एक्स्प्लोर

IPL 2023 : वानखेडेवर मुंबईचे वस्त्रहरण! चेन्नईचा सात विकेटने विजय

IPL 2023 : वानखेडेच्या मैदानावर चेन्नईने मुंबईचा सात विकेटने पराभव करत वस्त्रहरण केलेय.

Mumbai Indians vs Chennai Super Kings IPL 2023 : वानखेडेच्या मैदानावर चेन्नईने मुंबईचा सात विकेटने पराभव करत वस्त्रहरण केलेय. आधी गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजांना बांधून ठेवले, त्यानंतर चेन्नईच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई केली. मुंबईने दिलेले 158 धावांचे माफक आव्हान चेन्नईने सात विकेट आणि 11 चेंडू राखून आरामात पार केले. मराठमोळ्या अजिंक्य राहणे याने या सामन्यात झंझावाती फलंदाजी केली. तर रविंद्र जाडेजाने भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन केले. आयपीएलच्या 16 व्या हंगामातील चेन्नईचा हा दुसरा विजय ठरला तर मुंबईचा दुसरा पराभव होय.

अजिंक्य रहाणेचा झंझावात  -

मुंबईकर अजिंक्य रहाणे याने वानखेडेच्या मैदानावर झंझावाती फलंदाजी केली. अजिंक्यने अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक झळकावत मुंबईच्या गोलंदाजीची हवा काढली. चेन्नईकडून अजिंक्य रहाणे याने आज आयपीएलमध्ये पदार्पण केले. पदार्पणातच अजिंक्यने दमदार कामगिरी केली. मुंबईने दिलेल्या 158 धावांच्या माफक आव्हानाच पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली. डेवॉन कॉनवे गोल्डन डक झाला.. त्यामुळे पहिल्याच षटकात अजिंक्य रहाणे मैदानावर आला. त्यानंतर अजिंक्य रहाणे याने सामन्याचे चित्र बदलले. अजिंक्य याने वानखेडे मैदानावर चोहोबाजूने फटकेबाजी केली. त्याने अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. यामध्ये त्याने 3 षटकार आणि 7 चौकारांचा पाऊस पडाला. अजिंक्य फलंदाजी करताना भन्नाट फॉर्मात असलेला ऋतुराज गायकवाडही बघ्याच्या भूमिकेत होता. अजिंक्य रहाणेने 27 चेंडूत 61 धावांची खेळी केली. ऋतुराजसोबत त्याने 82 धावांची भागिदारी केली, यामध्ये अजिंक्य रहाणेचा वाटा 61 धावांचा होता. अजिंक्य रहाणेने एका षटकात तब्बल 23 धावा वसूल केल्या, त्यावरुन त्याच्या विस्फोटक फलंदाजीचा अंदाज लावू शकता. अजिंक्य रहाणे याने यंदाच्या आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले. याआधी हा विक्रम शार्दुल ठाकूरच्या नावावर होता. शार्दुल ठाकूरने आरसीबीविरोधात 20 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. रहाणेने हा विक्रम मोडीत काढत अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक झळकावले.

ऋतुराज गायकवाडची नाबाद खेळी, दुबेचे योगदान - 

ऋतुराज गायकवाड याने सयंमी फलंदाजी करत चेन्नईला विजय मिळवून दिला. ऋतुराज गायकवाड याने 35 चेंडूत 39 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने एक षटकार आणि दोन चौकार लगावले. ऋतुराज याने सुरुवातीपासूनच एक बाजू लावून धरत विजय मिळवून दिला. आधी अजिंक्य राहणेसोबत भागिदारी करत विजयाचा पाया रचला. त्यानंतर दुबे आणि अंबाती रायडू यांच्या मदतीने चेन्नईला विजय मिळवून दिला. शिवम दुबे याने 26 चेंडूत 28 धावांचे योगदान दिले. दुबे याने या खेळीत दोन चौकार आणि एक षटकार लगावला. अंबाती रायडू याने नाबाद 16 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने दोन चौकार लगावले. 

