SRH vs KKR : यंदाच्या आयपीएल ट्रॉफीवर कुणाचं नाव? सुरेश रैनानं फायनलमधील 'एक्स फॅक्टर' सांगत दिलं मोठं उत्तर
SRH vs KKR : कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद आज आयपीएल फायनलच्या निमित्तानं आमने सामने येणार आहेत. त्यापूर्वीच सुरेश रैनानं विजेतेपदाबाबत भाष्य केलं आहे.
Suresh Raina On SRH vs KKR Final चेन्नई : आयपीएल 2024 (IPL 2024 Final) च्या फायनलमध्ये सनरायजर्स हैदराबाद (Sun Risers Hyderabad) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders)आमने सामने येणर आहेत. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात अंतिम फेरीची लढत आज सायंकाळी साडे सात वाजता सुरु होईल. ही मॅच चेन्नईच्या चेपॉक स्टेडिमयवर होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं 2012 आणि 2014 मध्ये विजेतेपद मिळवलेलं आहे. आता दहा वर्षानंतर ते तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्यासाठी लढत आहेत. दुसरीकडे हैदराबादची जुनी फ्रँचायजी डेक्कन चार्जर्सनं 2008 मध्ये विजेतेपद मिळवलेलं आहे. तर, सनरायजर्स हैदराबादनं 2016 मध्ये विजेतेपद पटकावलं होतं. आता केकेआर आणि हैदराबाद विजेतेपद मिळवण्याच्या इराद्यानं मैदानात उतरणार आहेत. या पार्श्वभूमीवर सनरायजर्स हैदराबाद यंदाचं आयपीएल जिंकणार असा दावा टीम इंडियाचा आणि चेन्नई सुपर किंग्जचा माजी खेळाडू, मिस्टर आयपीएल अशी ओळख असलेल्या सुरेश रैनानं केला आहे.
'सनरायजर्स हैदराबादची चॅम्पियन होण्याची शक्यता अधिक...'
सुरेश रैनाच्या मते सनरायजर्स हैदरबाद आयपीएलचं चॅम्पियनपद पटकावण्याची शक्यता अधिक आहे. याचं कारण पॅट कमिन्स असून त्यानं कॅप्टन म्हणून वर्ल्ड कप जिंकला आहे. मोठ्या मॅचमध्ये ड्रेसिंग रुममध्ये वातावरण चांगलं कसं ठेवायचं हे त्याला माहिती आहे. आयपीएल फायनल सारख्या मोठ्या मॅचेसमध्ये प्रत्येक खेळाडूला आपली भूमिका आणि जबाबदारी माहिती असली पाहिजे. जर, असं असेल तर तुमची कामं सोपी होतात, असं सुरेश रैनानं म्हटलं. सुरेश रैनानं सनरायजर्स हैदराबादनं त्यांची बलस्थानं ओळखून खेळलं पाहिजे. सनरायजर्स हैदराबादचं बलस्थान फलंदाजी आहे. त्यामुळं सनरायजर्स हैदराबादला टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करणं आवश्यक आहे, असं सुरेश रैनानं म्हटलं.
सनरायजर्स हैदराबादनं पहिल्यांदा फलंदाजी करणं आवश्यक
सुरेश रैनानं आयपीएलच्या फायनलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबादनं पहिल्यांदा फलंदाजी करावी. यावेळी त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यात यश आल्यास याचा दबाव श्रेयस अय्यरच्या टीमवर राहील. सनरायजर्स हैदराबादचे फलंदाज सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती यांची बॉलिंग कशी खेळते हे पाहणं महत्त्वाचं असेल, असं रैना म्हणाला. या दोघांच्या 8 ओव्हर आयपीएल फायलनमध्ये महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहेत. पॅट कमिन्सचा अनुभव पाहता सनरायजर्स हैदराबादची स्थिती मजबूत आहे, असं सुरेश रैनानं म्हटलं.
सुरेश रैनानं सनरायजर्स हैदराबादला आयपीएलच्या विजेतेपदाचं प्रबळ दावेदार म्हटलंय. तर, कोलकाता नाईट रायडर्स प्रबळ दावेदार असल्याचं केविन पीटरसन आणि मॅथ्यू हेडननं म्हटलंय.
संबंधित बातम्या :