राजस्थानचा पहिला पराभव, गुजरातची मोठी उडी, गुणतालिकेत मोठा फेरबदल!
Ipl 2024 Points Table : शुभमन गिलच्या गुजरात टायटन्सने संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सचा विजयरथ रोखला. गुजरातने राजस्थानचा तीन विकेटने पराभव केला. यंदाच्या हंगामातील राजस्थानचा हा पहिलाच पराभव ठरला.
![राजस्थानचा पहिला पराभव, गुजरातची मोठी उडी, गुणतालिकेत मोठा फेरबदल! IPL 2024 Points Table Gujarat Titans rise to 6th spot after win over table-toppers Rajasthan Royals राजस्थानचा पहिला पराभव, गुजरातची मोठी उडी, गुणतालिकेत मोठा फेरबदल!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/11/1c3a91513fb7b7f2331048f773404fa51712791270522872_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ipl 2024 Points Table : शुभमन गिलच्या गुजरात टायटन्सने संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सचा विजयरथ रोखला. गुजरातने राजस्थानचा तीन विकेटने पराभव केला. यंदाच्या हंगामातील राजस्थानचा हा पहिलाच पराभव ठरला. गुणतालिकेत राजस्थानच्या संघ अद्यापही अव्वल स्थानावर विराजमान आहे. पण गुजरातच्या संघाने मोठी झेप घेतली आहे. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर झालेल्या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करत 196 धावांपर्यंत मजल मारली होती, प्रत्युत्तरदाखल गुजरातने हे आव्हान अखेरच्या चेंडूवर तीन विकेट राखून पार केले. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या राशीद खान याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. राशीने गोलंदाजीमध्ये 4 षटकात फक्त 18 धावा खर्च करत दोन विकेट घेतल्या. तर फलंदाजीमध्ये त्याने 11 चेंडूमध्ये नाबाद 24 धावांची खेळी केली. शुभमन गिलच्या गुजरातचा सहा सामन्यात तिसरा विजय ठरला.
टॉप 4 ची स्थिती कशी ?
गुणतालिकेत राजस्थानचा संघ अव्वल स्थानावर आहे. राजस्थानने पाच सामन्यात चार विजय मिळवत आठ गुणांची कमाई केली आहे. यंदाच्या हंगामात राजस्थानला पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. श्रेयस अय्यरचा कोलकाता नाइट रायडर्स गुणतालिकेत तीन विजयासह दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. लखनौ आणि चेन्नई हे संघ अनक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर विराजमान आहेत. लखनौनं चार सामन्यात तीन विजय मिळवले आहेत, तर चेन्नईनेही तीन विजय मिळवले आहेत. पण लखनौचा रनरेट सरस आहे, त्यामुळे ते गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
पंजाबची घसरण, गुजरातला फायदा -
पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील हैदराबाद संघाने मंगळवारी पंजाबवर दोन धावांनी थरारक विजय मिळवला. हैदराबादने पाच सामन्यात तीन विजय मिळवलेत, तर दोन सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. हैदराबादच्या नावावरही सहा गुणांची नोंद आहे. हैदराबादचा संघ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर विराजमान आहे. गुजरातने राजस्थानचा पराभव करत सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. गुजरातच्या नावावर सहा सामन्यात सहा गुण जमा झाले आहेत. गुजरातच्या विजयाचा फटका पंजाबला बसला आहे. पंजाबचा संघ सातव्या क्रमांकावर फेकला गेलाय. शिखर धवनच्या नेतृत्वातील पंजाबला पाच सामन्यात तीन पराभवाचा सामना करावा लागला. चार गुणांसह ते सातव्या स्थानी आहेत.
दिल्ली तळाला, मुंबई-आरसीबीची स्थिती काय?
दिल्ली आणि आरसीबी संघाची स्थिती यंदाच्या हंगामात अतिशय खराब आहे. दोन्ही संघाला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. दिल्ली आणि आऱसीबीला आतापर्यंत चार पराभवाचा सामना करावा लागलाय. दोन्ही संघाचा फक्त एक एक विजय झाला आहे. दिल्ली दहाव्या तर आरसीबी नवव्या स्थानावर आहे. तर मुंबई आठव्या स्थानी आहे. मुंबईला चार सामन्यात फक्त एक विजय मिळवता आलाय. आज मुंबई आणि आरसीबी यांच्यामध्ये वानखेडेवर आमनासामना होणार आहे, आजच्या सामन्यातील विजेता संघ गुणतालिकेत मोठी झेप घेईल.
IPL Point Table
अनुक्रमांक | संघ | सामने | विजय | टाय | पराभव | गुण | नेटरनरेट |
---|---|---|---|---|---|---|---|
1. |
राजस्थान रॉयल्स
RR
|
5 | 4 | 0 | 1 | 8 | 0.871 |
2. |
कोलकाता नाइट रायडर्स
KKR
|
4 | 3 | 0 | 1 | 6 | 1.528 |
3. |
लखनौ सुपर जायंट्स
LSG
|
4 | 3 | 0 | 1 | 6 | 0.775 |
4. |
चेन्नई सुपर किंग्स
CSK
|
5 | 3 | 0 | 2 | 6 | 0.666 |
5. |
सनरायजर्स हैदराबाद
SRH
|
5 | 3 | 0 | 2 | 6 | 0.344 |
6. |
गुजरात टायटन्स
GT
|
6 | 3 | 0 | 3 | 6 | -0.637 |
7. |
पंजाब किंग्स
PBKS
|
5 | 2 | 0 | 3 | 4 | -0.196 |
8. |
मुंबई इंडियन्स
MI
|
4 | 1 | 0 | 3 | 2 | -0.704 |
9. |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
RCB
|
5 | 1 | 0 | 4 | 2 | -0.843 |
10. |
दिल्ली कॅपिटल्स
DC
|
5 | 1 | 0 | 4 | 2 | -1.370 |
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)