पंजाबच्या विजयाने मुंबई अन् बंगळुरुचा मार्ग खडतर; पाहा आयपीएलचे Latest Points Table
IPL 2024 Latest Points Table Marathi News: पंजाबच्या या विजयानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत चुरस आणखी वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
![पंजाबच्या विजयाने मुंबई अन् बंगळुरुचा मार्ग खडतर; पाहा आयपीएलचे Latest Points Table IPL 2024 Latest Points Table Marathi News: RCB & MI at the bottim of the ipl points table पंजाबच्या विजयाने मुंबई अन् बंगळुरुचा मार्ग खडतर; पाहा आयपीएलचे Latest Points Table](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/27/bbbc97c35e787864ba84eb95df6cf6761714195723029987_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IPL 2024 Latest Points Table Marathi News: पंजाब किंग्स (PBKS) चौकार-षटकारांचा वर्षाव झालेल्या सामन्यात विश्वविक्रमी विजय मिळवताना कोलकाता नाइट रायडर्सचा (KKR) 8 गड्यांनी बाद 261 धावा पराभव केला. कोलकाताने 20 षटकांत 6 उभारल्यानंतर पंजाबने 18.4 षटकांत 2 बाद 262 धावा केल्या. यासह पंजाबने टी-20 इतिहासात सर्वात मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला.
पंजाबच्या या विजयानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत (IPL 2024 Latest Points Table) चुरस आणखी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. राजस्थानचा संघ अजूनही अव्वल स्थानी कायम आहे. राजस्थानने 8 सामन्यात 7 विजय मिळवले आहे. तर एका सामन्यात पराभव झाला आहे. राजस्थानचे सध्या 14 गुण आहे. कोलकाता नाइट रायडर्स 10 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोलकाताने 8 सामन्यात 5 विजय मिळवले आहेत. तर हैदराबाद आणि लखनौचा संघही 10 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
चेन्नई सुपर किंग्स पाचव्या क्रमांकावर असून चेन्नईने एकूण 8 सामने खेळले आहेत. त्यात 4 सामन्यात विजय आणि 4 सामन्यात पराभव झाला आहे. चेन्नईचे 8 गुण आहेत. दिल्ली कॅपिटल्स, गुजरात आणि पंजाबचा संघ देखील 8 गुणांसह अनुक्रमे सहाव्या, सातव्या, आठव्या स्थानावर आहे. पंजाबच्या विजयाचा मुंबईला फटका बसला आहे. मुंबईता संघ आठव्या क्रमांकावरुन नवव्या क्रमांकावर पोहचला आहे. आरसीबीची देखील हिच अवस्था पाहायला मिळत आहे. आरसीबीचे सध्या 4 गुण आहे. आरसीबीने आतापर्यंत फक्त दोन सामन्यात विजय मिळवला आहे.
RCB & MI AT THE BOTTOM OF THE TABLE. pic.twitter.com/u1UFwpal6P
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 26, 2024
पंजाबने ऐतिहासिक धावांचा केला पाठलाग
इडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाब किंग्सने ऐतिहासिक धावांचा पाठलाग करत विजयाची नोंद केली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाइट रायडर्स संघाने 20 षटकात 6 गडी गमावून 261 धावा केल्या. संघासाठी फिलिप सॉल्टने 37 चेंडूत 75 धावांची तर सुनील नरेनने 32 चेंडूत 71 धावांची जलद खेळी खेळली. सॉल्टने 6 चौकार आणि 6 षटकार मारले, तर नरेनने 9 चौकार आणि 4 षटकार मारले. पंजाब किंग्जने लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरले आणि 262 धावांचे ऐतिहासिक लक्ष्य 18.4 षटकात 2 गडी राखून पार करून विजयाची नोंद केली. पंजाबकडून सलामी देणाऱ्या जॉनी बेअरस्टोने 48 चेंडूंत 8 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने 108 धावा केल्या. याशिवाय शशांक सिंगने 28 चेंडूत 2 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने नाबाद 68 धावा केल्या. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी केली.
संबंधित बातम्या:
दोघांनी धावून एक रन पूर्ण केला, अंपायरने मात्र तो फेटाळला; गौतम गंभीर मैदानाबाहेर भिडला, Video
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)