LSG vs GT, Match Highlights: गुजराती गोलंदाजांपुढे लखनौच्या नवाबांनी नांगी टाकली, राहुलची एकाकी झुंज, हार्दिकच्या संघाचा 7 धावांनी विजय
LSG vs GT : गुजरातने लखनौचा सात धावांनी पराभव केला. गुजरातविरोधात लखनौची पाठी कोरीच...
LSG vs GT, IPL 2023 : अटीतटीच्या लढतीत गुजरातने लखनौचा सात धावांनी पराभव केला. १३५ धावांचा बचाव करताना गुजरातच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा केला. लखनौच्या संघाने सात विकेटच्या मोबदल्यात १२८ धावांपर्यंत मजल मारली. केएल राहुलने एकाकी झुंज दिली. राहुलने ६१ चेंडूत ६८ धावांची खेळी केली. गुजरातने अखेरच्या पाच षटकात सामना आपल्या बाजूने फिरवला. मोहित शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी अखेरच्या षटकात भेदक मारा केला. लखनौच्या संघाला अखेरच्या ४६ चेंडूत एकही चौकार अथवा षटकार मारता आला नाही.
गुजरातने दिलेल्या १३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौने दमदार सुरुवात केली. केएल राहुल आणि काइम मायर्स यांनी पहिल्या चेंडूपासूनच धावाचा पाऊस पाडला. विशेषकरुन मायर्सने हल्लाबोल केला. राहुल आणि मायर्स यांनी सहा षटकात ५५ धावांची सलामी दिली. मायर्स याने १९ चेंडूत २४ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने एक षटकार आणि दोन चौकार लगावले आहेत. मायर्स बाद झाल्यानंतर कृणाल पांड्या आणि केएल राहुल यांनी लखनौचा डाव सावरला. कृणाल पांड्या आणि राहुल यांनीही अर्धशतकी भागिदारी केली. १४ षटकात लखनौने १०६ धावा केल्या होत्या. सामना लखनौ जिंकणार असेच वाटत होते.. पण नूर अहमद याने कृणाल पांड्याला बाद करत सामन्याचे चित्र पलटवले.
कृणाल पांड्या बाद झाल्यानंतर लखनौचा डाव कोसळला. दोन बाद १०६ नंतर अवध्या २० धावांत लखनौने आणखी पाच विकेट गमावल्या. क्रृणाल पांड्या बाद झाल्यानंतर निकोलस पूरन १, आयुष बडोनी ८, मार्कस स्टॉयनिस शून्य, दीपक हुड्डा दोन धावा काढून बाद झाले. केएल राहुल याने ६८ धावांचे योगदान दिले. केएल राहुल याने एकाकी झुंज दिली. पण राहुल याने ६१ चेंडूत ६८ धावा जोडल्या. राहुलचा स्ट्राईक रेट ११०च्या आसपास राहिला. जम बसलेला राहुल अखेरच्या षटकात मोक्याच्या क्षणी बाद झाला. त्यामुळे लखनौला पराभवाचा सामना करावा लागला. राहुलने ६८ धावांच्या खेळीत आठ चौकार लगावले आहेत.
गुजरातने अखेरच्या पाच षटकात सामना फिरवला. नूर अहमद, राशिद खान, मोहित शर्मा आणि मोहम्मद शामी यांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. चौकार आणि षटकार मारु दिले नाही. एकापाठोपाठ एक चेंडू निर्धाव टाकत लखनौच्या फलंदाजांवर दबाव निर्माण केला. लखनौच्या फलंदाजांना अखेरच्या ४६ चेंडूवर एकही चौकार अथवा षटकार लगावता आला नाही. गुजरातच्या गोलंदाजांनी अखेरच्या पाच षटकात सामना फिरवला. मोहित शर्माने २० व्या षटकात तीन विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमीने १९ व्या षटकात फक्त ५ धावा दिल्या.
गुजरातच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत लखनौच्या फलंदाजांना बाद केले. पहिल्या दहा षटकांपर्यंत लखनौच्या फलंदाजांनी वर्चस्व निर्माण केले होते. पण अखेरच्या षटकात गुजरातच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. मोहित शर्मा आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तर राशिद खान याने एक विकेट घेतली. लखनौचे दोन फलंदाज धावबाद झाले. मोहम्मद शामीने तीन षटकात १८ धावा दिल्या. जयंत यादवने चार षटकात २६ धाा खऱ्च केल्या. नूर अहमदन याने चार षटकात १८ धावा खर्च केल्या. हार्दिक पांड्याने एका षटकात सात धावा खर्च केल्या.