IPL 2024 Final KKR vs SRH: ट्रॉफी जिंकलीस म्हणून...; शाहरुख खानसह केकेआरच्या खेळाडूंचं सेलिब्रेशन वादात?, सोशल मीडियावर चर्चा
IPL 2024 Final KKR vs SRH: कोलकाताच्या विजयानंतर शाहरुख खानने जल्लोष केला. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. पत्नी गौरी खान आणि मुलांसोबत शाहरुख खानने जल्लोष केला.
IPL 2024 Final KKR vs SRH Marathi News: कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) आयपीएल 2024 चं जेतेपद पटकावलं. चेन्नईतील एमए. चिदंबरम मैदानावर झालेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या (SRH) सामन्यात कोलकाताने बाजी मारली. कोलकाताने हैदराबादचा 8 विकेट्सने पराभव करत तिसऱ्यांदा आयपीएलचं जेतेपद पटकावलं. (KKR ARE CHAMPIONS OF IPL 2024)
कोलकाताने हा विजय मिळवत आयपीएलमधील 10 वर्षांचा दुष्काळ संपवला. कोलकाताने 2014 मध्ये गौतम गंभीरच्या नेतृत्वात आयपीएलचा हंगाम जिंकला होता. त्यानंतर 10 वर्षांनी कोलकाताला आयपीएलच्या चषकावर नाव कोरण्यात यश आलं. कोलकाताच्या या विजयानंतर मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन करण्यात आले. कोलकाताच्या विजयानंतर शाहरुख खानने जल्लोष केला. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. पत्नी गौरी खान आणि मुलांसोबत शाहरुख खानने जल्लोष केला. मात्र यावेळी शाहरुख खानसह कोलकाताच्या खेळाडूंनी केलेल्या एका कृतीमुळे आता वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
THE AURA OF SHAH RUKH KHAN IS UNMATCHABLE. 🥶 pic.twitter.com/6Gma6cUrE6
— Johns. (@CricCrazyJohns) May 27, 2024
नेमकं काय घडलं?
आयपीएलची ट्रॉफी जिंकल्यानंतर शाहरुख खान आणि कोलकाता नाइट रायडर्सच्या खेळाडूंनी 'फ्लाईंग किस' देऊन आनंद साजरा केला. या पोझची या सीझनमध्ये खूप चर्चा झाली आहे. यासाठी कोलकाताचा खेळाडू हर्षित राणाला दंड आणि एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. बीसीसीआयला उत्तर देण्यासाठी कोलकाता नाइट रायडर्सने असा आनंद साजरा केल्याचे काही लोकांचे मत आहे. फ्लाईंग किस केल्याबद्दल बीसीसीआयने हर्षित राणाला दंड आणि बंदी घातली होती. वास्तविक, IPL 2024 च्या तिसऱ्या सामन्यात हर्षीत राणाने सनरायझर्स हैदराबादचा खेळाडू मयंक अग्रवालला बाद केल्यानंतर त्याला फ्लाईंग किस दिली होती. त्यानंतर हर्षीतवर बंदी घालण्यात आली आणि हे प्रकरण चर्चेत आले.
कोलकाताचा एकतर्फी विजय-
कोलकाताने आयपीएलच्या अंतिम सामन्यात अगदी निर्विवाद वर्चस्व गाजवलं. या सामन्यात कोलकात्याच्या गोलंदाजांनी हैदराबादचा अख्खा डाव 113 धावांत गुंडाळून आपल्या संघाला विजयाची नामी संधी मिळवून दिली. कोलकात्याच्या फलंदाजांनी विजयासाठीचं लक्ष्य अवघ्या दोन विकेट्सच्या मोबदल्यात आणि तब्बल 57 चेंडू राखून पार केलं. कोलकात्याच्या वेंकटेश अय्यरनं नाबाद 52 धावांची, तर रहमानउल्लाह गुरबाजनं 39 धावांची खेळी उभारली. त्याआधी कोलकात्याकडून आंद्रे रसेलनं 19 धावात तीन फलंदाजांना माघारी धाडलं. मिचेल स्टार्क आणि हर्षित राणा प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
𝗖.𝗛.𝗔.𝗠.𝗣.𝗜.𝗢.𝗡.𝗦! 🏆
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2024
BCCI President Roger Binny and BCCI Honorary Secretary @JayShah present the #TATAIPL Trophy to Kolkata Knight Riders Captain Shreyas Iyer 👏👏 #Final | #TheFinalCall | @KKRiders | @ShreyasIyer15 pic.twitter.com/MhVfZ6dPxk