IPL 2024, RR vs GT : आरसीबीविरुद्ध शतक, शुभमन गिलचा बटलरसाठी विशेष प्लॅन, राशिदच्या पहिल्याच ओव्हरमध्ये गेम
RR vs GT : राजस्थान रॉयल्सनं यंदाच्या आयपीएलमध्ये सलग चार मॅचमध्ये विजय मिळवला आहे. आज शतकवीर जोस बटलर मोठी खेळी करु शकला नाही.
जयपूर : आयपीएलच्या 17 (IPL 2024) व्या पर्वात सलग चार मॅचमध्ये विजय मिळवणाऱ्या राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) सामना 2022 च्या आयपीएलच्या पर्वाचं विजेतेपद पटकावणाऱ्या गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात आज मॅच सुरु आहे. गुजरात टायटन्सचा कॅप्टन शुभमन गिल यानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. राजस्थानच्या सलामी जोडीनं सावध सुरुवात केली. मात्र, राजस्थानचे दोन्ही सलामीवर चांगली कामगिरी करु शकले नाहीत. यशस्वी जयस्वालला सूर गवसणार असं वाटत असताना तो 24 धावा करुन बाद झाला. दुसरीकडे आरसीबी विरुद्ध 20 ओव्हर बॅटिंग करणारा जोस बटलर (Jos Butler) मोठी खेळी करेल, अशी आशा असताना राशिद खाननं (Rashid Khan) राजस्थानला धक्का दिला. गेल्या मॅचमध्ये शतक झळकवणारा जोस बटलर यावेळी मोठी धावसंख्या उभारु शकला नाही.
राशिद खानसमोर शतकवीर बटलर फेल
राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील मॅचमध्ये 100 धावांची खेळी करणारा शतकवीर जोस बटलर फेल ठरला. जोस बटलर यशस्वी जयस्वाल बाद झाल्यानंतर मोठी खेळी करेल, अशी आशा असताना त्याला राशिद खाननं जाळ्यात अडकवलं. राशिद खाननं पहिल्याच ओव्हरमध्ये जोस बटलरला बाद केलं. बटलर राशिद खानला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला.
यशस्वी जयस्वालला सूर गवसला असं वाटलं पण...
मराठमोळा फलंदाज आणि राजस्थान रॉयल्सचा ओपनर यशस्वी जयस्वालनं यापूर्वीच्या चार मॅचमध्ये 39 धावा केल्या होत्या. आजच्या मॅचमध्ये यशस्वी जयस्वालला सूर गवसला आहे असं वाटत असताना तो उमेश यादवला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. उमेश यादवची ती आयपीएलमधील 200 वी विकेट ठरली. यशस्वी जयस्वालनं आज 24 धावा केल्या.
राशिद खानचं कमबॅक
गुजरात टायटन्सचा कॅप्टन शुभमन गिलनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. गुजरातच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच राजस्थान रॉयल्सला मोठे फटके मारु दिले नाहीत. गुजरातचा प्रमुख गोलंदाज राशिद खानला यापूर्वीच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी करता आली नव्हती. आज मात्र, पहिल्याच ओव्हरमध्ये राशिद खाननं जोस बटलरला बाद करुन राजस्थानवर दबाव निर्माण केला. राशिद खाननं तीन ओव्हर्समध्ये 1 विकेट घेत 13 धावा दिल्या.
Edged and taken!
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2024
That's a sharp catch from Rahul Tewatia as #RR lose Jos Buttler ☝️
Rashid Khan strikes ⚡️⚡️
Watch the match LIVE on @JioCinema and @StarSportsIndia 💻📱#TATAIPL | #RRvGT pic.twitter.com/TQ4m8GWxaa
आज कोण जिंकणार?
राजस्थान रॉयल्सनं यंदाच्या आयपीएलमध्ये सलग चार सामन्यांमध्ये विजय मिळवला असून ते गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहेत. दुसरीकडे गुजरात टायटन्स सध्या सातव्या स्थानावर आहे. गुजरातचा आजची मॅच जिंकून गुणतालिकेत वरच्या स्थानावर झेप घेण्याचा प्रयत्न असेल.
संबंधित बातम्या :
Rohit Sharma : मुंबई इंडियन्सनं रोहित शर्माचा तो व्हिडीओ शेअर केला अन् अफवांचं पेव फुटलं, काय घडलं?