एक्स्प्लोर

पहिले अस्वस्थ झाली, मग थेट बोलली; ऋषभ पंतसोबत लग्नाच्या प्रश्नावर उर्वशी रौतेलाने काय उत्तर दिलं?, पाहा Video

उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत एकमेकांना डेट करत होते. पण काही कारणास्तव ते वेगळे झाले. दोघांनीही एकमेकांची नावं न घेता बऱ्याच पोस्ट टाकल्या होत्या.

Urvashi Rautela On Marrying Rishab Pant: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) आणि भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू आणि दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्यातील वाद खूप चर्चेत आला होता. वास्तविक, त्यावेळी अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला एकमेकांना डेट करत होते. यानंतर ऋषभ पंतने उर्वशी रौतेलाचा नंबर ब्लॉक केल्याचे बोलले जात होते. मात्र, या मुद्द्यावर ऋषभ पंतच्या बाजूने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. पंरतु आता उर्वशी रौतेलाने पुन्हा एकदा ऋषभ पंतबद्दल तिचं मत व्यक्त केलं आहे.

बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये उर्वशी रौतेलाला ऋषभ पंतबद्दल काही प्रश्न विचारले. तसेच ऋषभ पंतसोबतच्या लग्नावरही प्रश्न उर्वशीला विचारला गेला. कार्यक्रमाच्या अँकरने उर्वशीला एक नेटकऱ्याची कमेंट वाचून दाखवली. यामध्ये ऋषभ पंत तुझा आदर करतो, तो तुलाही आनंदी ठेवेल, तू त्याच्याशी लग्न केल्यास मला आनंद होईल, अशी कमेंट एक चाहत्याने केली होती. उर्वशीला अँकरने वाचून दाखवल्यानंतर यावर नो कमेंट...असं बोलत उर्वशीने उत्तर दिले. उर्वशीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया देखील येत आहेत.

दोघांचा वाद सोशल मीडियावर चर्चेत-

उर्वशी आणि ऋषभ पंत एकमेकांना डेट करत होते. पण काही कारणास्तव ते वेगळे झाले. दोघांनीही एकमेकांची नावं न घेता बऱ्याच पोस्ट टाकल्या होत्या. त्यांचा सोशल मीडियावरील शाब्दिक वाद खूप चर्चेत राहिला होता. मात्र, पंतने अनेकदा उर्वशीला ओळखत नसल्याचे सांगितले आहे. सध्या उर्वशी आणि ऋषभ यांच्यात कोणतही नातं नसलं, तरीही फक्त सोशल मीडिया पोस्टमुळे दोघे चर्चेत असतात.  उर्वशी कायम सोशल मीडियावर अशा पोस्ट करत असते, ज्यामुळे चाहते तिची पोस्ट ऋषभ पंत याच्यासोबत कनेक्ट करतात. 

यंदाच्या हंगामात ऋषभ पंतची चांगली कामगिरी-

ऋषभ पंतची आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. या मोसमात आतापर्यंत ऋषभ पंतने 11 सामन्यात 44 च्या सरासरीने 398 धावा केल्या आहेत. तसेच 3 वेळा पन्नास धावांचा टप्पा ओलांडला आहे. याशिवाय 24 षटकारही मारले आहेत. तुम्हाला सांगूया की नुकतीच टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली होती. या भारतीय संघात स्थान मिळवण्यात ऋषभ पंत यशस्वी ठरला. मात्र, आता प्रदीर्घ काळानंतर पुन्हा एकदा ऋषभ पंत टीम इंडियाच्या जर्सीत दिसणार आहे.

संबंधित बातम्या:

Sunil Gavaskar On Virat Kohli: 'अरे मग तु उत्तर का देतोस'?; विराट कोहलीच्या विधानावर सुनील गावसकर संतापले, पाहा Video

Hardik Pandya: हार्दिक पांड्याची मोठी चूक झाली...; शेन वॉटसन अन् ग्रॅमी स्मिथने सुनावलं, सगळं बोलून टाकलं!

IPL 2024: विराट कोहलीच्या एका कृतीनं सर्वांची मनं जिंकली; बंगळुरुच्या विजयापेक्षा त्याचीच चर्चा रंगली!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशीMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
Laapataa Ladies Animal Movie : किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
Embed widget