदार यांच्यासह सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनीही सुरेश धस यांच्यावर जोरदार हल्ला केलाय तसेच लॉन्ग मार्च नेतृत्व करणारे आशिष वाकोडे यांनीही यावरून सुरेश धस यांचा निषेध केलाय आम्ही एक महिन्याचा अल्टिमेटम दिला असून जर एक महिन्यात आमच्या उर्वरित मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही पुन्हा एकदा लॉंग मार्च नाशिक ते मुंबई काढू असा इशारा त्यांनी दिलाय
आशिष वाकोडे यांचा बाईट
BYTE:- जितेंद्र आव्हाड नेते राष्ट्रवादी शरद पवार
BYTE:- छगन भुजबळ नेते राष्ट्रवादी अजित पवार
BYTE:- अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्त्या
BYTE:- सचिन खरात नेते RPI सचिन खरात गट
या प्रकरणात आतापर्यंत करण्यात आलेली कारवाई
#१ पोलीस निरीक्षक १ पोलीस उपनिरीक्षक ३ अंमलदार निलंबित एका महिला पोलिसांची मुख्यालयात बदली,
#संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरु
#प्रथम न्यायदंडाधिकारी तेलंगावकर यांच्याकडून चौकशी सुरु आहे.
#सोमनाथच्या कुटुंबियांना १० लाख तर वाकोडेच्या कुटुंबाला ५ लाखांची मदत(दोन्ही कुटुंबीयांनी नाकारली आहे )
एकूणच परभणीतील संविधान शिल्पाची विटंबना त्यानंतर उसळलेली दंगल पोलिसांची कारवाई या सर्व प्रकारानंतर देशपातळीवरील नेते राज्य पातळीवरील विरोधी पक्षाचे सोबतच सत्ताधारी पक्षाचे नेते आले आश्वासन मिळाली मात्र अद्यापही सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांचे कुटुंबीय न्यायापासून वंचित आहे त्या दिवशी पोलिसांवर कारवाई केव्हा होणार तसेच या कुटुंबांचे पुनर्वसन कसं करणार हे प्रश्न मात्र अद्यापही अनुपरीत आहेत नेते मात्र केवळ आरो प्रत्यारोप करण्यात व्यस्त असल्यानेच आता सोमनाथ सूर्यवंशी असो विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांना न्याय केव्हा मिळणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे
All Shows




























