Rohit Sharma : मुंबई इंडियन्सनं रोहित शर्माचा तो व्हिडीओ शेअर केला अन् अफवांचं पेव फुटलं, काय घडलं?
Rohit Sharma : मुंबई इंडियन्सचा प्रमुख खेळाडू रोहित शर्मा संदर्भात नवनवे दावे सुरु आहेत. मुंबई इंडियन्सनं शेअर केलेल्या व्हिडीओचा आधार घेत काही नेटकऱ्यांनी दावे केले आहेत.
मुंबई : मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) पहिल्या तीन सामन्यातील पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध पहिला विजय मिळवला. मुंबई इंडियन्सनं टीमला पाचवेळा विजेतेपद मिळवून देणाऱ्या रोहित शर्माऐवजी (Rohit Sharma) हार्दिक पांड्याकडे नेतृत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. मुंबईच्या या निर्णयांमुळं चाहत्यांमध्ये मात्र नाराजी दिसून आली होती. हार्दिक पांड्यांच्या (Hardik Pandya) नेतृत्त्वात पहिल्या तीन मॅचमध्ये मुंबईला पराभव स्वीकारावा लागला होता. गुजरात टायटन्स, सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सकडून मुंबईला पराभव स्वीकारावा लागला होता. मुंबई इंडियन्सच्या पहिल्या तीन मॅच ज्या ठिकाणी झाल्या होत्या त्या ठिकाणी प्रेक्षकांनी शेरेबाजी केली होती. मुंबईनं 7 एप्रिलला वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केलं होतं. या मॅचच्या संदर्भात मुंबई इंडियन्सनं रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्या व्हिडीओनंतर रोहित शर्माबाबत नव्यानं अफवांचं पेव फुटलंय.
मुंबई इंडियन्सनं शेअर केलेल्या व्हिडिओत नेमकं काय?
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सची मॅच वानखेडे स्टेडियमवर 7 एप्रिलला झाली होती. या मॅचपूर्वी म्हणजेच 6 एप्रिलला मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा, दिल्लीचा कॅप्टन रिषभ पंत आणि दिल्ली कॅपिटल्सचे मालक पार्थ जिंदाल दिसत आहेत. त्या व्हिडिओत तिघेजण काही तरी बोलत असल्याचं पाहायला मिळतं. हा व्हिडिओ मुंबईकडून शेअर करण्यात आल्यानंतर काही सोशल मीडिया अकाऊंटसवरुन नवनवे दावे करण्यात येत आहेत.
ʜᴇ𝗥𝗢𝗣𝗔𝗡𝗧𝗜 🥹#MumbaiMeriJaan #MumbaiIndians | @ImRo45 @RishabhPant17 pic.twitter.com/7jBnEezvE1
— Mumbai Indians (@mipaltan) April 6, 2024
रोहित शर्माबद्दल काय दावे करण्यात आले?
सोशल मीडियावरील एका यूजरनं दिल्ली कॅपिटल्सनं रोहित शर्माला संघात येण्याची ऑफर दिली असून ती त्यानं मान्य केल्याचा दावा केला आहे. आणखी एका नेटकऱ्यानं पार्थ जिंदाल यांनी रोहित शर्मानं जर आमच्या फ्रंचायजीसाठी पाच ट्रॉफी जिंकल्या असत्या तर फिरोज शाह कोटला स्टेडियमचं नाव बदलून रोहित शर्मा स्टेडियम करणार असं म्हटल्याचा दावा केला. सोशल मीडिया यूजर्सनी काहीही दावे केले असले तरी यामध्ये तथ्य आढळून येत नाही. या केवळ सोशल मीडियावरील अफवा आहेत. अद्याप रोहित शर्मा किंवा पार्थ जिंदाल यांनी यासंदर्भातील कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
Parth Jindal, DC co-owner 🎙️
— Selfless⁴⁵ (@SelflessCricket) April 9, 2024
"If Rohit had won 5 trophies for our franchise, we would have renamed Feroz Shah Kotla Stadium to Rohit Sharma Stadium."
Something big cooking between Rohit and DC. 🔥 pic.twitter.com/HzKnhIbmIV
मुंबईचा पहिला विजय, उद्या आरसीबी विरुद्ध लढणार
मुंबई इंडियन्सनं पहिल्या तीन मॅचमधील पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सवर पहिला विजय मिळवला आहे. मुंबईला गुजरात टायटन्स, सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्या विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. पहिल्या तीन सामन्यातील पराभवादरम्यान हार्दिक पांड्याला चाहत्यांच्या रोषाला देखील सामोरं जावं लागलं होतं. मुंबईनं वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मॅचमध्ये दिल्लीला पराभूत केलं होतं. त्या मॅचमध्ये रोमारियो शेफर्डनं केलेली फटकेबाजी मुंबईसाठी फायदेशीर ठरली होती. उद्या मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यात लढत होणार आहे.
संबंधित बातम्या :
IPL 2024 : आज कुणावर पैज लावणार? या 11 खेळाडूंना निवडा, मालामाल व्हाल!
हार्दिक पांड्याला टी 20 विश्वचषकात डच्चू ? माजी निवड समिती अध्याक्षांचं मोठं वक्तव्य