एक्स्प्लोर

एमएस धोनीचा आयपीएलमधील हा शेवटचा हंगाम होता?; वीरेंद्र सेहवाग अन् मोहम्मद शमी काय म्हणाले?, पाहा

आयपीएल 2024 चा हंगाम हा एमएस धोनीचा (MS Dhoni) शेवटचा हंगाम होता,असं बोललं जात आहे.

IPL 2024 MS Dhoni: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (RCB) आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. चेन्नई सुपर किंग्जला बंगळुरुनं 27 धावांनी पराभूत केलं. आरसीबीला प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासठी चेन्नईवर 18 धावांनी विजय मिळवणं आवश्यक होतं. अखेरच्या ओव्हरमध्ये चेन्नईला प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी 17 धावांची गरज होती. बंगळुरुच्या यश दयालने एक विकेट घेत केवळ 7 धावा दिल्या आणि बंगळुरुचा प्ले ऑफमधील प्रवेश निश्चित केला.

आयपीएल 2024 चा हंगाम हा एमएस धोनीचा (MS Dhoni) शेवटचा हंगाम होता,असं बोललं जात आहे. बंगळुरुविरुद्ध धोनीने शेवटचा सामना खेळला. आता लवकरच धोनी निवृत्तीची घोषणा करणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.  धोनीला या हंगामाच्या सुरुवातीपासूनच गुडघ्याचा त्रास आहे. धोनी या त्रासामुळेच वरच्या क्रमांकावर बॅटिंगला आला नाही. धोनीला धावतानाही त्रास जाणवला. त्यामुळे निवृत्तीच्या चर्चांना आणखी जोर वाढला. मात्र चेन्नई आणि धोनीकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. याचदरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग आणि भारतीय संघाचा खेळाडू मोहम्मद शमीने यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

वीरेंद्र सेहवाग काय म्हणाला?

गेल्या दोन वर्षांपासून आपण याच विषयावर बोलत आहोत, की धोनीचा शेवटचा हंगाम असेल. यावेळी देखील आयपीएल 2024 च्या हंगामातील धोनीचा बंगळुरुविरुद्धचा सामना अंतिम होता, असं बोलत आहेत. मी आधी म्हटलं होतं की, धोनी या आयपीएलमध्ये याबाबत घोषणा करेल आणि हसत-हसत निवृत्ती घेईल. मात्र चेन्नईने प्ले ऑफमध्ये स्थान मिळवलं नसलं तरी धोनी चांगलं क्रिकेट खेळलं आहे. त्यामुळे धोनी पुढील वर्षी आला तर त्याला शुभेच्छा आणि आयपीएलमध्ये नाही आला, तर त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असल्याचं वीरेंद्र सेहवागने सांगितले. पण मला असं वाटतं धोनीचा हा शेवटचा हंगाम होता, असं सेहवान म्हणाला. 

मोहम्मद शमी काय म्हणाला?

एमएस धोनी अचानक कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. पण मला देखील यावर्षी वाटलं होतं की हा धोनीचा आयपीएलमधील शेवटचा हंगाम असले. परंतु धोनीने ज्या प्रकारे क्रिकेट खेळले, ते पाहून वाटत नाही तो निवृत्तीचा निर्णय घेईल. धोनी क्रिकेट खेळून इन्जॉय करतोय, असं मोहम्मद शमीने सांगितले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget