IPL 2024: Shahrukh Khan Viral Video: क्लासेनच्या खेळीची चर्चा होत असताना शाहरुख खानचा Video व्हायरल; VIP बॉक्समध्ये त्याने काय केलं?
IPL 2024: Shahrukh Khan Viral Video: क्लासेनच्या आक्रमक खेळीची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु असताना बॉलिवूड अभिनेता आणि कोलकाता संघाचा मालक शाहरुख खानचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.
IPL 2024: Shahrukh Khan Viral Video: कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sunrise Hydrabad) यांच्यात काल (शनिवारी) झालेल्या सामन्यात कोलकाताने विजय मिळवला. कोलकाताने पहिली फलंदाजी करताना हैदराबादला 208 धावांचे लक्ष्य दिले होते. हेन्रींक क्लासेन याने धडाकेबाज अर्धशतकी खेळी केल्यानंतरही सनरायजर्स हैदराबादला अवघ्या चार धावांनी निसटता पराभव पत्करावा लागला. याचदरम्यान हेन्रींक क्लासेनच्या आक्रमक खेळीची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु असताना बॉलिवूड अभिनेता आणि कोलकाता संघाचा मालक शाहरुख खानचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये शाहरुख खान ईडन्स गार्डन मैदानाच्या व्हीआयपी बॉक्समध्ये धूम्रपान करताना दिसत आहे. शाहरुख खानच्या या व्हिडिओवरून विविध चर्चा रंगत आहे. तसेच सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून शाहरुख खानचा चांगलाच समाचार घेतला जात आहे. शाहरुख खानच्या धूम्रपानच्या या व्हिडिओवरुन नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. अलीकडेच पाकिस्तान सुपर लीगमध्येही असेच दृश्य पाहायला मिळाले. पाकिस्तान सुपर लीगमधील लाइव्ह मॅचदरम्यान इमाद वसीम ड्रेसिंग रूममध्ये सिगारेट ओढताना दिसला होता, त्यानंतर मोठा वाद झाला होता.
srk is smoking 🚭 in the stadium #KKRvsSRH pic.twitter.com/YPfr8ISDsF
— Yasir dar (@yaasir_hameed) March 23, 2024
...अन् केकेआरचा विजय निश्चित झाला-
कोलकाताने दिलेल्या 209 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या हैदराबाद संघाचे सलामीवीर मयंक अग्रवाल (32 धावा) व अभिषेक शर्मा (32 धावा) यांनी संघासाठी चांगली सुरुवात करुन दिली. मात्र मयंक आणि अभिषेक बाद झाल्यानंतर हैदराबादने ठरावीक अंतराने विकेट्स गमावल्या. हैदराबादची 5 विकेट्स वर 145 धावा असताना हेन्रींक क्लासेनने 29 चेंडूत 63 धावा केल्या. यामध्ये त्याने 8 षटकार लगावून हैदराबादला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र हर्षित राणाच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. कोलकाताकडून इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरलेल्या सुयश शर्माने अप्रितिम झेल घेत क्लासेनला माघारी पाठवले आणि कोलकाताचा विजय निश्चित झाला.
शेवटच्या षटकाचा थरार-
19.1- 20व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर क्लासेनने षटकार ठोकला.
19.2- दुसऱ्या चेंडूवर क्लासेनने धाव घेतली.
19.3- तिसऱ्या चेंडूवर हर्षितने शाहबाजला (१६) श्रेयस अय्यरकडे झेलबाद केले.
19.4- नवीन फलंदाज यानसेनने चौथ्या चेंडूवर एक धाव घेतली.
19.5- पाचव्या चेंडूवर हर्षितने क्लासेनला सुयशकरवी झेलबाद केले. क्लासेनने 29 चेंडूत 8 षटकारांच्या मदतीने 63 धावांची खेळी केली.
19.6- शेवटच्या चेंडूवर पाच धावांची गरज होती आणि कमिन्स स्ट्राइकवर होता. मात्र, स्लोअर वनवर कमिन्सचा फटका चुकला आणि कोलकाताने चार धावांनी विजय मिळवला.
संबंधित बातम्या-