IPL 2024: अहमदाबादमध्ये क्वालिफायर अन् एलिमिनेटरचा सामना; IPLच्या महाअंतिम सामन्याचं ठिकाणही आलं समोर!
IPL 2024 Final Venue: बीसीसीआयने सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा लक्षात घेऊन उर्वरित आयपीएलचे वेळापत्रक निश्चित केले आहे आणि लवकरच ते जाहीर केले जाईल.
IPL 2024: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2024) चा अंतिम सामना 26 मे रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर रंगणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पहिला क्वालिफायर सामना आणि एक एलिमिनेटरचा सामना तर दुसरा क्वालिफायर सामना चेन्नईमध्ये होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने गतवर्षीच्या गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जच्या घरच्या मैदानावर सुरुवातीचा सामना आणि अंतिम सामना आयोजित करण्याची परंपरा राखली असल्याचं म्हटलं आहे. तसेच आयपीएलचे 7 एप्रिल पर्यंतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बीसीसीआयने सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा लक्षात घेऊन उर्वरित आयपीएलचे वेळापत्रक निश्चित केले आहे आणि लवकरच ते जाहीर केले जाईल.
CHEPAUK TO HOST THE FINAL OF IPL 2024. [PTI]
— Johns. (@CricCrazyJohns) March 23, 2024
- Narendra Modi Stadium will host 1 Qualifier & 1 Eliminator while Chepauk will host 1 Qualifier. pic.twitter.com/CwTb8nhycd
पाहा IPL 2024 वेळापत्रक-
22 मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, रात्री 8 वा.पासून, चेन्नई
23 मार्च - पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वा. पासून, मोहाली
23 मार्च - कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, रात्री 8 वा. पासून, कोलकाता
24 मार्च - राजस्थान रॉयल्स वि. लखनौ सुपर जायंट्स, दुपारी 3.30 वा.पासून, जयपूर
24 मार्च - गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री 8 वा. पासून, अहमदाबाद
25 मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्स, रात्री 8 वा. पासून, बंगळुरू
26 मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स, रात्री 8 वा.पासून, चेन्नई
27 मार्च - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, रात्री 8 वा. पासून, हैदराबाद
28 मार्च - राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स, रात्री 8 वा. पासून, जयपूर
29 मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री 8 वा. पासून, बंगळुरू
30 मार्च - लखनौ सुपर जायंट्स वि. पंजाब किंग्स, रात्री 8 वा. पासून, लखनौ
31 मार्च - गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद, दुपारी 3.30 वा. पासून, अहमदाबाद
31 मार्च - दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, रात्री 8 वा. पासून, विशाखापट्टणम
1 एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, रात्री 8 वा. पासून, मुंबई
2 एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. लखौ सुपर जायंट्स, रात्री 8 वा. पासून, बंगळुरू
3 एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री 8 वा. पासून, विशाखापट्टणम
4 एप्रिल - गुजरात टायटन्स वि. पंजाब किंग्स, रात्री 8 वा. पासून, अहमदाबाद
5 एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू,रात्री 8 वा. पासून, जयपूर
6 एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वा.पासून, मुंबई
7 एप्रिल - लखनौ सुपर जायंट्स वि. गुजरात टायटन्स, रात्री 8 वा. पासून, लखनौ