एक्स्प्लोर

Virat Kohli:विराट कोहलीच्या विकेटचं प्रकरण पेटलं, मोहम्मद कैफ मैदानात उतरला,अम्पायरिंगवर सडकून टीका, हर्षित राणाला माफी मागण्याचा सल्ला

KKR vs RCB: IPL मध्ये विराट कोहलीला 36 व्या मॅचमध्ये ज्या प्रकारे विराट कोहलीला बाद दिलं गेलं. त्यानंतर जे घडलं त्यावरुन निर्माण झालेला वाद काही थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत.

Virat Kohli No-ball Controversy कोलकाता : आयपीएलमध्ये काल कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) यांच्यात मॅच पार पडली. कोलकाता नाईट रायडर्सनं एका रननं ही मॅच जिंकली. हर्षित राणाच्या (Harshit Rana) ओव्हरमध्ये विराट कोहलीला (Virat Kohli ) बाद देण्यात आलं. या निर्णयाला विराटनं आव्हान दिलं होतं, मात्र थर्ड अम्पायरनं पंचांचा निर्णय कायम ठेवला. यानंतर विराट कोहलीनं मैदानावरील पंचांसोबत वाद घातला होता. विराट कोहलीला या प्रकरणी मॅच फीसच्या 50 टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला आहे. विराट कोहलीनं अम्पायरसोबत वाद घातला हे चुकीचं असल्याचं माजी क्रिकेटपटू इरफान पठाणनं म्हटलं होतं. मात्र, मोहम्मद कैफ विराट कोहलीच्या बाजूनं उभा राहिला आहे. मोहम्मद कैफ आयपीएलमधील अम्पायरिंगवर प्रश्न उपस्थित केले आहेत. याशिवाय एक व्हिडीओ जारी करुन विराटला पाठिंबा देत हर्षित राणाला विराट कोहलीची माफी मागण्याचा सल्ला दिलाल आहे.  

मोहम्मद कैफ भडकला

विराट कोहलीच्या नो-बॉल वादावर मोहम्मद कैफनं दोन पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केल्या आहेत.यामध्ये एका पोस्टमध्ये व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्यानं म्हटलंय की एका बॉलरकडे फलंदाजाला बाद करण्यासाठी एका बॉलवर 10 पर्याय उपलब्ध असतात. तुम्ही ज्यावेळी 6 बॉल टाकता त्यावेळी फलंदाजाला बाद करण्यासाठी 60 संधी असतात. आऊट ऑफ मोडच्या नियमांचं पुस्तक पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल तुम्ही फलंदाजाला एका बॉलवर  10 वेळा बाद करु शकता.  

मोहम्म्द कैफ म्हणाला, विराट कोहली आता आऊट झाला आहे. त्याला बीमरवर आऊट दिलं गेलं आहे, हा अतिशय खराब निर्णय आहे. बीमर तुम्ही कसा कंट्रोल करणार कारण तो बॉल टाकणं वैध नाही, त्या बॉलसाठी कोणताही खेळाडू तयार नसतो. विराट कोहलीला अम्पायरनं आऊट दिलं तो अतिशय खराब निर्णय होता.  

टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूनं हर्षित राणाला देखील खडे बोल सुनावले आहेत. कैफ म्हणाला की  हर्षित राणानं विराट कोहलीची माफी मागितली पाहिजे. हर्षितनं माफी मागत हातातून बॉल सुटला म्हणत माफी मागायला हवी. कोहलीनं थोडं उंचावर खेळून कॅच दिला. फलंदाज नेहमी बॉल पिचिंग लाईनमध्ये पडून कुठं येतोय हे पाहत असतो. बीमर बॉलसाठी फलंदाज तयार नसतो. पंचांनी विराट कोहलीला बाद दिलं हा चुकीचा निर्णय होता, असं कैफ म्हणाला.  

विराट कोहलीला कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील मॅचमध्ये आरसीबीच्या डावाच्या तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर बाद देण्यात आलं होतं. हर्षित राणानं कोहलीला फुल टॉस टाकला होता. विराटनं तो  बॉल मारला आणि हर्षित राणानं कॅच घेतला. विराट कोहली त्यावेळी क्रीजच्या बाहेर असल्यानं तो बॉल नो दिला गेला नाही. या नियमावरुन वाद निर्माण झाला आहे.  

आयसीसीचा नियम काय सांगतो?

आयसीसीच्या नियमानुसार, खेळाडूच्या कमरेच्या ऊंचीच्या वर बॉल असेल आणि तो जमिनीवर पडत नसेल तर नो बॉल मानला जातो. मात्र, त्यावेळी फलंदाज क्रीजमध्ये असणं आवश्यक असतं.  

संबंधित बातम्या :

MI vs RR Live Score IPL 2024 : मुंबई पराभवाचा वचपा काढणार की राजस्थान विजयाचा ट्रेंड कायम ठेवणार, जयपूरमध्ये हाय व्होल्टेज लढत  

RR vs MI Weather Report: मुंबईकडे राजस्थानचा हिशोब चुकता करण्याची संधी, पाऊस खेळ बिघडवणार का? वाचा वेदर रिपोर्ट

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

व्हिडीओ

Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Smriti Mandhana First Appearance : मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडत नाही,स्मृती मानधना स्पष्ट बोलली
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
Aaditya Thackeray With Amit Thackerays Son : अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
Embed widget