सिराज भरल्या डोळ्यांनी मैदानावरच कोसळला, विराटने टोपीआड अश्रू लपवले, RCB च्या पराभवाने चाहतेही रडले!
IPL 2023 : आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील अखेरच्या साखळी सामन्यात आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागला.
IPL 2023 : आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील अखेरच्या साखळी सामन्यात आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागला. आरसीबीचे प्लेऑफचे आव्हान संपले. सोळाव्या वर्षीही आरसीबीला आयपीएलच्या चषकापासून वंचित राहावे लागले.. सोळावर्षांपासून आरसीबीचे चाहते चषकाची वाट पाहत आहेत. प्रत्येकवेळा चषकाच्या जवळ जातात.. पण विजय मिळवण्यात अपयश येते. यावरुन सोशल मीडियावर अनेकदा विराट कोहली आणि आरसीबीला ट्रोलही केले जाते. आतापर्यंत आरसीबीला एकदाही चषक उंचावता आला नाही, हे आरसीबीच्या चाहत्यांची खंतच आहे. यंदाच्या हंगामत आरसीबीचे प्लेऑफमधील आव्हान संपल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले होते. विराट कोहली, मोहम्मद सिराज यांनाही आपले दुख लपवता आले नाही..
शुभमन गिल याने विजयी षटकार मारल्यानंतर आरसीबीचे खेळाडू आणि चाहतेही निराश झाले. अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते.. काहीजण स्टेडिअममध्येच निराश होऊन बसले होते. खेळाडूंचीही तशीच अवस्था झाली होती. मोहम्मद सिराज तर मैदानातच कोसळला.. खेळपट्टीवर तो चक्क झोपला होता. डगआऊटमध्ये बसलेल्या विराट कोहली याने टोपीआड आपले अश्रू लपवले होते.. आरसीबीच्या चाहत्यांचे मन तुटले होते.. त्यांना आता चषकासाठी आणखी एक वर्ष वाट पाहावी लागणार आहे. विराट कोहली आणि सिराज यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Faf Du Plessis - 730 runs.
— Johns. (@CricCrazyJohns) May 21, 2023
Virat Kohli - 639 runs.
Glenn Maxwell - 400 runs.
Mohammed Siraj - 19 wickets.
Four players give their heart out for RCB, hard luck in IPL 2023. pic.twitter.com/n5ycDWaz5t
Win or Lose RCB and Virat Kohli forever ❤ pic.twitter.com/KEt2R1lCNE
— leisha (@katyxkohli17) May 21, 2023
Most painful picture of the IPL.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 21, 2023
King Kohli gave his absolute best, scored back to back centuries for RCB, but RCB are knocked out. You gotta feel for Virat! pic.twitter.com/ofzcxPdlHB
विराटच्या शतकावर गिलचे शतक भारी, गुजरातचा आरसीबीवर सहा विकेटने विजय
शुभम गिलच्या शतकाच्या बळावर गुजरातने आरसीबीचा सहा विकेटने पराभव केलाय. आरसीबीने दिलेल्या 198 धावांच्या आव्हानाचा पाठलाग गुजरातने पाच चेंडू आणि सहा विकेट राखून केला. विराट कोहलीची शतकी खेळी व्यर्थ गेली. शुभमन गिल याने 52 चेंडूत 104 धावांची खेळी केली. आरसीबीचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेय. त्यामुळे मुंबईने प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. गुजरातने दिलेल्या 198 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात निराशाजनक झाली. सलामी फलंदाज वृद्धीमान साहा स्वस्तात तंबूत परतला. साहा याला फक्त 12 धावांचे योगदान देता आलेय. मोहम्मद सिराज याने साहाचा अडथळा दूर केला. साहा बाद झाल्यानंतर शुभमन गिल आणि विजय शंकर यांनी गुजरातचा डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 71 चेंडूत 123 धावांची भागिदारी केली. या जोडीने गुजरातच्या डावाचा पाया रचला.
शुभमन गिल आणि विजय शंकर यांनी आरसीबीच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. सुरुवाताला संयमी फलंदाजी केली. त्यानंतर आक्रमक रुप घेत धावसंख्येला आकार दिला. विजय शंकर याने 35 चेंडूत 53 धावांची खेळी केली. विजय शंकर याने बेंगलोरच्या मैदानावर तांडव घातला. विजय शंकर याने दोन षटकार आणि सात चौकार लगावले. विजय शंकर बाद झाल्यानंतर गुजरातची फलंदाजी ढेपाळली. दासुन शनाका याला खातेही उघडता आले नाही. शनाका हर्षल पटेल याच्या गोलंदाजीवर शून्यावर बाद झाला. त्यानंतर विस्फोटक डेविड मिलर याचा अडथळा मोहम्मद सिराज याने दूर केला. मिलर याने सात चेंडूत सहा धावांची खेळी केली.
शुभमन गिल याने एकाकी झुंज दिली. गिल याने 52 चेंडूत शतक झळकावले. गिल याने आठ षटकार आणि पाच चौकारांच्या मदतीने 104 धावांची खेळी केली. आरसीबीकडून मोहम्मद सिराज याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.