एक्स्प्लोर

KKR vs RCB Match Preview : आरसीबी विजयाची मालिका कायम राखणार की कोलकाता पहिला विजय मिळवणार? कोण ठरणार वरचढ?

IPL 2023, RCB vs KKR Match Preview : आयपीएल 2023 मधील नववा सामना आज आरसीबी (RCB) आणि कोलकाता (KKR) यांच्यात रंगणार आहे.

Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders : इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि कोलकाता नाईट रायडर्स् (KKR) यांच्यात नववा सामना रंगणार आहे. हा सामना कोलकाताच्या घरच्या मैदानावर संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. दोन्ही संघांचा आज यंदाच्या मोसमातील (IPL 2023) दुसरा सामना असेल. याआधीच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्स (MI) विरोधात पहिला विजय मिळवला होता. त्यामुळे आरसीबी विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी मैदानावर उतरेल. तर कोलकाता आपल्या पहिल्या विजयासाठी रणांगणात उतरेल. आयपीएल 2023 मध्ये याआधीच्या सामन्या कोलकाता नाईट रायडर्सला पंजाब किंग्सकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

IPL 2023, RCB vs KKR Match Preview : आरसीबी आणि कोलकाता यांच्यात लढत

कोलकाता नाईट रायडर्स इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या हंगामातील त्यांच्या पहिल्या विजयासाठी तयारी करत आहेत. कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडिअमवर हा बहुप्रतीक्षित सामना होणार आहे. कोलकाताला यंदाच्या हंगामातील त्यांच्या पहिल्या सामन्यात पंजाब किंग्जकडून सात विकेट्सने पराभव पत्करावा लागला. पंजाब किंग्सने डकवर्थ लुईस नियमानुसार (DLS) कोलकाता नाईट रायडर्सवर सात धावांनी विजय मिळवला.

दुसरीकडे, बंगळुरू संघाने त्यांच्या आयपीएल 2023 च्या प्रवासाची विजयी सुरुवात केली. फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखाली आरसीबीने पाच वेळा आयपीएल चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सवर आठ गडी राखून शानदार विजय मिळवला. विराट कोहली हा सामन्याचा हिरो ठरला. कोहलीने शानदार 82 धावांची नाबाद खेळी करून बंगळुरूला विजय मिळवून दिला.

RCB vs KKR Head to Head : कुणाचं पारड जड?

आरसीबी आणि कोलकाता यांच्या आयपीएल स्पर्धेमध्ये एकूण 30 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये कोलकाता वरचढ ठरला आहे. कोलताताने 30 पैकी 16 सामने जिंकले तर, बंगळुरुला 14 सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. दोन्ही संघानी सर्वाधिक 200 हून अधिक धावांचा पल्ला गाठला आहे. त्यामुळे आजचा सामना रोमांचक ठरणार आहे.

कधी आणि कुठे होणार सामना?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि कोलकाता नाईट रायडर्स् (KKR) यांच्यातील सामना आज कोलकाता येथील ईडन गार्डन (Eden Gardens) मैदानावर रंगणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाणार असून त्याआधी 7 वाजता नाणेफेक होईल.

लाईव्ह सामना कुठे पाहाल?

स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग 'Jio Cinema' ॲपवर उपलब्ध असेल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

MI vs RCB, IPL 2023 : 'रन मशीन'चा धमाका! कोहलीची 'विराट' खेळी, रोहित शर्माकडूनही कौतुक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget