Mitchell Starc : कोलकाताचं गणित फसलं, मिशेल स्टार्कची एक विकेट 4 कोटींना पडली, हर्षित राणा ठरला केकेआरसाठी ट्रम्प कार्ड
IPL 2024 : आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडे सर्वात महागडा खेळाडू मिशेल स्टार्क आहे. मिशेल स्टार्कसाठी केकेआरनं 24.75 कोटी रुपये मोजले होते.
नवी दिल्ली:आयपीएलच्या 2024 हंगामातील 37 मॅच पूर्ण झालेल्या आहेत. आयपीएलच्या 17 व्या पर्वाचा अर्धा प्रवास पूर्ण झाला आहे. यामुळं विविध खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा घेण्यास सुरुवात झाली आहे. आयपीएलच्या संघमालकांनी ज्या खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात पैसे लावले ते चांगली कामगिरी करु शकलेले नाहीत. दुसरीकडे ज्या भारतीय खेळाडूंना काही लाखांमध्ये घेतलेलं आहे त्यांनी अप्रतिम कामगिरी केलेली आहे. मिशेल स्टार्क आणि कॅमरुन ग्रीन या दोघांना कोट्यवधी रुपयांचा खर्च करुन खरेदी करण्यात आलं मात्र दोघांनाही त्यानुसार कामगिरी करता आली नाही. कोलकातासाठी मिशेल स्टार्क आणि आरसीबीसाठी कॅमरुन ग्रीन चांगली कामगिरी करु शकला नाही.
कोलकाता नाईट रायडर्सनं ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कला संघात घेण्यासाठी 24.75 कोटी रुपये मोजले होते. मिशेल स्टार्कनं कोलकाताला अभिप्रेत असलेली कामगिरी केलेली नाही. मिशेल स्टार्कनं आतापर्यंत 7 मॅचमध्ये 6 विकेट मिळाल्या आहेत. आता आयपीएलचा अर्धा प्रवास पूर्ण झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्ससाठी मिशेल स्टार्कनं काढलेली एक विकेट चार कोटी रुपयांची ठरली आहे.
कोलकाता नाईट रायडर्समध्ये असे काही खेळाडू आहेत, ज्यांना कोलकातानं काही लाख रुपयांमध्ये खरेदी केलं होतं. हर्षित राणाला 20 लाख रुपयांना कोलकातानं खरेदी केलं होतं. हर्षित राणानं 6 मॅचमध्ये 9 विकेट घेतल्या आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या मॅचमध्ये श्रेयस अय्यरनं मिशेल स्टार्क ऐवजी हर्षित राणावर विश्वास दाखवला. मिशेल स्टार्कला श्रेयस अय्यरनं शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलिंग दिली होती. यामध्ये मिशेल स्टार्कला कर्ण शर्मानं तीन सिक्स मारले होते.
यंदाच्या आयपीएलमध्ये मिशेल स्टार्कनं 25 ओव्हर टाकल्या असून त्यानं 6 विकेट घेतल्या आहेत. मिशेल स्टार्कनं 287 धावा दिल्या आहेत. दुसरीकडे हर्षित राणानं 20 ओव्हर टाकल्या असून त्यानं 9 विकेट घेतल्या आहेत. मिशेल स्टार्क यंदाच्या आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू आहे. पर्पल कॅपच्या शर्यतीत मिशेल स्टार्क खूप पिछाडीवर आहे. कोलकाता नाईट रायडर्ससाठी हर्षित राणा आंद्रे रसेल, सुनील नरेन यांनी प्रत्येकी 9 विकेट घेतल्या आहेत. वरुण चक्रवर्तीनं 8 आणि वैभव अरोरानं 7 विकेट घेतल्या आहेत. तर, मिशेल स्टार्कनं 6 विकेट घेतल्या आहेत.
गुणतालिकेत केकेआर दुसऱ्या स्थानी
कोलकाता नाईट रायडर्सनं गुणतालिकेत दुसरा क्रमांक मिळवला आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं सात पैकी पाच मॅचमध्ये विजय मिळवला आहे. तर, त्यांना दोन पराभवांना सामोरं जावं लागलं आहे.
संबंधित बातम्या :
Video : जोरात बॅट झटकली, अम्पायरवर गेला धावून, आऊट दिल्यानं विराट खवळला; मैदानातच रागराग!