दरम्यान, रविंद्र जाडेजा आणि मिचेल सँटनर यांच्या फिरकीपुढे मुंबईच्या संघाची दाणादाण उडाली. वानखेडे मैदानावर प्रथम फंलदाजी करताना मुंबईने निर्धारित 20 षटकात 9 विकेटच्या मोबदल्यात 157 धावांपर्यंत मजल मारली. मुंबईच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आले नाही. चेन्नईकडून रविंद्र जाडेजा याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. 

रोहित-ईशानची विस्फोटक सुरुवात - 

कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी मुंबईला विस्फोटक सुरुवात करुन दिली. दोघांनी सुरुवातीपासूनच धावांचा पाऊस पाडला. 4 षटकात 38 धावांची सलामी दिली. पण रोहित शर्मा 21 धावांवर बाद झाल्यानंतर मुंबईची फलंदाजी ढासळली. रोहित शर्माने 13 चेंडूत एक षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने 21 धावा केल्या. तर ईशान किशन याने 21 चेंडूत 32 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने पाच चौकार लगावले. ईशान आणि रोहित शर्मा यांना चांगली सुरुवात मिळाल्यानंतर मोठी खेळी करता आली नाही. विस्फोटक सुरुवात मिळाली पण त्याचे रुपांतर मोठ्या खेळीत करता आले नाही. 

मुंबईची फलंदाजी ढासळली - 

रोहित शर्मा आणि ईशान किशन तंबूत परतल्यानंतर मुंबईचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. कॅमरुन ग्रीन याने 11 चेंडूत फक्त 12 धावा केल्या. सूर्यकुमार यादव याने दोन चेंडूत एक धाव केली. अरशद खान 2 आणि ट्रिस्टन स्टब्स 10 चेंडूत 5 धावा काढून बाद झाला. चेन्नईच्या गोलंदाजीसमोर मुंबईच्या फलंदाजांनी नांगी टाकली.  

तिलक वर्माला चांगली सुरुवात - 
पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावणाऱ्या तिलक वर्माला दुसऱ्या सामन्यात चांगली सुरुवात मिळाली होती. तिलक वर्मावर पुन्हा एकदा मुंबईच्या फलंदाजीची धुरा आली होती. पण त्याला आज अपयश आले. तिलक वर्माने 18 चेंडूत 1 षटकार आणि दोन चौकाराच्या मदतीने 22 धावांची खेळी केली. तिलक वर्माला चांगली सुरुवात मिळाली होती, पण मोठी खेळी करता आली नाही. 

टिम डेविडचे शर्तीचे प्रयत्न - 
विस्फोटक फंलदाज टिम डेविड याने धावसंख्या वाढवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. आघाडीचे सर्व फलंदाज बाद झाल्यानंतर टिम डेविड याने मोर्चा संभाळला पण त्याला अखेरपर्यंत खेळता आले नाही. टिम डेविड याने 22 चेंडूत 31 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने दोन षटकार आणि एक चौकार लगावला. 

रविंद्र जाडेजा-मिचेल सँटनरची जबरदस्त फिरकी - 

रविंद्र जाडेजा आणि मिचेल सँटनर या फिरकीजोडीने भेदक मारा केला. या जोडीने मुंबईचा अर्धा संघ तंबूत पाठवला. रविद्र जाडेजाने तीन विकेट घेतल्या तर सँटरनने दोन जणांना तंबूचा रस्ता दाखवला. रविंद्र जाडेजाने चार षटकात अवघ्या 20 धावा खर्च करत तीन विकेट घेतल्या तर सँटरने चार षटकात 28 धावा खर्च केल्या. जाडेजाने ईशान किशन, कॅमरुन ग्रीन आणि तिलक वर्मा यांची शिकार केली. तर सँटरने सूर्यकुमार आणि अरशद खान यांना तंबूत धाडले. पदार्पण करणाऱ्या मगाला याला एक विकेट मिळाली. तर तुषार देशपांडे याने दोन विकेट घेतल्या.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP MajhaIce Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Embed widget