GT vs KKR Playing 11 : गुजरात आयपीएलमध्ये वर्चस्व कायम राखणार? कोलकाता विरोधात हे 11 खेळाडू मैदानात; अहमदाबादच्या खेळपट्टीबाबत जाणून घ्या...
KKR vs GT, Pitch Report : इंडियन प्रीमियर लीग 2023 मधील 9 एप्रिल रोजी केकेआर विरुद्ध गुजरात संघ असा सामना पाहायला मिळणार आहे.
Kolkata Knight Riders vs Gujarat Titans : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात सामना रंगणार आहे. गुजरातच्या घरच्या मैदानावर म्हणजे अहमदाबादमध्ये हा सामना खेळवला जाईल. 9 एप्रिल रोजी, रविवारी इंडियन प्रीमियर लीग 2023 मधील तेरावा सामना (IPL 2023 Match 13 ) पाहायला मिळेल. नरेंद्र मोदी स्टेडिअमवर दुपारी 3.30 वाजता हा सामना पाहायला मिळणार आहे.
GT vs KKR IPL 2023 : केकेआर विरुद्ध गुजरात आमने-सामने
गुजरात टायटन्सने आयपीएल 2023 मध्ये वर्चस्व कायम ठेवलं आहे. यंदाच्या मोसमातील दोन्ही सामन्यांमध्ये गुजरातने विजयाची मालिका कायम ठेवली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघाने चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्सवर दणदणीत विजय मिळवला आहे. आता कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळताना संघाला आव्हानाचा सामना करावा लागू शकतो. कारण कोलकाताकडे वरुण चक्रवर्ती, सुयश शर्मा, सुनील नारायण यासारखे उत्तम मिस्ट्री स्पिनर्स आहेत.
Narendra Modi Stadium Pitch Report : नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गोलंदाज आणि फलंदाजामध्ये तुल्यबळ समान पाहायला मिळतो. खेळपट्टी गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हींसाठी पूरक आहे. सीमारेषा दूर असल्यामुळे फलंदाजांना षटकार-चौकार मारताना मेहनत घ्यावी लागते. तसेच चौकार षटकाराच्या नादात विकेट जाण्याची शक्यता असते. या मैदानावर एकेरी दुहेरी धावांचे तेवढेच महत्व आहे. या मैदानावर कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतात. प्रथम फलंदाजी करणारा संघ मोठी धावसंख्या उभारु शकतो. या मैदानावर 180 पर्यंत धावांच्या लक्ष्याचा पाठलाग होऊ शकतो. नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक मानली जाते. पण सुरुवातीच्या षटकात येथे वेगवान गोलंदाजांना अधिक मदत मिळते. अचूक टप्प्यावर मारा करणाऱ्या गोलंदाजाला यश मिळतेच.
KKR vs GT Probable Playing XI : दिल्ली विरुद्ध राजस्थान संभाव्य प्लेईंग 11
GT Playing XI : गुजरात संभाव्य प्लेईंग 11
रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुधारसन, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, जोशुआ लिटल, यश दयाल, अल्झारी जोसेफ
KKR Playing XI : कोलकाता संभाव्य प्लेईंग 11
नारायण जगदीसन, रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, शार्दुल ठाकूर, सुनील नारायणन, टीम साऊदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती
IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
GT vs KKR Preview : गुजरात विजयाची मालिका कायम राखणार की कोलकाता स्वप्न धुळीस मिळवणार? जाणून घ्या...