IPL 2023, MI Playing 11 : हार का बदला जीत से... नव्या जोमाने आयपीएलमध्ये उतरणार मुंबई इंडियन्स, प्लेईंग 11 मध्ये कुणाला संधी?
Mumbai Indians Playing 11, IPL 2023 : रोहित शर्मा आणि कॅमेरॉन मुंबईसाठी आक्रमक सुरुवात करतील, तर ईशान किशन तिसऱ्या क्रमांकावर उतरण्याची अपेक्षा आहे आणि सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर असेल.
IPL 2023, Mumbai Indians Playing 11 : आजपासून आयपीएलच्या 16 व्या (Indian Premier League 2023) हंगामाला सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या मागील हंगामात मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी निराशाजनक होती. मुंबई इंडियन्सच्या संघाला 14 सामन्यांपैकी फक्त चार सामने जिंकता आले होते तर, 10 सामन्यांमध्ये त्यांच्या पराभव झाला होता. आयपीएलच्या 15 सीझनमध्ये मुंबई संघ पहिल्यांदा पॉईट्स टेबलमध्ये खाली होता. मात्र यंदा मुंबई इंडियन्स नव्या जोमाने मैदानात उतरणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे.
IPL 2023 : नव्या जोमाने आयपीएलमध्ये उतरणार मुंबई इंडियन्स
कर्णधार रोहित शर्मा आणि कॅमेरॉन ग्रीन मुंबईसाठी आक्रमक सुरुवात करतील, तर ईशान किशन तिसऱ्या क्रमांकावर उतरण्याची अपेक्षा आहे आणि सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर असेल. तर जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे गोलंदाजीची जबाबदारी इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरवर असेल. मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11 कशी असेल जाणून घ्या.
Mumbai Indians Playing 11 : मुंबई इंडियन्स प्लेईंग 11
रोहित शर्मा, कॅमेरॉन ग्रीन, इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, हृतिक शोकीन, जोफ्रा आर्चर, शम्स मुलानी/अर्जुन तेंडुलकर, पियुष चावला/कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडॉर्फ
Mumbai Indians Team : मुंबई इंडियन्स संघ
रोहित शर्मा, कॅमेरॉन ग्रीन, इशान किशन, जसप्रीत बुमराह, टीम डेव्हिड, सूर्यकुमार यादव, जोफ्रा आर्चर, डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, ऱ्हाय रिचर्डसन, जेसन बेहरेनडॉर्फ, पियुष चावला, अर्जुन तेंडुलकर, रमणदीप सिंह, शम्स मुलानी, नेहल कुमार वधेरा, हृतिक शोकीन, आकाश मधवाल, अर्शद खान, राघव गोयल, डुआन जॅनसेन, ट्रिस्टन स्टब्स, आणि विष्णू विनोद
MI साठी IPL 2023 वेळापत्रक
2 एप्रिल 2023 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स, बेंगळुरू
8 एप्रिल 2023 : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, मुंबई
11 एप्रिल 2023 : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, दिल्ली
16 एप्रिल 2023 : मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, मुंबई
18 एप्रिल 2023 : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, हैदराबाद
22 एप्रिल 2023 : मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स, मुंबई
25 एप्रिल 2023 : गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, अहमदाबाद
30 एप्रिल 2023 : मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, मुंबई
3 मे 2023 : पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, मोहाली
6 मे 2023 : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, चेन्नई
9 मे 2023 : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई
12 मे 2023 : मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स, मुंबई
16 मे 2023 : लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, लखनौ
21 मे 2023 : मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, मुंबई