Injured Premier League : आयपीएलला दुखापतीचे ग्रहण, कोणत्या संघातील कोणता खेळाडू दुखापतीमुळे 'Out'
प्रत्येक सामन्यानंतर दुखापतग्रस्त खेळाडूंचे नाव समोर येत आहे. indian premier league आहे की Injured premier league असाच प्रश्न उपस्थित झालाय.
IPL 2023 ruled out players : आयपीएलच्या सोळाव्या हंगमाला दुखापतीचे ग्रहण लागले आहे. प्रत्येक सामन्यानंतर दुखापतग्रस्त खेळाडूंचे नाव समोर येत आहे. indian premier league आहे की Injured premier league असाच प्रश्न उपस्थित झालाय. आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात गुजरातचा केन विल्यमसन दुखापतग्रस्त झाला होता. जायबंदी झाल्यामुळे विल्यमसन पूर्ण हंगमाला मुकणार आहे. त्यातच आज आरसीबीसाठी वाईट बातमी आली. गेल्यावर्षीचा स्टार खेळाडू रजत पाटीदार दुखापतीमुळे आयपीएलच्या सोळाव्या हंगमाला मुकणार आहे. याआधीही अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत.. याचा सर्वाधिक फटका मुंबई आणि गुजरात संघाला बसला आहे. दिल्लीचा कर्णधार ऋषभ बंत आणि मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आयपीएलएला मुकले आहेत. याची किंमत या दोन्ही संघाली आपल्या सलामीच्या सामन्यात मोजली आहे. पाहूयात कोण कोणते खेळाडू दुखापतीमुळे आयपीएलमध्ये खेळत नाहीत.....
मुंबई -
मुंबईच्या गोलंदाजीची धुरा सांभाळणारा जसप्रीत बुमराह गेल्या काही दिवसांपासून दुखापतग्रस्त आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही माघार घेतली. नुकतीच न्यूझीलंडमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली होती. बुमराहला दुखापतीमधून सावरण्यास अद्याप चार ते पाच महिने लागू शकतात. बुमराहशिवाय झाय रिचर्डर्सन हाही दुखापतीमुळे आयपीएलला मुकला आहे. मुंबईने कोट्यवधी रुपये खर्च करुन झाय रिचर्डर्सनला संघात घेतले होते. पण आत झाय आणि बुमराह दोन्ही खेळाडू नाहीत, याचा फटका पहिल्या सामन्यात दिसला. विराट-फाफ पुढे मुंबईची गोलंदाजी दुबळी दिसत होती.
चेन्नई -
गेल्या हंगमात मुकेश चौधरी याने चेन्नईसाठी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली होती. पण जानेवारीमध्ये त्याला दुखापत झाली, तो आता संपूर्ण आयपीएल हंगामात खेळणार नाही. त्याशिवाय अष्टपैलू कायल जेमिसन हाही दुखापतीमुळे आयपीएलएला मुकणार आहे.
आरसीबी -
गेल्या हंगमातील आरसीबीचा हिरो रजत पाटीदार दुखपतीमुळे यंदाच्या हंगामात खेळणार नाही. गेल्या हंगमात पाटीदार याने दमदार फलंदाजी केली होती. पाटीदारशिवाय विल जॅक्स हाही दुखापतीमुळे आयपीएलला मुकला आहे. मुंबईविरोधात पहिल्याच सामन्यत रीस टोप्ली दुखापतग्रस्त झाला आहे, त्याची दुखापत किती गंभीर आहे. याबाबत माहिती मिळालेली नाही.
दिल्ली -
गेल्या वर्षाच्या अखेरीस ऋषभ पंत याचा भीषण अपघात झाला होता. या अपघातातून पंत थोडक्यात बचावला. तो आता जवळपास वर्षभर क्रिकेट खेळू शकणार नाही. हा दिल्लीला मोठा झटका मानला जातो. ऋषभ पंत दिल्लीच्या संघाचे नेतृत्वही करत होता. पहिल्या सामन्यात दिल्लीला पंतची कमी जाणवली.
पंजाब -
पंजाबचा आघाडीचा फलंदाज Jonny Bairstow याने दुखापतीमुळे आय़पीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला. गेल्या हंगामात Jonny Bairstow याने विस्फोटक खेळी केली होती. पंजाबला यंदा Jonny Bairstowची कमी जाणवेल.
राजस्थान -
भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा गेल्या काही दिवसांपासून दुखापतीचा सामना करत आहे. त्याची दुखापत गंभीर असल्यामुळे तो यंदाच्या हंगमात खेळताना दिसणार नाही.
गुजरात - .
आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील पहिल्याच सामन्यात केन विल्यमसन याला दुखापत झाली. फिल्डिंग करताना विल्यमसन दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तो आयपीएलमधून बाहेर गेलाय. विल्यमसनच्या जागी गुजरातचा संघ कुणाला संधी देणार......याची चर्चा सुरु आहे.
कोलकाता -
कोलकाताच्या कर्णधार श्रेयस अय्यर दखापतीमुळे आयपीएलला मुकणार आहे. त्यामुळे कोलकात्याने नितीश राणा याच्याकडे नेतृत्व सोपवले आहे. पण श्रेयस अय्यरचा अनुभवापासून कोलकाता वंचितच राहणार आहे. पहिल्याच सामन्यात कोलकात्याला अय्यरची कमी जाणवत होती.
हैदराबाद आणि लखनौ या दोन्ही संघाला अद्याप दुखापतीचा फटका बसलेला नाही.