एक्स्प्लोर

MI vs CSK Playing 11 : धोनी की रोहित शर्मा? वानखेडेवर मुंबई पहिला विजय मिळवणार? 'हे' 11 खेळाडू रणांगणात उतरणार

IPL 2023, MI vs CSK : मुंबई आणि चेन्नई यांच्यातील सामना 8 एप्रिल रोजी संध्याकाळी 7.30 वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळवला जाईल.

Mumbai Indians vs Chennai Super Kings : आयपीएल 2023 (IPL 2023) मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात आज चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. मुंबई (Mumbai Indians) आणि चेन्नई (Chennai Super Kings) यांच्यात 8 एप्रिल रोजी, शनिवारी संध्याकाळी 7.30 वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळवला जाईल. पहिला विजय मिळवून खातं उघडण्यासाठी मुंबई इंडियन्स सज्ज झाली आहे. धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नई सुपर किंग्स आणि रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स असा रोमांचक सामना आज पाहायला मिळणार आहे. 

IPL 2023 Match 12 : मुंबई खातं उघडणार की चैन्नई बाजी मारणार?

आतापर्यंत मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल 2023 मध्ये एक सामना खेळला असून, त्यात त्यांचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून पराभव झाला आहे. दुसरीकडे, दोन सामने खेळलेल्या लखनौ सुपर जायंट्सने एक सामना जिंकला तर दुसऱ्या सामन्यात त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे हा सामना दोन्ही संघासाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे.

Wankhede Stadium Pitch Report : वानखेडे स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?

आयपीएल 2023 मध्ये 8 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात वानखेडे स्टेडिअमवर सामना पाहायला मिळणार आहे. मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. मुंबई संघाच्या खेळाडूंना वानखेडेवर खेळताना पाहायला मिळणार आहे. घरच्या मैदानावर दोन वर्षानंतर घरवापसी करत मुंबई इंडियन्स पहिला विजय मिळवून यंदाच्या मोसमात खातं उघडण्याचा प्रयत्न करेल. 

वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या आठ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नऊ वेळा 180 हून अधिक धावसंख्या पाहायला मिळाली आहे. यामध्ये चार वेळा 200 चा टप्पा ओलांडला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय मधील सर्वोच्च धावसंख्या 240/3 आहे. आयपीएलमध्येही असाच प्रकार घडला आहे. येथील सपाट विकेटवर गोलंदाजांना विशेष मदत मिळत नाही. येथील सीमा लहान आहेत आणि आऊटफिल्ड खूप वेगवान आहे.

CSK vs MI Probable Playing XI : संभाव्य प्लेईंग 11

MI Probable Playing XI : मुंबई संभाव्य प्लेईंग 11

रोहित शर्मा (कर्णधार), तिलक वर्मा, सुर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, ह्रतिक शोकीन, नेहाल वढेरा, कॅमेरॉन ग्रीन, पियुष चावला, अर्शद खान, ईशान किशन (विकेटकीपर), जोफ्री आर्चर

CSK Playing XI : चेन्नई संभाव्य प्लेईंग 11

ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अंबाती रायडू, बेन स्टोक्स, मोईन अली, रविंद्र जडेजा, शिवम दुबे, मिचेल सँटनर, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), दीपक चहर, आरएस हंगरगेकर

IPL 2023, MI vs CSK : लाईव्ह सामना कुठे पाहाल?

आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

MI vs CSK, Preview : रोहित विरुद्ध धोनी, वानखेडेवर जंगी सामना; मुंबई पलटण पहिला विजय मिळवणार की, चेन्नई मुंबईचं स्वप्न धुळीस मिळवणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election: जिथे शिवसेना जिंकली, ती जागाही आम्हालाच हवी, भाजपने बंडखोर आणि नंबर दोनचे गणित मांडलं, नव्या पॅटर्नने शिंदेसेना बुचकळ्यात
जिथे शिवसेना जिंकली, ती जागाही आम्हालाच हवी, भाजपने बंडखोर आणि नंबर दोनचे गणित मांडलं, नव्या पॅटर्नने शिंदेसेना बुचकळ्यात
Maharashtra Weather Today: राज्यभरात गारठा वाढला! नगर 8.5 अंशांवर, पुणेकरांनाही हुडहुडी; पुढील 2 दिवसात हवामान बदलणार
राज्यभरात गारठा वाढला! नगर 8.5 अंशांवर, पुणेकरांनाही हुडहुडी; पुढील 2 दिवसात हवामान बदलणार
मग अमित शाहांना कशासाठी भेटता? वाल्मिक कराडमागे कोणती अदृश्य शक्ती होती, संतोष देशमुखांच्या हत्येनंतर कोणाची फोनाफोनी? सुप्रिया सुळेंचा धनुभाऊंच्या कमबॅकला कडाडून विरोध
मग अमित शाहांना कशासाठी भेटता? वाल्मिक कराडमागे कोणती अदृश्य शक्ती होती, संतोष देशमुखांच्या हत्येनंतर कोणाची फोनाफोनी? सुप्रिया सुळेंचा धनुभाऊंच्या कमबॅकला कडाडून विरोध
Dhurandhar Box Office Collection Day 13: 'धुरंधर'नं बॉक्स ऑफिस गाजवलं, दिग्गजांना लोळवलं; 'बाहुबली'च्या रेकॉर्ड्सचा चक्काचूर
'धुरंधर'नं बॉक्स ऑफिस गाजवलं, दिग्गजांना लोळवलं; 'बाहुबली'च्या रेकॉर्ड्सचा चक्काचूर

