IPL Final : पीटरसन आणि हेडन यांच्याकडून आयपीएल विजेत्याचं नाव जाहीर, जाणून घ्या दिग्गजांचा अंदाज
IPL Finl KKR vs SRH : आयपीएल 2024 ची फायनल चेन्नईत होत असून कोलकाता आणि हैदराबाद आमने सामने येत आहेत. केविन पीटरसन आणि मॅथ्यू हेडन यांनी फायनलमध्ये कोण वरचढ ठरणार हे सांगितलं आहे.
चेन्नई : आयपीएलच्या 17 व्या (IPL 2024 Final) पर्वाचा विजेता काही तासांमध्येच ठरणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sun Risers Hydrabad) आमने सामने येणार आहे. चेन्नईतील चेपॉकवर अंतिम फेरीची लढत होणार आहे. कोलकाता आणि हैदराबाद धमाकेदार कामगिरीच्या जोरावर अंतिम फेरीपर्यंत पोहोचले आहेत. दोन्ही संघ तुल्यबळ असून आयपीएलची ट्रॉफी कोण उंचावणार याबाबत केविन पीटरसन (Kevin Pietersen)आणि मॅथ्यू हेडननं (Matthew Hayden) दावा केला आहे.
मॅथ्यू हेडन आणि केविन पीटरसन यांनी कोलकाता नाईट रायडर्स स्पिन बॉलिंग आणि त्यांच्या हैदराबाद विरुद्धच्या कामगिरीमुळं चांगल्या स्थितीत असल्याचं म्हटलं. केकेआरनं लीग स्टेजच्या बातम्यांमध्ये हैदराबादला पराभूत केलं आहे. हेडननं स्टार स्पोर्टस क्रिकेट लाइव्हमध्ये बोलताना म्हटलं की मला आत्मविश्वास आहे की कोलकाता नाईट रायडर्स इथं जिंकणार आहे. कारण त्यांना काही दिवसांचा आराम मिळाला आहे. या काळात त्यांना सनरायजर्स हैदराबादची बलस्थानं आणि कमजोरी जाणून घ्यायला वेळ मिलेल. केकेआरनं क्वालिफायरमध्ये हैदराबादला पराभूत केलं असून ते चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळं सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्तीची जोडी चांगली कामगिरी करेल, असं हेडननं म्हटलं.
केकेआर का वरचढ ठरणार?
केविन पीटरसनच्या मते केकेआरचं आयपीएल विजेतेपदाची दावेदार आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या मॅचमधील सनरायजर्स हैदराबादची कामगिरी आवडली नसून रविवारी देखील म्हणजेच फायनलमध्ये देखील ते बॅकफूटवर असतील. पॅट कमिन्सनं ट्रेविस हेडला बॉलिंग दिली आणि श्रेयस अय्यरनं धमाल केली. क्वालिफायरमधील विजयानं केकेआरचं मनोबल उंचावलं असेल, असं पीटरसन म्हणाला.
केविन पीटरसन यांनी टॉस महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचं म्हटलं. केकेआरचा संघ सकारात्मक मानसिकतेनं खेळत आहे. त्यामुळं ते सनरायजर्स हैदराबादपेक्षा वरचढ ठरतील. टॉसची भूमिका 50-50 टक्के असेल. ड्यूची शक्यता देखील विचारात घ्यावी लागेल, त्यादृष्टीनं देखील दोन्ही संघांना विचार करावा लागेल. केकेआरची बाजू आत्मविश्वास आणि मानसिकता यामध्ये वरचढ आहे, असं पीटरसननं म्हटलं.
दरम्यान, केकेआरनं आतापर्यंत दोनवेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. तर, सनरायजर्स हैदराबादनं 2016 मध्ये आयपीएलचं विजेतेपद मिळवलं होतं. श्रेयस अय्यर कोलकाताचं तर पॅट कमिन्स सनरायजर्स हैदराबादचं नेतृत्त्व करत आहे.
संबंधित बातम्या :