आंद्रे रसेलचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, स्मृती मंधानाच्या प्रियकरानं दिली संधी
Ladki Tu Kamal Hai : कोलकाता नाईट रायडर्सचा धाकड फलंदाज आंद्रे रसेल यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेय.
Andre Russell in Ladki Tu Kamal Hai : कोलकाता नाईट रायडर्सचा धाकड फलंदाज आंद्रे रसेल यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेय. आंद्रे रसेल लडकी तू कमाल या गाण्यात झळकणार आहे. स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल यान लडकी तू कमाल या गाण्यामध्ये आंद्रे रसेल याला संधी दिली आहे. बालिका वधू फेम अविका गोर हिच्यासोबत या गाण्यामध्ये आंद्रे रसेल ठुमके लावणार आहे. 9 मे रोजी हे गाणं रिलिज होणार आहे. या गाण्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. आंद्रे रसेल आणि अविका गोर यांच्या डान्सची सर्वांनाच उस्तुकता आहे.
आंद्रे रसेल विस्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. गोलंदाजी आणि फलंदाजीने त्यानं कोट्यवधी चाहत्यांचं मनोरंजन केले आहेच. आता तो मोठ्या पडद्यावर मनोरंज करण्यासाठी सज्ज झाला आहे. बॉलिवूडमधील गाण्यात त्याला संधी मिळाली आहे. आयपीएलमधून वेळ काढून आंद्रे रसेल यानं मुंबईमध्ये गाण्याचं चित्रिकरण पूर्ण केले. 9 मे 2024 रोजी हे गाणं प्रसिद्ध होणार आहे. लडकी तू कमाल या गाण्यामध्ये आंद्रे रसेल ठुमके लावताना दिसणार आहे. आंद्रे रसेल याच्यासोबत बालिका वधू फेम अविका गोर झळकणार आहे. सोशल मीडियावर याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. याआधी ख्रिस गेल आणि डेवेन ब्राव्हो यांनीही आपली कमाल दाखवली होती. ब्राव्हो याचं चॅम्पियन हे गाणं आजही सर्वांना आठवतेय. त्याशिवाय गेल याचे ठुमके चाहत्यांना पसंत पडले होते. आता आंद्रे रसेल याच्या गाण्याची चाहत्यांना प्रतिक्षा आहे. 9 मे रोजी आंद्रे रसेल याचं लडकी तू कमाल हे गाणं पाहायला मिळणार आहे. या गाण्याचं सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल झाले आहे.
View this post on Instagram
स्मृतीच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी -
आंद्रे रसेल पलाश मुच्छलच्या म्युझिक व्हीडिओमध्ये दिसणार आहे. पलाश मुच्छल हा सुप्रसिध्द गायक आमि दिग्दर्शक आहे. त्याशिवाय पलाश याचं नाव स्मृती मंधाना हिच्यासोबतही जोडलं गेलेय. दोघांना अनेकदा स्पॉट केलेय. पलाशने यानं आपल्या इन्स्टाग्रामवर लडकी तू कमाल या गाण्याचं पोस्टर रिलीज केला आहे. या पोस्टरवर आंद्रे रसेल आणि अविका गोर दिसत आहेत. तर त्याआधी केलेल्या एका पोस्टमध्ये फक्त आंद्रे रसेल हातात क्लॅप घेऊन दिसत होता. पलाश हा म्युझिक व्हीडिओ सोबत चित्रपटांचे दिग्दर्शनही करतो. पलाश याच्या लकडी तू कमाल या गाण्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
View this post on Instagram