सॉल्टची जागा कोण घेणार ? हैदराबादविरोधात कोलकात्याची संभाव्य प्लेईंग 11
KKR vs SRH Qualifier 1 : रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात 21 मे 2024 रोजी क्वालिफायर 1 सामना होत आहे. फलंदाजी हे दोन्ही संघाची ताकद आहे.
Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad Qualifier 1 : दोन महिन्यानंतर आयपीएल 2024 प्लेऑफच्या सामन्याला सुरुवात होत आहे. 21 मे 2024 रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात क्वालिफायर 1 सामना होत आहे. फलंदाजी हे दोन्ही संघाची ताकद आहे. त्यामुळे या सामन्यात धावांचा पाऊस पडू शकतो. मंगळवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियवर कोलकाता आणि हैदराबाद यांच्यात आमनासामना होणार आहे.
फिलिप सॉल्टची जागा कोण घेणार ?
इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज फिलिप सॉल्ट मायदेशी परतला आहे. सॉल्ट यानं यंदाच्या हंगामात कोलकात्याला आक्रमक सुरुवात दिली होती. प्लेऑफमध्ये त्याची कमी कोलकात्याला नक्कीच जाणवेल. कोलकात्याकडे सॉल्टची रिप्लेसमेंट आहे, त्याच्यासारखाच तो आक्रमक फलंदाजी करतो. अफगाणिस्तानचा सलामी फलंदाज रहमानुल्लाह गुरबाज याला कोलकात्याकडून संधी मिळू शकते. सुनील नारायण आणि गुरबाज कोलकात्याकडून डावाची सुरुवात करु शकतात.
तिसऱ्या क्रमांकावर नितीश राणा, चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर, पाचव्या क्रमांकावर वेंकटेश अय्यर, सहाव्या क्रमांकावर आंद्रे रसेल, रिंकू सिंह सातव्या स्थानावर येईल, तर आठव्या क्रमांकावर रमनदीप असेल. त्यानंतर गोलंदाजीमध्ये मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा असतील. कोलकात्याची फलंदाजी खोलवर आहे. आठव्या क्रमांकापर्यंत कोलकात्याचे फलंदाज आहेत. फलंदाजी हीच कोलकात्याची मोठी ताकद आहे.
क्वालीफायर 1 सामन्यासाठी कोलकात्याची संभाव्य प्लेईंग 11
रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), सुनील नारायण, वेंकटेश अय्यर, नितीश राणा, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमनदीप सिंह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि मिचेल स्टार्क. [इम्पॅक्ट सब: वैभव अरोरा]
सनराइजर्स हैदराबाद : ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, नीतीश रेड्डी, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), सनवीर सिंह, भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत [इम्पॅक्ट सब: टी नटराजन]
क्वालिफायरसाठी राखीव दिवस नाही -
आयपीएल 2024 फायनलसाठी फक्त राखीव दिवस ठेवण्यात आलाय. प्लेऑफच्या इतर कोणत्याही सामन्यासाठी आयपीएलकडून राखीव दिवस ठेवण्यात आला नाही. क्वालीफायर 1, एलिमेनेटर आणि क्वालिफायर 2 या सामन्यासाठी राखीव दिवस नाही. पावसाचा व्यत्यय आला तर कमीत कमी पाच षटकांचा समाना होईल. जर पाच षटकांचा सामना होणार नसेल तर सुपर ओव्हर घेत निकाल लावला जाईल. जर सुपर ओव्हरही होत नसेल तर गुणतालिकेतील अव्वल स्थानावर असणाऱ्या संघाला विजयी घोषित करण्यात येईल.
आणखी वाचा :