एक्स्प्लोर

GT vs KKR : शार्दुल ठाकूरपासून डेव्हिड मिलर, 'या' 5 खेळाडूंवर असेल सर्वांचं लक्ष

IPL 2023 : आज IPL 2023 मध्ये गुजरात (GT) आणि कोलकाता (KKR) यांच्यात सामना होणार आहे. आजचा सामना अतिशय रोमांचक होणार आहे.

IPL 2023 GT vs KKR : इंडियन प्रीमियर लीग 2023 (Indian Premier League) मध्ये आज तेरावा सामना गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आणि कोलकाता नाईट राइडर्स (Kolkta Knight Riders) यांच्यात रणसंग्राम (KKR vs GT) पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) होणार आहे. आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये गुजरात टायटन्सचा (GT) संघाने आतापर्यंत आयपीएल 2023 मध्ये वर्चस्व कायम राखलं आहे. यंदाच्या हंगामात गुजरातने दोन सामने खेळले असून दोन्ही सामने जिंकले आहेत. तसेच पंजाब किंग्सविरुद्धचा (PBKS) सलामीचा सामना गमावल्यानंतर केकेआरचा (KKR) संघ दुसऱ्या सामन्यात आरसीबीला (RCB) पराभूत करण्यात यशस्वी ठरला. या दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दोन्ही संघात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांच्यामुळे सामन्याला रोमांचक वळण लागू शकतात. हे खेळाडू कोणते ते जाणून घ्या.

Shardul Thakur : शार्दुल ठाकूर

गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात शार्दुल ठाकूर महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. सध्या लॉर्ड उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. 6 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात शार्दुलने अवघ्या 29 चेंडूत 68 धावांची तुफानी खेळी खेळली होती. याशिवाय त्याने चांगली गोलंदाजी करताना एक विकेटही घेतला. त्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे कोलकाता संघ आरसीबीचा पराभव करण्यात यशस्वी ठरला.

Shubman Gill : शुभमन गिल

केकेआरविरुद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा फलंदाज शुभमन गिलचे पारडं जड ठरू शकते. 2022 मध्ये गुजरात टायटन्समध्ये सामील होण्यापूर्वी शुभमनने अनेक वर्षे आयपीएलमध्ये कोलकाताचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्याला केकेआरच्या गोलंदाजांचा चांगला अनुभव आहे. शुभमन गिल आयपीएल 2023 मध्ये चांगल्या फॉर्ममध्ये दिसला आहे. त्यानं यंदाच्या आयपीएलच्या 16 व्या मोसमात अर्धशतकही ठोकलं आहे.

David Miller : डेव्हिड मिलर

डेव्हिड मिलर हा गुजरात टायटन्सचा मधल्या फळीतील महत्त्वाचा फलंदाज आहे. मिलर हार्ड हिटर आहे. आयपीएल 2022 मध्ये त्याने आपल्या संघासाठी अनेक वेळा चांगली खेळी केली आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यातही तो दमदार फलंदाजी करू शकतो. त्यामुळे सर्वांच्या नजरा 'किलर मिलर' डेव्हिड मिलरवर असतील.

Andre Russell : आंद्रे रसेल

आंद्रे रसेलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खातंही उघडता आलं नाही. आंद्रेला पहिल्याच बॉलवर करण शर्मानं गोल्डन डकवर बाद केलं. पण गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात त्याला दमदार पुनरागमन करण्याची संधी आहे. असे झाल्यास रसेल गुजरातच्या गोलंदाजांसाठी सर्वात मोठं आव्हान ठरेल आहे. सर्वाधिक धोका मोहम्मद शमीला आहे. कारण शमीविरुद्ध रसेलचा स्ट्राईक रेट खूप चांगला आहे.

Rashid Khan : राशिद खान

गुजरात टायटन्सचा गोलंदाज राशिद खान कोलकाता नाईट रायडर्सला अडचणीत आणू शकतो. गेल्या मोसमात राशिद खानने दमदार कामगिरी केली होता. रशीद यंदाच्या मोसमातही धमाकेदार गोलंदाजी करताना दिसत आहे. राशिदने आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत पाच विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान 31 धावांत तीन बळी घेतं त्याने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. केकेआरचा फलंदाज आंद्रे रसेलसाठी राशिद खान हा सर्वात मोठा धोका आहे. राशिदने रसेल 4 वेळा बाद केलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमीTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP MajhaManoj jarange Patil On Maratha : 13 तारखेपर्यंत थांबा! मराठा समाज बघतोय कोण येतं? कोण नाही? - पाटीलABP Majha Headlines : 12 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Kolhapur Viral Video : कोल्हापुरात रस्त्यावर यू टर्न घेणाऱ्या रिक्षाचा विचित्र अपघात, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद
Video : कोल्हापुरात रस्त्यावर यू टर्न घेणाऱ्या रिक्षाचा विचित्र अपघात, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद
लक्ष्मण हाकेंचा बीपी वाढला, प्रकृती खालावली, उपोषणाचा आज चौथा दिवस
लक्ष्मण हाकेंचा बीपी वाढला, प्रकृती खालावली, उपोषणाचा आज चौथा दिवस
Embed widget