एक्स्प्लोर

GT vs SRH Toss Update : विजय शंकर बाहेर, शनाका आत, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11

GT vs SRH, IPL 2023 : हैदराबादचा कर्णधार एडन मार्करम याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे

GT vs SRH, IPL 2023 : हैदराबादचा कर्णधार एडन मार्करम याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या डावात दव पडण्याची शक्यता असल्याचे मार्करम नाणेफेकीवेळी म्हणाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गुजरातचा संघ प्रथम फलंदाजी करणार आहे. प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी हैदराबादला आजचा सामना जिंकणे अनिवार्य आहे. तर दुसरीकडे क्वालिफायरचे स्थान पक्के करण्यासाठी गुजरातला विजय गरजेचा आहे. त्यामुळे आजचा सामना अधिक रोमांचक होण्याची शक्यात आहे. गुजरातच्या संघात दसुन शनाका याचे गुजरातकडून पदार्पण झालेय. विजय शंकर दुखापतीमुळे आजच्या सामन्याला मुकणार आहे.

गुजरात टायटन्सची प्लेइंग 11
वृद्धीमान साहा, शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), दसुना शनाका, साई सुदर्शन, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, नूर अहमद, मोहित शर्मा, मोहम्मद शमी 

 Saha, Gill, Sudharsan, Hardik, Miller, Shanaka, Tewatia, Rashid, Mohit, Shami, Noor.

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग 11

अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडम मार्करम, हेनरिक क्लासेन, सनवीर, जानसेन, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, मयंक मार्कंडेय, फजलहक फारूकी

Abhsishek, Tripathi, Markram, Klaasen, Samad, Sanvir, Jansen, Markande, Bhuvneshwar, Farooqi, Natarajan.

पॉईंट टेबलची परिस्थिती काय? 
गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्या पॉईंट टेबलमधील स्थितीबाबत बोलायचं तर, जीटी 16 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. गुजरातनं आतापर्यंतच्या 12 सामन्यांपैकी 8 सामने जिंकले आहेत आणि 4 सामन्यांत पराभव झाला आहे. दुसरीकडे, SRH बद्दल बोलायचं तर, संघ 8 गुणांसह 8 व्या स्थानावर आहे. संघ सीरिजमधून जवळपास बाहेर पडला असला तरी, आपले उर्वरित तिनही सामने जिंकले, तर तो 14 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करूच शकणार नाही. दरम्यान, प्लेऑफमध्ये जाण्यासाठी GT ला उर्वरित दोन सामन्यांपैकी फक्त एकच जिंकावा लागेल.

प्लेऑफवर गुजरातची नजर
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सची नजर प्लेऑफवर असेल. हार्दिक पांड्याच्या संघाला अंतिम चारमध्ये प्रवेश करण्यासाठी फक्त एका विजयाची गरज आहे. जर गुजरात टायटन्स हैदराबादविरुद्ध जिंकला तर आयपीएल 2023 च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा तो पहिला संघ ठरेल. आयपीएलच्या 16व्या हंगामात गुजरातनं आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. यादरम्यान त्यानं 12 सामने खेळले आहेत, ज्यात 8 सामने जिंकले आणि 4 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. 16 गुणांसह गुजरात टायटन्सचा संघ पहिल्या स्थानावर कायम आहे.

नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीबद्दल सर्व काही...
नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीबद्दल बोलायचं झालं तर ती लाल आणि काळ्या मातीनं बनलेली आहे. दुसरीकडे, काळी माती थोडी घन असते तर लाल माती थोडी मऊ असते. या मैदानावर फिरकी गोलंदाजीला खूप मदत मिळते. अशा स्थितीत फलंदाजांसमोर फिरकी गोलंदाजांचं आव्हान असणार यात काही शंकाच नाही. 
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा  संपर्क तुटला
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MCA Stadium : एमसीए उभारणार ठाण्यामध्ये भव्य स्टेडियम, सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षाManoj Jarnage Parbhani : मनोज जरांगेेंचा परभणीत प्रवेश, शांतता रॅली मराठ्यांची गर्दीABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 07 July 2024Worli Hit and Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी बारमध्ये पार्टी करायला गेला होता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा  संपर्क तुटला
ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
Kolhapur News : शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
Embed widget