IPL 2024 MI vs RR : मराठमोळ्या यशस्वी जयस्वालचा मुंबई इंडियन्सला दणका, राजस्थान रॉयल्सचा मुंबईवर 9 विकेटनं दणदणीत विजय
IPL 2024 : आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स आमने सामने आले होते. मुंबईनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 9 विकेटवर 179 धावा केल्या होत्या.
जयपूर :आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात मॅच सुरु आहे. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या यानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबई इंडियन्सनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 9 विकेटवर 179 धावा केल्या. मुंबईसाठी तिलक वर्मा आणि नेहाल वढेरानं चांगली फलंदाजी केली. राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलरनं चांगली सुरुवात केली होती. पावसामुळं बराच वेळ खेळ थांबवावा लागला होता. यशस्वी जयस्वालनं 31 बॉलमध्ये अर्धशतक केलं. त्यानंतर यशस्वी जयस्वालनं फलंदाजीचा गियर बदलला. यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसननं शतकी भागिदारी केली. यशस्वी जयस्वालनं देखील महत्त्वाच्या मॅचमध्ये 59 बॉलमध्ये शतक झळकवलं. त्यानं 104 धावा करत राजस्थानला विजय मिळवून दिला. राजस्थाननं मुंबईला 9 विकेटनं पराभूत केलं.
पावसानंतर मॅच सुरु होताच जोस बटलर दुसऱ्या ओव्हरमध्ये पियुष चावलानं जोस बटलरला बाद केलं. जोस बटलर आणि यशस्वी जयस्वालनं पहिल्या विकेटसाठी 74 धावांची सलामीची भागिदारी केली. यानंतर फलंदाजीला आलेल्या कॅप्टन संजू सॅमसननंन देखील जोरदार फटकेबाजीला सुरुवात केली. त्यानंही मोठे फटके मारले. हार्दिक पांड्याच्या बॉलिंगवर टिम डेव्हिडनं संजू सॅमसनचा कॅच सोडला. त्यापूर्वी नेहाल वढेरानं देखील एक कॅच सोडला होता. यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसननं अर्धशतकी भागिदारी केली . राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसननं देखील यशस्वी जयस्वालला चांगली साथ दिली. सॅमसननं 2 सिक्स आणि 2 चौकार मारत 38 धावांची संयमी खेळी केली. राजस्थान रॉयल्सनं 8 पैकी 7 मॅचमध्ये विजय मिळवत 14 गुणासंह गुणतालिकेत पहिला क्रमांक कायम ठेवला आहे.
मुंबई इंडियन्सचा डाव नेहाल वढेरा आणि तिलक वर्मानं सावरला
हार्दिक पांड्यानं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण मुंबईसाठी तो फायदेशीर ठरला नाही. रोहित शर्मा 6 आणि ईशान किशन शुन्यावर बाद झाला. सूर्यकुमार यादव देखील आज चांगली कामगिरी करु शकला नाही. सूर्यकुमार यादवनं 10 धावा केल्या. यानंतर मोहम्मद नबीनं तिलक वर्माच्या साथीनं मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोहम्मद नबी 23 धावा करुन बाद झाला.
यानंतर नेहाल वढेरा आणि तिलक वर्मानं 99 धावांची भागिदारी करुन मुंबईचा डाव सावरला. नेहाल वढेरानं 4 सिक्स आणि 3 चौकारांच्या जोरावर 49 धावा केल्या. दुसरीकडे तिलक वर्मानं देखील 3 सिक्स आणि 5 चौकारांच्या मदतीनं 65 धावा केल्या.
मुंबईचा कॅप्टन हार्दिक पांड्या आजदेखील अपयशी ठरला. हार्दिक पांड्या 10 धावा करुन बाद झाला. टीम डेविड 3 धावा करुन बाद झाला. गेराल्ड कोत्जी शुन्यावर बाद झाला. तर पियुष चावलानं 1 तर जसप्रीत बुमराहनं 2 धावा केल्या.
संबंधित बातम्या :