व्हिडीओ

Sanjay Raut PC : ...तर एकनाथ शिंदे जेलमध्ये जातील, संजय राऊतांनी सगळंच काढलं
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंवर'महाशक्ती' प्रसन्न? मंत्रिपदाचा प्रसाद मिळणार? Special Report
Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election: जिथे शिवसेना जिंकली, ती जागाही आम्हालाच हवी, भाजपने बंडखोर आणि नंबर दोनचे गणित मांडलं, नव्या पॅटर्नने शिंदेसेना बुचकळ्यात
जिथे शिवसेना जिंकली, ती जागाही आम्हालाच हवी, भाजपने बंडखोर आणि नंबर दोनचे गणित मांडलं, नव्या पॅटर्नने शिंदेसेना बुचकळ्यात
Maharashtra Weather Today: राज्यभरात गारठा वाढला! नगर 8.5 अंशांवर, पुणेकरांनाही हुडहुडी; पुढील 2 दिवसात हवामान बदलणार
राज्यभरात गारठा वाढला! नगर 8.5 अंशांवर, पुणेकरांनाही हुडहुडी; पुढील 2 दिवसात हवामान बदलणार
मग अमित शाहांना कशासाठी भेटता? वाल्मिक कराडमागे कोणती अदृश्य शक्ती होती, संतोष देशमुखांच्या हत्येनंतर कोणाची फोनाफोनी? सुप्रिया सुळेंचा धनुभाऊंच्या कमबॅकला कडाडून विरोध
मग अमित शाहांना कशासाठी भेटता? वाल्मिक कराडमागे कोणती अदृश्य शक्ती होती, संतोष देशमुखांच्या हत्येनंतर कोणाची फोनाफोनी? सुप्रिया सुळेंचा धनुभाऊंच्या कमबॅकला कडाडून विरोध
Dhurandhar Box Office Collection Day 13: 'धुरंधर'नं बॉक्स ऑफिस गाजवलं, दिग्गजांना लोळवलं; 'बाहुबली'च्या रेकॉर्ड्सचा चक्काचूर
'धुरंधर'नं बॉक्स ऑफिस गाजवलं, दिग्गजांना लोळवलं; 'बाहुबली'च्या रेकॉर्ड्सचा चक्काचूर
दोन मंत्री भ्रष्टाचार, गुंडागर्दीवरून गेले हा सरकारला लागलेला काळीमा, भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण हा संदेश राज्यात फडणवीस, दिल्लीत अमित शाह देतात; संजय राऊतांचा सडकून प्रहार
दोन मंत्री भ्रष्टाचार, गुंडागर्दीवरून गेले हा सरकारला लागलेला काळीमा, भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण हा संदेश राज्यात फडणवीस, दिल्लीत अमित शाह देतात; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Crime News: भयानक हत्याकांडांने देश हादरला, मुलाने आई-वडिलांनी वरंवट्याने ठेचून मारले, करवतीने मृतदेहांचे तुकडे करुन नदीत फेकले
भयानक हत्याकांडांने देश हादरला, मुलाने आई-वडिलांनी वरंवट्याने ठेचून मारले, करवतीने मृतदेहांचे तुकडे करुन नदीत फेकले
Smruti Mandhana: वैयक्तिक वादळातून सावरत स्मृती मानधना नव्या आत्मविश्वासात पुन्हा समोर; पांढऱ्याशुभ्र वनपीसमध्ये अवतरली, Photos
वैयक्तिक वादळातून सावरत स्मृती मानधना नव्या आत्मविश्वासात पुन्हा समोर; पांढऱ्याशुभ्र वनपीसमध्ये अवतरली, Photos
तुळजापुरातील दोन गटातील राड्यात भाजप आमदाराच्या पीएचं नाव; ड्रग्ज तस्करीनंतर तुळजापुरात गावठी कट्टे वापराचा मुद्दा तापला
तुळजापुरातील दोन गटातील राड्यात भाजप आमदाराच्या पीएचं नाव; ड्रग्ज तस्करीनंतर तुळजापुरात गावठी कट्टे वापराचा मुद्दा तापला
Embed widget