IPL 2023 : मुंबई इंडियन्सची दोन वर्षानंतर घरवापसी; वानखेडेवर उतरणार MI, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
MI return to Wankhede : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) दोन वर्षानंतर वानखेडे स्टेडिअमवर घरवापसी केली आहे. मागील सीझनमधील पराभवाचा बदला घेण्यासाठी मुंबई संघ यंदा नव्या जोमाने मैदानात उतरणार आहे.
MI Playing XI, Team Strategy : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी खूशखबर आहे. मुंबई इंडियन्स संघाने वानखेडे स्टेडिअमवर (Wankhede Stadium) घरवापसी केली आहे. दोन वर्षानंतर मुंबई संघ वानखेडे स्टेडिअमवर उतरला आहे. कोरोनामुळे (Coronavirus) मुंबई इंडियन्स संघ दोन वर्षांपासून वानखेडे स्टेडियमवर सामने खेळू शकला नाही. मात्र, मुंबई इंडियन्सने आता घरवापसी करत वानखेडे स्टेडियमवर सराव सुरू केला आहे. तसेच मुंबई संघाचा यंदाच्या हंगामातील दुसरा सामना वानखेडे स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना त्यांच्या आवडत्या खेळाडूंना घरच्या मैदानावर खेळताना पाहायला मिळणार आहे. सध्या क्रिकेटप्रेमींचं लक्ष आयपीएलच्या 16 (IPL 2023) व्या हंगामाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
IPL 2023, MI on Wankhede : मुंबई इंडियन्सची दोन वर्षानंतर घरवापसी
गेल्या दोन वर्षांपासून मुंबई इंडियन्सचे चाहत्यांना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आपल्या आवडत्या संघाचा खेळ पाहता आला नव्हता. पण आता मात्र, मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. मुंबई संघाच्या खेळाडूंना वानखेडेवर खेळताना पाहायला मिळतंय. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स पहिला सामना बंगळुरुमधील एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. तर मुंबई इंडियन्सचा दुसरा चेन्नई सुपर किंग्स विरुद्धचा सामना वानखेडे स्टेडिअमवर 8 एप्रिल रोजी होणार आहे.
IPL 2023 : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
मुंबई इंडियन्स (MI) संघाचा यंदाच्या हंगामातील पहिला सामना 2 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्ध रंगणार आहे. त्याआधी मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी तब्बल दोन वर्षांनी वानखेडे स्टेडियमवर सराव सुरू केला आहे. दोन वर्षांनंतर घरच्या मैदानावर परतल्याने खेळाडूंनाही दिलासा मिळाला आहे.
IPL 2023 : रोहित शर्माचा आत्मविश्वास वाढला
गेल्या आयपीएलमध्ये 15 व्या हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी खूपच खराब होती. रोहित शर्माच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. गेल्या वर्षभरात रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अनेक विजय मिळवले आहेत. यामुळे रोहित शर्माचा आत्मविश्वास वाढला आहे. याचा मुंबई इंडियन्स संघाला नक्कीच फायदा होईल.
Mumbai Indians : IPL 2022 मध्ये मुंबईची कामगिरी निराशाजनक
आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी निराशाजनक होती. मुंबई इंडियन्सच्या संघाला 14 सामन्यांपैकी फक्त चार सामने जिंकता आले होते तर, 10 सामन्यांमध्ये त्यांच्या पराभव झाला होता. आयपीएलच्या 15 सीझनमध्ये मुंबई संघ पहिल्यांदा पॉईट्स टेबलमध्ये खाली होता. मात्र यंदा मुंबई इंडियन्स नव्या जोमाने मैदानात उतरणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे.
Mumbai Indians Playing 11 : मुंबई इंडियन्स प्लेईंग 11
रोहित शर्मा, कॅमेरॉन ग्रीन, इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, हृतिक शोकीन, जोफ्रा आर्चर, शम्स मुलानी/अर्जुन तेंडुलकर, पियुष चावला/कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडॉर्फ
महत्त्वाच्या इतर बातम्या :