(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'कॅप्टन कुल'कडून राजस्थानच्या खेळाडूंचं कौतुक! बटलर, सॅमसन नाही 'हे' दोन युवा खेळाडू भरलेत धोनीच्या नजरेत
MS Dhoni Praised RR Players : चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कर्णधार महेंद्र सिंह धोनीनं सामन्यानंतर राजस्थान रॉयल्स (RR) संघातील दोन तरुण खेळाडूंचं कौतुक केलं.
MS Dhoni Praised Yashasvi Jaiswal and Dhruv Jurel : आयपीएल 2023 च्या (IPL 2023) 37 व्या सामन्यात चेन्नई (CSK) संघाला राजस्थानच्या (RR) घरच्या मैदानावर रंगलेल्या पराभव पत्करावा लागला. चेन्नई सुपर किंग्सवर राजस्थान रॉयल्सने 32 धावांनी विजय मिळवला. या सामन्यानंतर चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीनं (MS Dhoni) राजस्थान संघातील दोन तरुण खेळाडूंचं कौतुक केलं. यावेळी धोनीनं राजस्थानच्या संघाचंही कौतुक केलं. धोनीनं म्हटलं की, राजस्थान संघाने चेन्नई संघापुढे मोठ्या धावसंख्येचं आव्हानं दिलं, त्यामुळे चेन्नईचा पराभव झाला.
IPL 2023, MS Dhoni : 'कॅप्टन कुल'कडून राजस्थानच्या खेळाडूंचं कौतुक
जयपूरमध्ये रंगलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सचा 32 धावांनी पराभव केला. राजस्थाननं 20 षटकांत 5 गडी गमावून 202 धावांचं आव्हान दिलं. लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईचा संघाला 20 षटकांत 6 गडी गमावून 170 धावा करता आल्या. चेन्नईकडून शिवम दुबेने 33 चेंडूत 52 धावा केल्या. त्याचवेळी ऋतुराज गायकवाडने 29 चेंडूत 47 धावांची खेळी केली. आयपीएलमधील हा राजस्थानचा 200 वा सामना होता आणि त्यांनी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा 200 हून अधिक धावा केल्या आणि सामन्यात दमदार विजयही मिळवला. धोनीनं सामन्यानंतर राजस्थानच्या दोन खेळाडूंचं कौतुक केलं.
IPL 2023, CSK vs RR : 'हे' दोन युवा खेळाडू भरले धोनीच्या नजरेत
सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना धोनीनं राजस्थानच्या यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि ध्रुव जुरेलचं (Dhruv Jurel) कौतुक केलं. धोनी म्हणाला की, ''यशस्वी जैस्वालने खूप चांगली फलंदाजी केली. गोलंदाजांना लक्ष्य करणे आणि जोखीम घेणं महत्त्वाचं होतं. शेवटपर्यंत ध्रुव जुरेलनं चांगली फलंदाजी केली. त्यांनी स्पर्धात्मक स्कोअरपेक्षा जास्त धावसंख्या उभारली आणि आम्ही पॉवरप्लेमध्ये चांगली कामगिरी करु शकलो नाही. पहिल्या सहा षटकांतील अपेक्षित खेळी न केल्यामुळे आमच्यासाठी विजय मिळवणं कठीण झालं होतं.''
IPL 2023, RR vs CSK : राजस्थानकडून चेन्नईचा पराभव
राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सवर 32 धावांनी विजय मिळवला. राजस्थान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थानने 20 षटकांत 5 गडी गमावून 202 धावा केल्या. राजस्थानचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालनं 43 चेंडूत 77 धावांची सर्वाधिक खेळी केली. यामध्ये त्याने आठ चौकार आणि चार षटकार ठोकले. ध्रुव जुरेलने 15 चेंडूत 34 धावांची स्फोटक खेळी केली. यावेळी त्याने तीन चौकार, दोन षटकार मारले. प्रत्युतरात चेन्नई संघ 20 षटकांत 170 धावाच करु शकला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :