IPL 2023, Russell vs Kohli : ईडन गार्डन्सवर रसलचा मोठा विक्रम, आंद्रेचा झंझावात कोलकाताला तारणार की कोहली 'विराट' खेळी करणार?
Andre Russell vs Virat Kohli : आयपीएल 2023 मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना रंगणार आहे. यावेळी रसल आणि कोहली या दोन स्टार क्रिकेटपटूंमध्ये लढत पाहायला मिळेल.
IPL 2023 KKR vs RCB : आज आयपीएल 2023 (IPL 2023) मधील नववा सामना कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) यांच्यात रंगणार आहे. कोलकाताच्या (KKR) ईडन गार्डन्स स्टेडिअमवर (Eden Gardens Stadium, Kolkata) संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे. यावेळी आंद्रे रसल (Andre Russell) आणि विराट कोहली (Virat Kohli) या दोन स्टार क्रिकेटपटूंमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. कोलकाता चार वर्षांच्या दीर्घ प्रतीश्रेनंतर घरच्या ईडन गार्डन्स मैदानावर उतरणार आहे. ईडन गार्डन्स मैदान फलंदाज आंद्रे रसलसाठी दुसरं घरं मानलं जातं. या मैदानावर त्याने तुफान खेळी केली आहे.
IPL 2023 RCB vs KKR : आंद्रे रसलचा विरुद्ध विराट कोहली लढत
कोलकातातील ईडन गार्डन्स मैदानावर आंद्रे रसलने एकूण 24 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 699 धावांचा पल्ला गाठला आहे. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 200 हून अधिकचा आहे. तसेच त्याने चार अर्धशतकंही झळकावली आहेत. त्यामुळे या सामन्या आंद्रे रसलचा झंझावात की कोहलीची 'विराट' खेळी नक्की काय पाहायला मिळतं हे उत्सुकतेच ठरणार आहे.
Andre Russell in Eden Gardens:
— Johns. (@CricCrazyJohns) April 6, 2023
Innings - 24
Runs - 699
Average - 41.12
Strike Rate - 200.86
Fifties - 4
He returns to his 2nd home today. pic.twitter.com/ctiMKYe96f
IPL 2023 KKR vs RCB : कोलकाता आणि आरसीबी संघ आमने-सामने
आयपीएलच्या 16 व्या हंगामात आज कोलकाता आणि आरसीबी हे दोन संघ आमने-सामने येणार आहे. कोहलीने आरसीबी संघाच्या यंदाच्या मोसमातील पहिल्याच सामन्यात दमदार अर्धशतकी खेळी केली. विराटने 82 धावांची नाबाद अशी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. आरसीबीने मुंबई इंडियन्स विरुद्धचा पहिला सामना आठ विकेट्सने जिंकला.
IPL RCB vs KKR : कोलकाताच्या मैदानावर आरसीबीची कसोटी
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि कोलकाता नाईट रायडर्स् (KKR) यांच्यात नववा सामना रंगणार आहे. हा सामना कोलकाताच्या घरच्या मैदानावर संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. दोन्ही संघांचा आज यंदाच्या मोसमातील (IPL 2023) दुसरा सामना असेल. याआधीच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्स (MI) विरोधात पहिला विजय मिळवला होता. त्यामुळे आरसीबी विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी मैदानावर उतरेल. तर कोलकाता आपल्या पहिल्या विजयासाठी रणांगणात उतरेल. आयपीएल 2023 मध्ये याआधीच्या सामन्या कोलकाता नाईट रायडर्सला पंजाब किंग्सकडून पराभवाचा सामना करावा लागला होता
महत्त्वाच्या इतर बातम्या :