एक्स्प्लोर

Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडून घोषणा

Mallikarjun Kharge : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर भाष्य केलं आहे. शेतकऱ्यांच्या मुद्यांवर त्यांनी भाष्य केलं.

पुणे : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेला संबोधित केलं. महागाई वाढलेली आहे त्याच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लक्ष्य नाही. रोजगार, गुंतवणूक यावर त्यांचं लक्ष नाही, असं खर्गे म्हणाले. मुंबई सारखं शहर आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध आहे, बंगळुरु, चेन्नई, कोलकता  शहरात गुंतवणूक करण्यासाठी लोक जातात. तुम्ही विदेशात जाता तेव्हा कोण बंगळुरुत गुंतवणूक करत असेल, मुंबईत करत असेल, पुण्यात काही येत असेल तर चर्चा करत नाहीत, असं मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटलं. मल्लिकार्जुन खरगे यांनी सोयाबीन दराबाबत देखील मोठी घोषणा केली. 

मल्लिकार्जुन खरगे पुढं म्हणाले, इथं शेतकऱ्यांबाबत चर्चा होत नाही, विदर्भ, मराठवाडा आणि नाशिकला गेलो होतो. तिथं सर्वांची मागणी आहे सोयाबीनचे दर वाढवा, कापूस खरेदी करण्याची व्यवस्था करा, कांदा खरेदी करण्यासाठी व्यवस्था करा. या सर्वांची एमएसपी केंद्र सरकार ठरवते. याबाबत शेतकऱ्यांना मदत करण्यास तुम्ही काय केलं, असा सवाल मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. 

शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रासाठी महाविकास आघाडीच्या लोकांनी पंचसूत्रीचा कार्यक्रम दिला आहे. कांद्यासाठी समिती करुन कोणता भाव द्यायचा हे ठरवणार आहोत. सोयाबीनचा हमीभाव दिला जात आहे. मात्र, सोयाबीनचा हमीभाव देऊ त्याशिवाय शेतकऱ्यांना बोनस देऊ, आम्ही 7 हजार रुपये क्विंटल निश्चित करुन त्याचा फरक शेतकऱ्यांना देण्याचा निर्धार आहे.

मल्लिकार्जुन खरगे यांनी आमच्या सरकारनं जी आश्वासनं दिली होती ती पूर्ण केली आहेत असं म्हटलं.नरेगाचं आश्वासन, अन्न सुरक्षेचं आश्वासन, आरोग्य मिशनचं आश्वासन पूर्ण केलं, असं खर्गेंनी म्हटलं. 

शेतकऱ्यांचं 3 लाखांपर्यंतचं कर्ज माफ करणार : राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत झुम कॉलद्वारे संवाद साधला होता.  राहुल गांधी यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याचं म्हटलं.  आमचं सरकार आल्यानंतर आम्ही सोयाबीन दराबाबत मार्ग काढू असं म्हटलं होतं. याशिवाय त्यांना शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करणार असल्याचं म्हटलं होतं. 

दरम्यान, महायुती सरकारनं राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5 हजार रुपये 2023 च्या खरीप हंगामातील विक्रीसाठी दिले होते.  राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सोयाबीन दराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.  

इतर बातम्या :

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
Embed widget