IPL 2023 : आयपीएलमधील LED स्टंपची किंमत माहितीय? अनेक खेळाडूंच्या आयपीएलमधील मानधनापेक्षाही महाग
IPL 2023 : अनेक खेळाडूंच्या आयपीएलमधील मानधनापेक्षाही LED स्टंप महाग आहेत. किंमत माहितीय का?
LED Stumps : सध्या आयपीएलचा (IPL 2023) सोळावा हंगाम सुरु आहे. 31 मार्चपासून आयपीएल 2023 ला सुरुवात झाली आहे. देश-विदेशातील खेळाडू इंडियन प्रीमियरमध्ये खेळताना पाहायला मिळतात. अनेक खेळाडूंची लिलावामध्ये लाखो-करोडो रुपयांची बोली लागली आहे. सध्या सर्वत्र आयपीएल फिवर पाहायला मिळत आहे. टी 20 च्या या झगमगाट एका गोष्टीकडे तुमची नजर नक्कीच गेली असेल, ती वस्तू म्हणजे एलडईडी स्टंप. या एलईडी स्टंपची किंमत तुम्हाला माहिती आहे का, नसेल तर येथे जाणून घ्या.
अनेक खेळाडूंच्या आयपीएलमधील मानधनापेक्षाही महाग
एखाद्या साध्या स्टंपप्रमाणे दिसणारे हे स्टंप दिसायला जरी साध्या स्टंपप्रमाणे दिसत असले, तरी त्याची किंमत ऐकून तुम्ही अवाक व्हाल. आयपीएलमध्ये वापरले जाणारे एलईडी स्टंप खूप महाग आहेत. अनेक खेळाडूंच्या आयपीएलमधील पगारापेक्षा या स्टंपची किंमत खूप जास्त आहे. इतकंच नाही, तर या स्टंपची किंमत 'प्लेअर ऑफ द मॅच'च्या बक्षीस रकमेपेक्षा 50 ते 70 पट जास्त आहे.
किंमत माहितीय का?
एलईडी स्टंपचा (LED Stump) एक संच (Set) सुमारे 25 ते 35 लाख रुपये किंमतीचा असतो. म्हणजेच, एका सामन्यात वापरलेले दोन्ही सेटची किंमत 50 ते 70 लाखांच्या दरम्यान आहे. एलईडी स्टंपची किंमत विविध देशांमध्ये वेगवेगळी आहे. त्यामुळे काही देशांमध्ये त्यांच्या किमतीत थोडा फरक दिसून येतो. आयपीएलमध्येही हेच एलईडी स्टंप वापरले जातात.
प्लेअर ऑफ द मॅच' बक्षीस रकमेहूनही जास्त
आयपीएलमध्ये असे अनेक खेळाडू आहेत ज्यांचे आयपीएल पगार 50 लाखांपेक्षा कमी आहे. यात अजिंक्य रहाणेसारख्या दिग्गजांचाही समावेश आहे. अशा स्थितीत स्टंपची किंमत एखाद्या खेळाडूच्या वर्षभराच्या आयपीएल पगारापेक्षा जास्त आहे, ही आश्चर्याची बाब आहे. जर एलईडी स्टंपची तुलना आयपीएलमध्ये मिळालेल्या 'प्लेअर ऑफ द मॅच' बक्षीस रकमेशी केली, तर या शर्यतीत हे स्टंपची किंमत 50 ते 70 पट अधिक महाग आहे.
पंचांना अचूक निर्णयासाठी होते मदत
क्रिकेटमध्ये पूर्वी फक्त लाकडापासून बनवलेले स्टंप वापरले जायचे. हळूहळू तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आधी स्टंपच्या बेल्स एलईडी स्वरूपात येऊ लागल्या आणि नंतर संपूर्ण स्टंपला एलईडी स्वरूप देण्यात आलं. एलईडी स्टंप दिसायला तर आकर्षकच असतातच त्याशिवाय तर तिसर्या पंचांना जवळच्या धावा आणि स्टंपिंगसारख्या निर्णयांमध्येही याची खूप मदत होते. चेंडू किंवा हात या स्टंपला स्पर्श करताच, या स्टंपमधील एलईडी चमकू लागतात, ज्यामुळे तिसऱ्या पंचांना निर्णय घेणं सोपं होतं.
LED स्टंपचा शोध कुणी लावला?
एलईडी स्टंपचा शोध ऑस्ट्रेलियाच्या ब्रॉन्टे अकरमन यांनी लावला होता. यानंतर त्यांनी डेव्हिड लेजिटवूडसोबत जिंग इंटरनॅशनल कंपनी स्थापन केली आणि आता ही कंपनी मोठ्या प्रमाणात असे एलईडी स्टंप बनवते.