SRH Predicted XI : 0,1,0,0,0 ट्रेविस हेडचं स्टार्कपुढं लाजिरवाणं रेकॉर्ड, सनरायजर्स हैदराबाद वेगळं पाऊल टाकणार? जाणून घ्या संभाव्य प्लेईंग XI
Sun Risers Hyderabad : सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएलची फायनल होणार आहे.
चेन्नई : आयपीएलच्या फायनलमध्ये (IPL Final 2024) सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स आमने सामने येणार आहेत. सनरायजर्स हैदराबादनं (Sun Risers Hyderabad) ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्माच्या दमदार कामगिरीच्या जोरावर अंतिम फेरीपर्यंत धडक मारली आहे. फायनलमध्ये ट्रेविस हेडपुढं केकेआरच्या मिशेल स्टार्कचं आव्हान असेल. मिशेल स्टार्क (Mitchell Starc) आणि ट्रेविस हेड (Travis Head) यापूर्वी पाचवेळा आमने सामने आले तेव्हा मिशेल स्टार्क वरचढ ठरला आहे. त्यामुळं उद्या होणाऱ्या अंतिम फेरीच्या लढतीत सनरायजर्स हैदराबाद ट्रेविस हेडबाबत वेगळा निर्णय घेणार की त्याच्यावर विश्वास ठेवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आयपीएल फायनलपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाचं ट्विट समोर आलं आहे. ट्रेविस हेड आणि मिशेल स्टार्क यापूर्वी जेव्हा आमने सामने आले तेव्हा काय घडलं ते त्यांनी सांगितलंय. मिशेल स्टार्कनं ट्रेविस हेडला चारवेळा शुन्यावर बाद केलं आहे. तर, एका मॅचमध्ये ट्रेविस हेड एक रन करुन बाद झाला होता. त्यामुळं आयपीएलच्या फायनलमध्ये दोघांमध्ये कोण वरचढ ठरणार हे पाहावं लागेल.
Who's posting this one in the Aussie men's team group chat? 😏
— cricket.com.au (@cricketcomau) May 22, 2024
More here: https://t.co/ehDqno1BCV pic.twitter.com/YdfkebeDNy
पॅट कमिन्स ट्रेविस हेडवर विश्वास ठेवणार?
कोलकाता नाईट रायडर्सच्या मिशेल स्टार्क विरुद्ध ट्रेविस हेड अपयशी ठरला असला तरी पॅट कमिन्स त्याच्यावर विश्वास ठेवण्याची शक्यता आहे. ट्रेविस हेड ऑरेंज कॅपच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे ट्रेविस हेडनं 14 मॅचमध्ये 43.61 च्या सरासरीनं आणि 192.20 च्या स्ट्राइक रेटनं 567 धावा केल्या आहेत. त्यामुळं सनरायजर्स हैदराबादसाठी ट्रेविस हेड महत्त्वाचा खेळाडू आहे.
सनरायजर्स हैदराबादचा संभाव्य संघ :
पॅट कमिन्स (कॅप्टन), ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, हेनरिच क्लासेन (विकेटकीपर), एडन मार्क्रम, नितीशकुमार रेड्डी, अब्दुल समद, शाहबाझ अहमद, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन
इम्पॅक्ट प्लेअर : जयदेव उनाडकट, उमरान मलिक, विजयकांत व्यास, ग्लेन फिलिप्स
सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील लढतीत कोण बाजी मारणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
हैदराबादला दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याची संधी?
सनरायजर्स हैदराबादनं 2016 मध्ये आयपीएलचं विजेतेपद पटकावलं होतं. आता पॅट कमिन्सच्या नेतृत्त्वात सनरायजर्स हैदराबादनं अंतिम फेरीत धडक दिलीय. विजेतेपदापासून ते केवळ एक पाऊल दूर आहेत. उद्या होणाऱ्या अंतिम फेरीच्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत केल्यास ते दुसऱ्यांदा विजेतेपदावर नाव कोरु शकतात. मात्र, बलाढ्य कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करणं हैदराबाद साठी सोपी गोष्ट असणार नाही.
संबंधित बातम्या :