IPL 2023 Transfers : शार्दूल ठाकूर आता केकेआरच्या संघात, आयपीएल 2023 च्या मिनी ऑक्शनपूर्वी दिल्लीनं केलं ट्रेड
IPL 2023 Auction : आयपीएल 2023 (IPL 2023 ) हंगामासाठी मिनी ऑक्शन 23 डिसेंबर रोजी पार पडणार असून यापूर्वी सर्व संघाना त्यांच्या रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करायची आहेत.
IPL 2023 Auction : इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएल (IPL) 2023) साठीचा लिलाव (IPL 2023 Auction) 23 डिसेंबरला कोची इथे पार पडणार आहे. या भव्य स्पर्धेसाठी यंदा मिनी ऑक्शन होणार असून यावेळी संघामध्ये काही बदल नक्कीच पाहायला मिळतील. दरम्यान सध्या या ऑक्शनपूर्वी सर्व संघाना त्यांच्या रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करायची आहेत. दरम्यान ऑक्शनसाठी आपल्या पर्समध्ये अधिक पैसे शिल्लक ठेवण्यासाठी संघ काही खेळाडूंना रिलीज करत असून नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार दिल्ली संघाने स्टार ऑलराऊंडर शार्दूलला रिलीज केलं असून केकेआर संघाने त्याला आपल्यासोबत जोडल्याची माहिती समोर येत आहे. ईएसपीएनने (ESPN) ही माहिती दिली आहे.
शार्दूलला संघात घेण्यासाठी कोलकात्यासोबत चेन्नई, गुजरात आणि पंजाब हे संघही प्रयत्न करत होते. पण अखेर केकेआरने शार्दूलला संघात घेण्यात यश मिळवलं आहे. आयपीएल 2022 मध्ये शार्दूलने चांगली अष्टपैलू कामगिरी केली होती. 14 सामन्यात त्याने 15 विकेट्स घेत 120 धावाही केल्या होत्या. दरम्यान एका दमदार अष्टपैलू खेळाडूच्या येण्याने केकेआर संघाची ताकद वाढणार हे नक्की.
Shardul Thakur will be playing for Kolkata Knight Riders in IPL 2023. (Source - Espn Cricinfo)
— Johns. (@CricCrazyJohns) November 14, 2022
कोचीमध्ये होणार मिनी लिलाव
पुढील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये आयपीएलचा 16 व्या हंगाम खेळवला जाणार आहे. या हंगामासाठी 23 डिसेंबर रोजी कोचीमध्ये मिनी लिलाव होणार आहे. बीसीसीआयने सर्व आयपीएल संघांना 15 नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या कायम ( Retained Players ) ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्यास सांगितलं आहे.
आयपीएल पुन्हा Home Away Format मध्ये
आगामी आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेसंबधित बीसीसीआयने एक नवी घोषणा केली होती. तत्कालीन माजी अध्यक्ष गांगुली म्हणाले होते, ''मागील दोन वर्षे कोरोनामुळे आयपीएल नेहमीसारखी होत नव्हती, पण आता आयपीएल पुन्हा जुन्या ढंगात होणार आहे. ज्यामुळे आता प्रत्येक संघ आपले सात सामने घरच्या मैदानात तर उर्वरीत सात सामने प्रतिस्पर्धी संघाच्या घरच्या मैदानात खेळणार आहे.'' टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ''पुरुषांच्या आयपीएलचा आगामी हंगाम पहिल्याप्रमाणे होम आणि अवे फॉरमॅटमध्ये होणार आहे. ज्यामुळे सर्व दहा संघ त्यांचे 7 सामने घरच्या मैदानात तर उर्वरीत 7 सामने प्रतिस्पर्धी संघाच्या घरच्या मैदानात खेळणार आहेत. तसंच सध्या बीसीसीआय बहुप्रतिक्षित महिला आयपीएलवर काम करत आहे. आम्ही पुढच्या वर्षी पहिला हंगाम सुरू करण्याची शक्यता आहे.”
हे देखील वाचा-