Kuldip Yadav in IPL : तीन वर्षांची प्रतिक्षा संपली; कुलदीप यादवची आयपीएलमधील पहिली विकेट, शिवम दुबेला धाडलं माघारी
CSK vs RR Kuldip Yadav : राजस्थान रॉयल्स संघाचा वेगवान गोलंदाज कुलदीप यादवनं चेन्नई विरोधातील सामन्यात त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिली विकेट घेतली आहे.
Kuldip Yadav in IPL 2023 : आयपीएलमधील 37 व्या (IPL 2023) सामन्यात राजस्थान रॉयल्स (RR) संघाने चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) पराभव केला. राजस्थान संघाने 32 धावांनी चेन्नई विरुद्धचा सामना जिंकला. या सामन्यात राजस्थानच्या एका नवख्या गोलंदाजानं सर्वांचं लक्ष वेधलं. राजस्थान रॉयल्समधील वेगवान गोलंदाल कुलदीप यादव यानं चेन्नई विरुद्धच्या सामन्यात तुफान फलंदाजी केली. राजस्थान रॉयल्स संघाचा वेगवान गोलंदाज कुलदीप यादवनं चेन्नई विरोधातील सामन्यात त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिली विकेट घेतली आहे. तीन वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर कुलदीप हा दिवस सोनियाचा ठरला.
कुलदीप यादवनं घेतली आयपीएलमधील पहिली विकेट
शिमरॉन हिटमायरच्या जागी राजस्थान रॉयल्स संघानं कुलदीप यादवला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून संधी देण्यात आली आणि त्यानं या संधीचं सोनं केलं. कुलदीपनं तीन षटकांत फक्त 18 धावा देत महत्त्वाची विकेट घेतली. कुलदीपनं चेन्नईचा फलंदाज शिवम दुबेला जोस बटलरकडून झेलबाद केलं. महत्त्वाचं म्हणजे सलग तीन वर्ष आयपीएलमध्ये सामील होऊनही त्याला ही विकेट घेण्याची संधी मिळाली नव्हती. कुलदीप यादवनं आयपीएल 2021 मध्ये राजस्थान संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं. पण तो हा एकच सामना खेळला. त्यानंतर 2023 मधील चेन्नई विरुद्धचा सामना त्याच्या आयपीएलच्या कारकिर्दीतील दुसरा सामना आहे.
तीन वर्षांची प्रतिक्षा संपली
कुलदीप यादव हा भारतीय क्रिकेटपटू कुलदीप यादवप्रमाणे (Indian Cricketer Kuldeep Yadav) स्पिनर नसून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा वेगवान गोलंदाज आहे. हा कुलदीप यादव डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. कुलदीप यादवला आयपीएल 2021 च्या लिलावात राजस्थान रॉयल्सने 20 लाख रुपयांना खरेदी केलं होतं. त्याचा हा पहिला आयपीएल हंगाम होता. आयपीएल 2021 मध्ये मुंबई विरुद्धच्या सामन्यात त्यानं आयपीएलमध्ये पदार्पण केलं. आयपीएल 2022 मध्येही राजस्थान संघानं त्याला खरेदी केलं. पण, या हंगामात त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर यंदाच्या हंगामातही राजस्थान संघानं कुलदीप यादवला संघात सामील केलं. चेन्नई विरोधातील सामन्यात त्यांला यंदाच्या मोसमातील पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली.
He is Kuldip yadav, played his first match today, brilliantly bowled with 18 runs in 3 overs, took wicket of dangerous Shivam Dubey and make his team won.
— Dr Nimo Yadav (@niiravmodi) April 27, 2023
But you won’t see any cricketer praising him like they did for Arjun Tendulkar when he got the wicket of Bhuvi.
#CSKvsRR pic.twitter.com/ST3c0P8L2e
Who is Kuldip Yadav : कोण आहे कुलदीप यादव?
कुलदीप यादव 26 वर्षांचा आहे. त्याचा जन्म 15 ऑक्टोबर 1996 रोजी हरियाणामधील गुरुग्राम जिल्ह्यातील पतौडी येथे झाला. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्ली संघाकडून खेळतो. कुलदीप डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. 2019 मध्ये तो U-23 भारतीय संघाचा भाग होता. तो 2021 पासून आयपीएल फ्रेंचायझी राजस्थान रॉयल्सचा भाग आहे. तीन वर्षांच्या या काळात मागील दोन हंगामात त्याला फक्त एकच सामना खेळता आला. 2021 मुंबई मध्ये मुंबई इंडियन्स विरोधातील सामन्यात त्यानं आयपीएलमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तो बेंचवरच होता. आता आयपीएल 2023 मध्ये त्याला राजस्थाननं खेळण्याची संधी दिली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :