(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2023 च्या आधी कर्णधार रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघात सामील
IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग 2023 ची सुरुवात 31 मार्च (IPL 2023 Start Date) पासून होणार आह. अशातच सर्व संघांचे खेळाडू आपापल्या संघात सामील होऊ लागले आहेत.
IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग 2023 ची सुरुवात 31 मार्च (IPL 2023 Start Date) पासून होणार आह. अशातच सर्व संघांचे खेळाडू आपापल्या संघात सामील होऊ लागले आहेत. यातच आयपीएल लिलावात विकला गेलेला सर्वात महागडा खेळाडू सॅम कुरन (Sam Curran) देखील पंजाब किंग्जमध्ये सामील झाला आहे, तर ऑस्ट्रेलियन युवा खेळाडू कॅमेरॉन ग्रीन (Cameron Green) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) देखील आयपीएलपूर्वी मुंबई इंडियन्स संघात सामील झाले आहेत.
IPL 2023: सॅम करन यपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू
पंजाब किंग्सने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये 1 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध संघाच्या पहिल्या सामन्यापूर्वी सॅम करन चंदीगडला येत असल्याचे दिसत आहे. सॅम करनला आयपीएल 2023 च्या लिलावादरम्यान पंजाब किंग्जने 18.50 कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात सामील केलं आहे. ज्यामुळे तो आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. सॅम करनने खेळलेल्या 3 हंगामात 22.46 च्या सरासरीने 337 धावा केल्या आहेत, ज्या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 149.77 आहे. मात्र आयपीएलमध्ये बॉलिंगचा त्याचा विक्रम तितकासा चांगला नाही. पण 2022 टी-20 विश्वचषकातील त्याच्या कामगिरीमुळे तो प्रत्येक फ्रँचायझीचा आवडता पर्याय बनला आहे. इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध फायनल जिंकल्यानंतर करनला मॅन ऑफ द मॅच आणि मॅन टूर्नामेंटने सन्मानित करण्यात आले.
𝐖𝐄𝐋𝐂𝐎𝐌𝐄 𝐇𝐎𝐌𝐄, @CurranSM. ❤️🔥#JazbaHaiPunjabi #SaddaPunjab #PunjabKings #TATAIPL pic.twitter.com/7CfWdpGsF0
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) March 27, 2023
आपला मुंबईकर Rohit Sharma 💙🏙️#OneFamily #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #IPL2023 #TATAIPL @ImRo45 pic.twitter.com/BZMUXFHl55
— Mumbai Indians (@mipaltan) March 27, 2023
श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत नितीश राणा केकेआरचा कर्णधार
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या आगामी हंगामासाठी कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाने आपला कर्णधार जाहीर केला असून संघातील अनुभवी फलंदाज नितीश राणा (nitish rana) याला ही मोठी संधी देण्यात आली आहे. संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) पाठीच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरण्यासाठी दोन ते तीन महिने लागणार असल्याने तो आयपीएलला मुकणार आहे. अशामध्ये संघाकडे बरेच पर्याय असताना नितीश राणाला जबाबदारी देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का संघ व्यवस्थापनाने दिला आहे.
IPL 2023: IPL कधी होणार सुरू?
दरम्यान, आयपीएल 2023 सुरू होण्यासाठी आता फक्त 2 दिवस शिल्लक आहेत आणि सर्व संघांनी सामन्यांसाठी सराव सुरू केला आहे. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात 31 मार्च रोजी हार्दिकच्या कर्णधार गुजरात आणि धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. अशा स्थितीत या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळू शकते. कारण दोन्ही संघांना आयपीएल 2023 ची सुरुवात विजयाने करायची आहे.