MI vs SRH : विश्वचषकात भारताला नडला, आता मुंबईची गोलंदाजी धुतली, ट्रेविस हेडची वादळी फटकेबाजी
Travis Head : ट्रेविस हेडने अवघ्या 18 चेंडूमध्येच अर्धशतक झळकावले. यंदाच्या आयपीएल हंगामातील हे सर्वात जलद अर्धशतक ठरलं होतं, पण पुढच्या 30 मिनिटांत अभिषेक शर्माने हा विक्रम मोडला.
Travis Head Fastest 50 : विश्वचषकात भारताच्या हातून विजय हिसकावलेल्या ट्रेविस हेडने आयपीएलमध्ये शानदार पदार्पण केले. ट्रेविस हेडने मुंबईविरोधात जोरदार फटकेबाजी करत मुंबईच्या चाहत्यांना निराश केला. ट्रेविस हेडच्या फटकेबाजीमुळे हैदराबादचे चाहते आनंदात नाचत होते. ट्रेविस हेडने अवघ्या 18 चेंडूमध्येच अर्धशतक झळकावले. यंदाच्या आयपीएल हंगामातील हे सर्वात जलद अर्धशतक ठरलं होतं, पण पुढच्या 30 मिनिटांत अभिषेक शर्माने हा विक्रम मोडला. अभिषेक शर्माने अवघ्या 16 चेंडूत अर्धशतक ठोकले आहे. हैदराबादकडून पदार्पण रणाऱ्या ट्रेविस हेड याने पहिल्या चेंडूपासानूच मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. ट्रेविस हेडमुळे जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, गेराल्ट कोइत्जे आणि के माफापाही फेल ठरले. हेडने चौफेर फटकेबाजी करत हैदराबादची धावसंख्या वाढवली.
ट्रेविस हेडचे वेगवान अर्धशतक -
ट्रेविस हेडने अवघ्या 18 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. गेराल्ड कोइत्जे याने ट्रेविस हेड याला बाद करत मुंबईला मोठा दिला दिला. पण हेड आणि अभिषेक शर्मा यांनी वादळी फलंदाजी सुरुच ठेवली. विश्वचषकात टीम इंडियाला नडलेला ट्रेविस हेड आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला नडला आहे. हेडच्या विस्फोटक फलंदाजीमुळे हैदराबादने 200 धावांकडे आगेकूच केली आहे
Travis Head Is absolutely Playing with Fire 🔥pic.twitter.com/L155eaoizv
— SunRisers OrangeArmy Official (@srhfansofficial) March 27, 2024
ट्रेविस हेड आणि मयांक अग्रवाल यांन आक्रमक सुरुवात केली. 4.1 षटकांमध्ये 45 धावांची सलामी दिली. मयांक अग्रवालयाला पांड्याने तंबूचा रस्ता दाखवला. मयांक फक्त 11 धावा काढून बाद झाला. त्यानंतर ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी चार्ज घेतला. दोघांनी चौफेर फटकेबाजी केली. ट्रेविस हेड याने 24 चेंडूमध्ये 62 धावांचे योगदान दिले. ट्रेविस हेड याने आपल्या खेळीमध्ये तीन षटकार आणि 9 चौकार लगावले. अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेड यांच्यामध्ये 23 चेंडूमध्ये 68 धावांची भागिदारी झाली.
मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्माच्या झंझावातापुढे हा निर्णय चुकल्याचे दिसले. हेड आणि शर्मा यांनी मुंबईची गोलंदाजी धुतली.
Tell the world Travis head is back To IPL 2024!pic.twitter.com/EpEdkssRMn
— SunRisers OrangeArmy Official (@srhfansofficial) March 27, 2024
मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11 -
इशान किशन, रोहित शर्मा, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार) , टीम डेविड, सॅम्स मुलानी, गेराल्ड कोएत्जे, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, केविन माफाका
सनराजयर्स हैदराबादची प्लेईंग 11 -
ट्रेविस हेड, मयांक अग्रवाल, अभिषेक शर्मा, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, मयांक मार्केंडे, जयदेव उनादकट