अभिषेक पोरेलचा इम्पॅक्ट, 10 चेंडूत सामना फिरवला, दिल्लीचं पंजाबपुढे 175 धावांचं आव्हान
IPL 2024 PBKS vs DC : शाय होप आणि अभिषेक पोरेल यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर दिल्लीने निर्धारित 20 षटकात 9 विकेटच्या मोबदल्यात 174 धावांपर्यंत मजल मारली. दिल्लीकडून अभिषेक पोरेल यानं 10 चेंडूमध्ये 32 धावांची खेळी केली. पंजाबला विजयासाठी 20 षटकात 175 धावांचं आव्हान आहे.
![अभिषेक पोरेलचा इम्पॅक्ट, 10 चेंडूत सामना फिरवला, दिल्लीचं पंजाबपुढे 175 धावांचं आव्हान IPL 2024 PBKS vs DC Impact Player Abhishek Porels cameo of 32 in 10 balls takes Delhi Capitals to 174 in 20 overs अभिषेक पोरेलचा इम्पॅक्ट, 10 चेंडूत सामना फिरवला, दिल्लीचं पंजाबपुढे 175 धावांचं आव्हान](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/23/671ef6171580238195b6474848c72ac21711193585284732_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IPL 2024 PBKS vs DC : शाय होप आणि अभिषेक पोरेल यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर दिल्लीने निर्धारित 20 षटकात 9 विकेटच्या मोबदल्यात 174 धावांपर्यंत मजल मारली. दिल्लीकडून अभिषेक पोरेल यानं 10 चेंडूमध्ये 32 धावांची खेळी केली. पंजाबला विजयासाठी 20 षटकात 175 धावांचं आव्हान आहे.
अभिषेक पोरेल यानं अखेरच्या षटकात वेगवान धावा जमवल्या, त्यामुळे दिल्लीच्या संघाला सन्माजनक धावसंख्या उभारता आली. झटपट विकेट पडल्यामुळे दिल्लीने अभिषेक पोरेल याला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरवलं होतं. त्यानं आपला इम्पॅक्ट दाखवून दिला. अभिषेक पोरेल यानं हर्षल पटेलच्या अखेरच्या षटकात 25 धावा वसूल केल्या. त्यामुळेच दिल्लीचा संघ 170 पार पोहचू शकला.
ABHISHEK POREL, THE IMPACT PLAYER...!!!! 🔥
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 23, 2024
31* (10) - 4,6,4,4,6,1 in the final over against Harshal Patel. What a finish provided by the impact player, he took Delhi Capitals to a great total. 👏 pic.twitter.com/0sb4tuv0ww
पंजाबचा कर्णधार शिखर धवन यानं नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदीजी कऱण्याचा निर्णय घेतला. मिचेल मार्श आणि डेविड वॉर्नर यांनी शानदार सुरुवात केली. दोघांनी पंजाबची गोलंदाजी फोडली. पण दिल्लीने ठरावीक अंतराने विकेट फेकल्या. मिचेल मार्श 12 चेंडूमध्ये 20 धावा काढून माघारी परतला. मिचेल मार्श आणि डेविड वॉर्नर यांनी पहिल्या विकेटसाठी 3.2 षटकात 39 धावांची भागिदारी केली. मिचेल मार्श यानं आपल्या छोटेखानी खेळीमध्ये दोन चौकार आणि दोन षटकार ठोकले. मिचेल मार्शनंतर डेविड वॉर्नरही ठरावीक अंतरानंतर तंबूत परतला. वॉर्नरने 21 चेंडूत 29 धावांचे योगदान दिले. यामध्ये तीन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.
ऋषभ पंतचं कमबॅक -
सलामीची जोडी तंबूत परतल्यानंतर शाय होफ आणि कर्णधार ऋषभ पंत यांनी दिल्लीच्या डावाला आकार दिला. पंतने जवळपास दीड वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर कमबॅक केले. पंत आणि शाय होप यांनी वेगानं धावा जमवण्यास सुरुवात केली. खासकरुन होफ यानं पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. शाय होप यानं 25 चेंडूत 33 धावांचं योगदान दिलं. यामध्ये दोन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. दुखापतीनंतर पुन्हा मैदानावर कमबॅक करणाऱ्या पंतला चांगली सुरुवात मिळाली, पण मोठी खेळी करण्यात अपयश आले. पंतला फक्त 18 धावाच करता आल्या. पंतने या खेळीमध्ये दोन चौकार ठोकले.
AN EMOTIONAL MOMENT FOR CRICKET FANS...!!!!
— Johns. (@CricCrazyJohns) March 23, 2024
- WELCOME BACK, PANT. ❤️pic.twitter.com/0FSOSaaWNF
रिकी भुई आणि ट्रिस्टन स्टब्स यांना मोठी खेळी करता आली नाही. रिकी भुई 3 तर स्टब्स पाच धावा काढून बाद झाले. दोघांनी मोक्याच्या क्षणी विकेट फेकल्या. अक्षर पटेल याने आक्रमक फलंदाजी करत धावसंख्या वाढवली. अक्षर पटेलने 13 चेंडूमध्ये 21 धावांची महत्वाची खेळी केली. यामध्ये दोन चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.
पंजाबची गोलंदाजी -
अर्शदीप सिंह याने 4 षटकात 28 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. कगिसो रबाडा,हरप्रीत ब्रार, राहुल चाहर यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. हर्षल पटेल यालाही दोन विकेट मिळाल्या.
पंजाब किंग्सचे 11 शिलेदार :
शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम कुरन, ऋषी धवन/ हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग.
दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात आज कोण कोण? :
पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार), अक्षर पटेल, ललित यादव, कुमार कुशाग्रा/अभिषेक पोरेल (विकेटकीपर), कुलदीप यादव, मुकेश कुमार, एनरिक नॉर्टजे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)