(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2023 Points Table : चेन्नईचा पराभव करून राजस्थान पुन्हा अव्वल, धोनीच्या संघाला नुकसान
RR vs CSK IPL 2023 : चेन्नई सुपर किंग्सला राजस्थान रॉयल्स संघाकडून पराभवाचा सामन करावा लागला. या विजयासोबतच राजस्थान संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानी पोहोचला आहे.
IPL 2023 Points Table Update : आयपीएल 2023 (IPL 2023) मधील 37 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स (RR) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) या दोन संघात लढत पाहायला मिळाली. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या रोमांचक सामन्यात चेन्नईला राजस्थानकडून पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आरआरने 20 षटकांत 5 गडी गमावून 202 धावा केल्या.
चेन्नईचा पराभव करून राजस्थान पुन्हा अव्वल
आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ 20 षटकांत 6 गडी गमावून 170 धावाच करू शकला. राजस्थानने चेन्नईवर 23 धावांनी विजय मिळवला. या राजस्थानने चेन्नईकडून पहिलं स्थान हिसकावून घेतलं आहे. चेन्नईविरुद्धच्या सामन्यातील विजयासोबतच राजस्थान संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. चेन्नई संघाच्या पराभवानंतर संघाचं गुणतालिकेतील पहिलं स्थान गेलं असून संघाचं स्थान घसरलं आहे.
धोनीच्या संघाला नुकसान
चेन्नई सुपर किंग्स आता गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या स्थानी असलेल्या राजस्थान संघाकडे 10 गुण असून संघाचा नेट रनरेट 0.939 इतका आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर गतविजेता गुजरात टायटन्स संघ आहे. गुजरात संघाकडेही 10 गुण आणि 0.580 नेट रनरेट आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या चेन्नई संघाकडेही 10 गुण आणि 0.376 नेट रनरेट आहे. पहिल्या तीन स्थानावर असलेल्या संघाकडे प्रत्येकी 10-10 गुण आहेत, पण संघांचा नेट रनरेट वेगवेगळा आहे.
IPL 2023 Points Table - RR replaces CSK as the new Table Toppers! pic.twitter.com/WmY4LHJi5G
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 27, 2023
इतर संघांची परिस्थिती काय?
गुणतालिकेत पहिल्या तीन स्थानाव्यतिरिक्त इतरं सघांच्या स्थितीत कोणताही बदल झालेला नाही. लखनौ चौथ्या तर बंगळुरु पाचव्या स्थानावर आहे. लखनौ सुपर जायंट्स संघाने 7 पैकी चार सामन्यात विजय मिळवला असून संघाकडे 8 गुण आणि 0.547 नेट रनरेट आहे. बंगळुरु संघाने 8 पैकी चार सामन्यात विजय मिळवला असून संघाकडे 8 गुण आणि 0.139 नेट रनरेट आहे.
मुंबई इंडियन्स कोणत्या स्थानावर?
पंजाब किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत. पंजाब किंग्स संघ 7 पैकी 4 सामन्यात विजयानंतर 8 गुण आणि -0.162 नेट रनरेटसह सहाव्या क्रमांकावर आहे. कोलकाता संघाकडे 6 गुण आणि -0.027 नेट रनरेट असून संघ सातव्या क्रमांकावर आहे. मुंबई इंडियन्स आठव्या क्रमांकावर आहे. मुंबईने आतापर्यंत 7 पैकी 3 सामन्यांमध्ये विजय मिळवला असून संघाकडे 6 गुण आणि - 0.620 नेट रनरेट आहे. सनरायझर्स हैदराबाद संघ 7 सामन्यांपैकी 2 सामन्यांत विजय मिळवल्यानंतर संघ 4 गुण आणि -0.725 नेट रनरेटसह नवव्या क्रमांकावर आहे. गुणतालिकेत सर्वात दिल्ली कॅपिटल्स संघ शेवटच्या क्रमांकावर आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने 7 पैकी 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. संघ 4 गुण आणि -0.961 नेट रनरेटसह दहाव्या स्थानावर आहे.