IPL 2024 : रोहितमुळेच वाचलं होतं हार्दिक पांड्याचं करियर, मुंबई दाखवणार होती बाहेरचा रस्ता
IPL 2024 : मुंबई इंडियन्सनं आयपीएल 2024 पूर्वी हार्दिक पांड्याला कर्णधार करत मोठा निर्णय घेतला. मुंबईने अनुभवी रोहित शर्माला काढत हार्दिककडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली.
Hardik Pandya IPL 2024 : मुंबई इंडियन्सनं आयपीएल 2024 पूर्वी हार्दिक पांड्याला कर्णधार करत मोठा निर्णय घेतला. मुंबईने अनुभवी रोहित शर्माला काढत हार्दिककडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली. रोहित शर्मानं मुंबईला पाचवेळा जेतेपद मिळवून दिलं. रोहित शर्मानं मुंबईचा संघ उभारला. अनेक युवांना हाताशी धरत अशक्य विजय मिळवून दिले. एकवेळ अशी आलेली की, मुंबईने हार्दिक पांड्याला संघातून काढण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यावेळी रोहित शर्मानं कर्णधार म्हणून हार्दिक पांड्यावर विश्वस दाखवला. त्यामुळेच हार्दिक पांड्याचे करियर झालं. रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्याबद्दल पार्थिव पटेल यानं महत्वाची प्रतिक्रिया दिली.
पार्थिव पटेल यानं एका मुलाखतीदरम्यान हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराहच्या करिअरवर आणि रोहित शर्माच्या नेतृत्वावर मन की बात केली. पार्थिव पटेल म्हणाला की, "मुंबई इंडियन्स जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांना संघातून काढण्याच्या तयारीत होती. पण रोहित शर्माने वाचवलं. "
पार्थिव पटेल म्हणाला की, "2015 मध्ये हर्दिक पांड्याचं नाव झालं होतं. पण 2016 आयपीएल हंगाम पांड्यासाठी खराब गेला. जेव्हा तुम्ही अनकॅप खेळाडू असता तेव्हा संघाकडून लगेच रिलिज केले जाते. 10 लाखांचा प्लेअर आहे, पुन्हा लिलावात घेऊ, अशी भूमिका संघाची असते. पण रोहित शर्माने त्यावेळी हार्दिक पांड्यावर विश्वास दाखवला. त्यामुळे मुंबईने हार्दिक पांड्याला कायम ठेवलं. "
He also talked about Hardik Pandya and even Jos Buttler, why don't you post the whole statement? @CricCrazyJohns https://t.co/3aEYgOIkgb pic.twitter.com/2j2bgOoM4J
— Serah (@Iwillhuntuhdown) March 14, 2024
रोहित शर्माचं कौतुक करताना आकाश चोप्रा म्हणाला की, रोहित शर्माच्या नेतृत्वत अनेक मोठे खेळाडू तयार झाले. जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि ईशान किशन यासारखा संघ रोहित शर्माने स्वत: तयार केला आहे.
रोहितमुळे जसप्रीत बुमराहचं करियर झालं -
जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्स संघाचा महत्वाचा सदस्य आहे. पण मुंबई इंडियन्स 2013 मध्ये जसप्रीत बुमराहला बाहेरचा रस्ता दाखवणार होतं. पण त्यावेळी रोहित शर्मामुळे मुंबईने जसप्रीत बुमराहला संघात कायम ठेवलं होतं. पार्थिव पटेल यानं जिओ सिनेमावर जसप्रीत बुमराह याच्याबद्दल वक्तव्य केले. पार्थिव म्हणाला की, "मुंबई इंडियन्सचा टीम मॅनेजमेंट 2015 मधील जसप्रीत बुमराहच्या कामगिरीवर समाधानी नव्हतं. त्यावेळी त्याला संघातून वगळण्याचा निर्णय घेतला होता. पण रोहित शर्मानं जसप्रीत बुमराहवर विश्वास दाखवला. त्यामुळे मुंबईने त्याला संघात कायम ठेवलं. "
जसप्रीत बुमराह याला रोहित शर्मामुळे मुंबईच्या संघात खेळण्याची संधी मिळाली. मुंबई इंडियन्स जसप्रीत बुमराहला आयपीएल हंगाम सुरु असतानाच बाहेरचा रस्ता दाखवणार होतं. पण रोहित शर्मानं बचाव केला. दरम्यान, याबाबत रोहित शर्मा अथवा जसप्रीत बुमराह यांच्याकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आले नाही.