IPL 2024 KKR vs SRH Qualifier 1 Match: कोलकाता नाइट रायडर्स अन् सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज पहिला क्वालिफायर
IPL 2024 KKR vs SRH Qualifier 1 Match: भलीमोठी धावसंख्या रचण्यात तरबेज असलेल्या हैदराबादच्या फलंदाजांकडून पुन्हा एकदा चौकार - षटकारांचा वर्षाव होण्याची अपेक्षा बाळगली जात आहे.

Background
IPL 2024 KKR vs SRH Qualifier 1 Match: आज कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात क्वालिफायर 1 चा सामना होणार आहे. गुजरातमधील नरेंद्र मोदी मैदानावर हा सामना रंगेल. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. भलीमोठी धावसंख्या रचण्यात तरबेज असलेल्या हैदराबादच्या फलंदाजांकडून पुन्हा एकदा चौकार - षटकारांचा वर्षाव होण्याची अपेक्षा बाळगली जात आहे.
कोलकात्याची फायनलमध्ये धडक
हैदराबादचा आठ विकेटने पराभव करत कोलकात्याने फायनलमध्ये धडक मारली
कोलकात्याची शानदार सुरुवात
160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याने शानदार सुरुवात केली. गुरबाज आणि नारायण यांनी आक्रमक फलंदाजी केली. पहिल्या विकेटसाठी 44 धावांची भागिदारी केली. गुरबाजने 14 चेंडूमध्ये 23 धावांची खेळी केली. तर नारायण याने 16 चेंडूत 21 धावांचे योगदान दिले. वेंकटेश अय्यर आणि श्रेयस अय्यर सध्या खेळत आहेत. 9.4 षटकानंतर कोलकाता 2 बाद 100 धावा... कोलकात्याला विजयासाठी 62 चेंडूत 60 धावांची गरज




















