(Source: ECI/ABP News/ABP Majha)
DC vs PBKS, 1 Innings Highlights: प्रभसिमरनची शतकी खेळी, पंजाबची 167 धावांपर्यंत मजल
IPL 2023, DC vs PBKS : प्रभसिमरच्या शतकी खेळीच्या बळावर पंजाबने सात विकेटच्या मोबदल्यात 167 धावांपर्यंत मजल मारली.
IPL 2023, DC vs PBKS : प्रभसिमरच्या शतकी खेळीच्या बळावर पंजाबने सात विकेटच्या मोबदल्यात 167 धावांपर्यंत मजल मारली. प्रभसिमरनचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. दल्लीकडून इशांत शर्माने दोन विकेट घेतल्या. दिल्लीला विजयासाठी 168 धावांचे आव्हान आहे.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाब किंग्सची सुरुवात खराब झाली. पावरप्लमध्ये पंजाबने तीन विकेट गमावल्या होत्या. सहा षटकात पंजाबने तीन विकेटच्या मोबद्लायत ४६ धावा केल्या होत्या. कर्णधार शिखर धवन सात धावा काढून तंबूत परतला. ईशांत शर्माने शिखर धवनला बाद केले. लियाम लिव्हिंगस्टोन यालाही मोठी खेळी करता आली नाही. लिव्हिंगस्टोन चार धावा काढून बाद झाला. त्याला इशांत शर्माने बाद केले. तर अक्षर पटेल याने फॉर्मात असलेल्या जितेश शर्माला बाद केले. जितेश शर्मा पाच धावा काढून बाद केले.
तीन विकेट झटपट गेल्यानंतर प्रभसिमरन याने सॅम करनच्या मदतीने पंजाबच्य डावाला आकार दिला. पण सॅम करन २० धावांवर बाद झाला. त्याने एक चौकार लगावला. हरप्रीत ब्रार दोन आणि शाहरुख खान दोन धावांवर बाद झाले. पंजाबचा डाव पुन्हा एकदा ढासळला. अखेरीस सिकंदर रजाने ११ धावा काढत पंजाबचा डाव १६७ पर्यंत पोहचवला.
प्रभसिमरन याने एकाकी झुंज दिली. प्रभसिमरनचा याचा अपवाद वगळता एकाही फलंजाला तीस धावसंख्या ओलांडता आली नाही. प्रभमसिमन याने ६४ चेंडूत १०३ धावांची खेळी केली. प्रभसिमरन याने ४४ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर २० चेंडूत ५३ धावांचा पाऊस पाडला. प्रभसिमरन याने पंजाबच्या धावसंख्येतील सत्तर टक्के धावा एकट्याने काढल्या. दरम्यान, दिल्लीकडून इशांत शर्मा याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. अक्षर पटेल, प्रविण दुबे, कुलदीप यादव आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
Punjab Kings batters tonight:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 13, 2023
Prabhsimran Singh - 103 (65).
Others all combined - 51 (55).
- The Prabhsimran madness in Delhi tonight! pic.twitter.com/sHH3GVx1nu
गुणतालिकेतील स्थिती काय ?
आयपीएल गुणतालिकेमध्ये पंजाब किंग्स संघ आठव्या स्थानावर आहे. संघाकडे दहा गुण आहेत. पंजाब संघाने आतापर्यंतच्या 11 सामन्यांपैकी पाच सामने जिंकले तर सहा सामने गमावले आहेत. या उलट दिल्ली कॅपिटल्स संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी असून संघाकडे आठ गुण आहेत. दिल्ली संघाला यंदाच्या हंगामातील 11 पैकी फक्त चार सामने जिंकता आले असून सात सामन्यांमध्ये संघाला पराभव पत्करावा लागला आहे.