एक्स्प्लोर

IPL 2024 CSK MS Dhoni And Suresh Raina Video: चेन्नईचा निरोप घेताना एमएस धोनीने सुरेश रैनाला मारली मिठी; सोशल मीडियावर चर्चांना उधाण, पाहा Video

IPL 2024 CSK MS Dhoni And Suresh Raina Video: धोनी आणि रैनाचा हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला आहे.

IPL 2024 CSK MS Dhoni And Suresh Raina Video: चेन्नई सुपर किंग्सने (CSK) आयपीएल 2024 चा शेवटचा घरच्या मैदानावर हंगामातील सामना  राजस्थान रॉयल्सविरुद्ध (RR) खेळला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सुपर किंग्सने 5 विकेट्सने विजय मिळवला. या विजयानंतर एमएस धोनीने (MS Dhoni) मैदानावर उपस्थित असणाऱ्या चाहत्यांचा निरोप घेतला. यादरम्यान धोनीने सुरेश रैनाला मिठी मारली. धोनी आणि रैना मिठी मारतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या वेगाने व्हायरल होत आहे. तसेच धोनीचा आयपीएलचा हा शेवटचा हंगाम असल्याचं देखील सोशल मीडियावर बोललं जात आहे. मात्र चेन्नई आणि एमएस धोनीने याबाबत कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

धोनी आणि रैनाचा हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला आहे. घरच्या मैदानावर शेवटचा सामना खेळल्यानंतर, चेन्नई सुपर किंग्सच्या संपूर्ण संघाने मैदानावर फेरफटका मारला. यादरम्यान सुरेश रैनाही तिथे पोहोचला. यानंतर रैना आणि धोनीने मिठी मारली. चेन्नईच्या दिग्गज खेळाडूंची मिठी चाहत्यांना खूप आवडली.

सामना कसा राहिला?

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमावून 141 धावा केल्या होत्या. रियान परागने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि 35 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 47* धावा केल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईने 18.2 षटकांत विजय मिळवला. चेन्नईसाठी कर्णधार रुतुराज गायकवाडने सर्वात मोठी खेळी खेळली आणि 41 चेंडूत 42* धावा केल्या. यादरम्यान गायकवाडने 1 चौकार आणि 2 षटकार मारले होते. चेन्नईचा कर्णधार सलामीला आला होता आणि तो शेवटपर्यंत टिकून राहिला.

चेन्नईचं प्ले ऑफच्या दिशेने पाऊल-

चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्सविरुद्ध विजय नोंदवून प्ले ऑफच्या शर्यतीत एक पाऊल पुढे टाकले आहे. आता चेन्नई 14 गुणांसह आणि +0.528 च्या नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, पराभूत राजस्थान रॉयल्स 16 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. राजस्थानचा हा सलग तिसरा पराभव ठरला.

संबंधित बातम्या:

IPL 2024: 'तुम्हाला 400 कोटी रुपये मिळाले तर...', केएल राहुलसाठी वीरेंद्र सेहवाग मैदानात, लखनौच्या मालकाला खडसावले!

ICC T20 WC 2024: टी 20 विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये कोणते 4 संघ पोहचणार?; युवराज सिंहने नावं जाहीर करुन टाकली!

चेन्नईने सामना गमावला, पण सर्वांना चीअरलीडरची पडली भुरळ; अभिनेत्रींना टक्कर देणारं सौंदर्य, पाहा Photo's

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhansabha Superfast | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 21 Nov 24Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..Jitendra Awhad Full PC : प्रतिभा पवारांची गेटवर अडवणूक प्रकरण, जितेंद्र आव्हाड अजितदादांवर कडाडलेSantosh Bangar on Vidhan Sabha : 25 हजारांच्या फरकाने सीट निघेल, मतदानानंतर संतोष बांगर निवांत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
Embed widget