एक्स्प्लोर

Sharad Pawar & BJP: मोठी बातमी: दिल्लीत अदानींच्या घरी भाजपचा केंद्रीय नेता आणि शरद पवार गटाच्या नेत्याची गुप्त भेट, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?

Sharad Pawar camp NCP leader and BJP union minister: भाजप आणि शरद पवार गट एकत्र येणार. दिल्लीत घडामोडींना वेग, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार

मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत हातमिळवणी करणार का,  अशी शंका निर्माण झाली आहे. गुरुवारी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार यांनी सहकुटुंब दिल्लीतील निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर काल दुपारी उद्योगपती गौतम अदानी यांच्या दिल्लीतील घरी शरद पवार गटातील एक बडा नेता आणि भाजपच्या एका केंद्रीय नेत्याची बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर शरद पवार गटातील आमदार आणि खासदारांमध्ये चलबिचल सुरु झाल्याची माहिती आहे. दिल्लीत 4 डिसेंबरला शरद पवार गटाच्या खासदारांची महत्त्वाची बैठक झाली होती. या बैठकीत आपण सत्तेत गेले पाहिजे, असा मतप्रवाह दिसून आला होता. मात्र, शरद पवार गटात यावरुन दोन गट पडल्याची माहिती आहे. शरद पवार गटाने आपले स्वतंत्र अस्तित्व ठेऊन भाजपसोबत सत्तेत सामील व्हावे, असे एका गटाचे म्हणणे आहे. तर दुसरा गट हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होण्याच्या मताचा आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश आमदार आणि खासदार हे आता सत्तेत सामील होण्याच्या बाजूने दिसत आहेत. तसे झाल्यास राज्यातील महाविकास आघाडीचे अस्तित्व संपुष्टात येईल. त्यामुळे आता पुढील काही तासांमध्ये काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. शरद पवार गट आणि भाजपमधील ही सगळी बोलणी दिल्लीत सुरु आहेत. 

सूत्रांच्या माहितीनुसार, काल अदानी यांच्या घरी झालेल्या बैठकीत भाजपच्या केंद्रीय नेत्याने शरद पवार यांच्या गटातील नेत्याकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि आगामी काळातील शरद पवार गटाची भूमिका याबाबत माहिती घेतल्याचे समजते. उभय नेत्यांमध्ये बराच काळ चर्चा झाली. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटाच खासदार अजितदादा गटात सामील होतील, अशी चर्चा सुरु होती. या चर्चेचे मूळ आणि पडद्यामागील घडामोडी आता एक-एक करुन समोर येताना दिसत आहेत. मात्र, शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट काय प्रतिक्रिया देणार, हे पाहावे लागेल. शरद पवार हे भाजपसोबत सत्तेत सामील झाल्यास महाराष्ट्रातील राजकारणाची रचना पुन्हा एकदा बदलेल.

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
मोठी बातमी! शरद पवारच राज्यसभेचे उमदेवार, सुप्रिया सुळेंकडून घोषणा; काँग्रेस अन् ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा
मोठी बातमी! शरद पवारच राज्यसभेचे उमदेवार, सुप्रिया सुळेंकडून घोषणा; काँग्रेस अन् ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मार्च 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मार्च 2026 | बुधवार
Bihar : बिहारमध्ये खांदेपालट! नितीश कुमार राज्यसभेवर, तर मुख्यमंत्री भाजपचा होणार? निशांत कुमारांचीही राजकारणात एन्ट्री 
बिहारमध्ये खांदेपालट! नितीश कुमार राज्यसभेवर, तर मुख्यमंत्री भाजपचा होणार? निशांत कुमारांचीही राजकारणात एन्ट्री 

व्हिडीओ

Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
Embed widget