IPL 2024: IPLमध्ये दोन खेळाडूंनी संघाच्या मालकांना लावला चूना; एका धावेसाठी 2.4 कोटी रुपये मोजावे लागले!
IPL 2024: आयपीएल 2024 च्या हंगामात दोन खेळाडूंमुळे फ्रँचायझीचे मोठे नुकसान झाले आहे.
IPL 2024: कोलकाता नाइट रायडर्सचा (KKR) गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc) आजपर्यंतच्या आयपीएलच्या इतिहासात सगळ्यात महागडा खेळाडू ठरला. कोलकाता नाइट रायर्डने मिचेल स्टार्कला मिनी लिलावात 24.75 कोटी रुपयांना खरेदी केले होते. परंतु सुरुवातीच्या सामन्यात मिचेल स्टार्कने चांगली गोलंदाजी केली नाही. यामुळे मिचेल स्टार्कला ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागला. मात्र प्ले ऑफच्या फेरीत मिचेल स्टार्कने अचूक गोलंदाजी करत टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले.
आयपीएल 2024 च्या हंगामात दोन खेळाडूंमुळे फ्रँचायझीचे मोठे नुकसान झाले आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या कुमार कुशाग्र आणि लखनौ सुपर जायंट्सच्या देवदत्त पडिक्कलबद्दल आयपीएल 2024 मध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरले होते. पडिक्कलने संपूर्ण हंगामात केवळ 38 धावा केल्या, तर कुशाग्राला केवळ 3 धावा करता आल्या. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी 7 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीत खरेदी करण्यात आले.
कुमार कुशाग्रच्या प्रत्येक धावेची किंमत 2.4 कोटी रुपये-
कुमार कुशाग्राला आयपीएल 2024 च्या मिनी लिलावात दिल्ली कॅपिटल्सने 7.20 कोटी रुपयांना विकत घेतले. दिल्लीने त्याला एकूण तीन संधी दिल्या, ज्यात त्याने केवळ 3 धावा केल्या. अशाप्रकारे दिल्लीला कुशाग्रच्या प्रत्येक धावाची किंमत 2.4 कोटी रुपये मोजावी लागली.
देवदत्त पडिक्कलच्या एका धावाची किंमत 20 लाख रुपये-
देवदत्त पडिक्कल गेल्या हंगामापर्यंत राजस्थान रॉयल्सचा भाग होता. पण मिनी लिलावात त्याला लखनौ सुपर जायंटसच्या ताफ्यात दाखल झाला. तर आवेश खान लखनौहून राजस्थानला आला. देवदत्तची पडिक्कल फलंदाजी दमदार होईल या आशेने लखनौने त्याचा समावेश केला होता, पण तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. पडिक्कलने आयपीएल 2024 मध्ये 7 सामने खेळले, ज्यात त्याने केवळ 38 धावा केल्या. अशा प्रकारे पडिक्कलच्या एका रनसाठी लखनौला सुमारे 20 लाख रुपये मोजले.