IPL Auction 2025 KL Rahul : CSK, RCB नाही तर... 'या' संघात सामील झाला केएल राहुल; कोट्यवधींचे नुकसान
IPL Auction 2025 KL Rahul : टीम इंडियाचा स्टार आणि IPL मधील लखनऊ सुपर जायंट्सचा माजी कर्णधार केएल राहुल आयपीएल 2025 मध्ये एका नवीन टीमसोबत खेळताना दिसणार आहे.
IPL Auction 2025 KL Rahul : टीम इंडियाचा स्टार आणि IPL मधील लखनऊ सुपर जायंट्सचा माजी कर्णधार केएल राहुल आयपीएल 2025 मध्ये एका नवीन टीमसोबत खेळताना दिसणार आहे. मात्र, तो नवा संघ सीएसके, आरसीबी नाही. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने केएल राहुलला 14 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. राहुलला त्यांच्या मूळ किमतीच्या ७ पट रक्कम दिली. राहुल 2022 मध्ये लखनऊने 17 कोटी मोजले होते. लखनऊ सोडल्यानंतर त्यांचे 3 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पंजाब आणि लखनऊची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राहुलला दिल्लीचे कर्णधारपदही मिळू शकते.
केएल राहुलने 2 कोटी रुपयांच्या मूळ किमतीने लिलावात उतरला होता. गतविजेत्या केकेआरने त्यांच्यासाठी बोली लावली आणि आरसीबीनेही रिंगणात उडी घेतली. राहुलला घेण्यासाठी आरसीबी आणि केकेआरमध्ये स्पर्धा होती. दिल्लीनेही राहुलमध्ये रस दाखवला आणि केकेआरसह बोलीमध्ये सामील झाले. दिल्लीने राहुलसाठी 11.50 कोटी रुपयांची बोली लावली, पण केकेआरही मागे हटायला तयार नव्हते. दिल्लीने राहुलसाठी 12 कोटींची बोली लावली, मग केकेआरने माघार घेतली.
दरम्यान, सीएसकेने बोलीमध्ये उडी घेतली आणि राहुलसाठी बोली लावली. दिल्लीने 14 कोटींची बोली लावली आणि लखनऊने राहुलसाठी आरटीएमचा वापर केला नाही.
He garners interest ✅
— IndianPremierLeague (@IPL) November 24, 2024
He moves to Delhi Capitals ✅#DC & KL Rahul join forces for INR 14 Crore 🙌 🙌#TATAIPLAuction | #TATAIPL | @klrahul | @DelhiCapitals pic.twitter.com/ua1vTBNl4h
गेल्या वर्षी कोलकात्याला चॅम्पियन बनवणाऱ्या श्रेयस अय्यरलाही आयपीएल 2025 च्या लिलावात मोठी रक्कम मिळाली होती. अय्यरला पंजाब किंग्जने 26.75 कोटी रुपयांना विकत घेतले. आता ऋषभ पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. श्रेयस अय्यर हा दुसरा सर्वात महागडा खेळाडू आहे. या दोन्ही खेळाडूंना त्यांच्या संघाने सोडले.
केकेआरने श्रेयस अय्यरला सोडले तर ऋषभ पंतला दिल्ली कॅपिटल्सने सोडले. आता अय्यरला पंजाब किंग्जने 26.75 कोटींना तर ऋषभ पंतला लखनऊने 27 कोटींना विकत घेतले आहे. या दोन्ही खेळाडूंना संघाचे कर्णधारपद मिळू शकते, असे मानले जात आहे.
जोस बटलर 15.75 कोटींना गेला विकला
इंग्लंडचा स्फोटक यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरला विकत घेण्यासाठी अनेक संघांमध्ये चुरस रंगली होती. मात्र, अखेरीस गुजरात टायटन्सने या स्टार सलामीला 15.75 कोटींना विकत घेतले. गेल्या मोसमापर्यंत बटलर राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता. लखनऊ सुपर जायंट्सनेही जोस बटलरला खरेदी करण्यासाठी मोठी बोली लावली. मात्र, अखेरीस बटलरला विकत घेण्यात गुजरातला यश आले. लखनऊने या खेळाडूसाठी 15.25 कोटी रुपयांपर्यंत बोली लावली होती. पण गुजरात टायटन्सने आधीच या खेळाडूला विकत घेण्याचा विचार केल्याचे स्पष्टपणे दिसत होते.