IPL 2024 Marathi News KKR vs PBKS: दोघांनी धावून एक रन पूर्ण केला, अंपायरने मात्र तो फेटाळला; गौतम गंभीर मैदानाबाहेर भिडला, Video
IPL 2024 Marathi News KKR vs PBKS: पंजाब आणि कोलकाताच्या सामन्यादरम्यान केकेआर संघाचा मेंटॉर गौतम गंभीर आणि अंपायरमध्ये काही शाब्दिक वाद झाल्याची पाहायला मिळालं.
IPL 2024 Marathi News KKR vs PBKS: पंजाब किंग्सने (PBKS) चौकार-षटकारांचा वर्षाव झालेल्या सामन्यात विश्वविक्रमी विजय मिळवताना कोलकाता नाइट रायडर्सचा (KKR) 8 गड्यांनी बाद 261 धावा पराभव केला. कोलकाताने 20 षटकांत 6 उभारल्यानंतर पंजाबने 18.4 षटकांत 2 बाद 262 धावा केल्या. यासह पंजाबने टी-20 इतिहासात सर्वात मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला.
पंजाब आणि कोलकाताच्या सामन्यादरम्यान केकेआर संघाचा मेंटॉर गौतम गंभीर आणि अंपायरमध्ये काही शाब्दिक वाद झाल्याची पाहायला मिळालं. क्रिकेटच्या खेळात प्रत्येक धावाला एक महत्व असते. सरतेशेवटी पंजाब किंग्सने सामना जिंकला असला, तरी विजय-पराभवामध्ये एका धावेचा फरक असण्याचीही शक्यता होती. यामुळेच केकेआरला अंपायरने एक धावा न मिळाल्याने गौतम गंभीर संतापल्याचे पाहायला मिळाला.
नेमकं काय घडलं?
14व्या षटकांत कोलकाता नाइट रायडर्स संघ 12 पेक्षा जास्त धावगतीने फलंदाजी करत होता. आंद्रे रसेल आणि व्यंकटेश अय्यर मैदानावर होते. षटकमधील शेवटच्या चेंडूवर आंद्रे रसेलने राहुल चहरविरुद्ध कव्हर शॉट खेळला. तिथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या आशुतोष शर्माने चेंडू उचलून यष्टिरक्षकाच्या दिशेने फेकला. थ्रो यष्टिरक्षकापासून दूर होता आणि याचदरम्यान रसेल आणि अय्यर एक धाव पळून काढली. मात्र त्यानंतरही केकेआरला ही एक धाव मिळाली नाही.
— Bangladesh vs Sri Lanka (@Hanji_CricDekho) April 26, 2024
गंभीरचा अंपायरसोबत वाद-
कोलकाता नाइट रायडर्सला एक धावा देण्यास अंपायरने नकार दिला कारण मैदानावरील पंचाने थ्रो होण्यापूर्वीच षटक संपल्याचा इशारा केला होता. रसेल आणि अय्यरने काढलेली ही एक धाव अंपायरने फेटाळली. याचाच राग गौतम गंभीरला आला. ताबडतोब आपल्या जागेवरून उठून तो चौथ्या पंचाकडे गेला आणि आपली नाराजी व्यक्त केली. मात्र, त्यानंतरही केकेआरला ही एक धाव मिळाली नाही.
— Bangladesh vs Sri Lanka (@Hanji_CricDekho) April 26, 2024
पंजाबने ऐतिहासिक धावांचा केला पाठलाग
इडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाब किंग्सने ऐतिहासिक धावांचा पाठलाग करत विजयाची नोंद केली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाइट रायडर्स संघाने 20 षटकात 6 गडी गमावून 261 धावा केल्या. संघासाठी फिलिप सॉल्टने 37 चेंडूत 75 धावांची तर सुनील नरेनने 32 चेंडूत 71 धावांची जलद खेळी खेळली. सॉल्टने 6 चौकार आणि 6 षटकार मारले, तर नरेनने 9 चौकार आणि 4 षटकार मारले. पंजाब किंग्जने लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरले आणि 262 धावांचे ऐतिहासिक लक्ष्य 18.4 षटकात 2 गडी राखून पार करून विजयाची नोंद केली. पंजाबकडून सलामी देणाऱ्या जॉनी बेअरस्टोने 48 चेंडूंत 8 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने 108 धावा केल्या. याशिवाय शशांक सिंगने 28 चेंडूत 2 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने नाबाद 68 धावा केल्या. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी केली.
संबंधित बातम्या:
IPL 2024: आयपीएलमधील या चीअरलीडरच्या सौंदर्याची सर्वांना भुरळ; फोटो पाहून नेटकरी प्रेमात