Sai Sudharsan vs Ravindra Jadeja: IPL फायनलचा अनोखा योगायोग, तमिळी साईने चेन्नईला धुतलं, गुजराती जाडेजाने गुजरातला हरवलं!
IPL 2023, CSK vs GT: साई सुदर्शन आणि रवींद्र जाडेजा यांच्यामुळे यावेळच्या आयपीएल फायनलमध्येही एक भन्नाट योगायोग पाहायला मिळाला.
Sai Sudharsan vs Ravindra Jadeja: चाहत्यांचा लाडका थाला म्हणजेच, चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni). धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नईनं आयपीएलच्या (IPL 2023) 16व्या हंगामाचं जेतेपद पटकावलं. 29 मे (सोमवार) रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात सीएसकेनं (CSK) डकवर्थ-लुईस पद्धतीच्या आधारे गतविजेत्या गुजरातचा (GT) धुव्वा उडवला आणि जेतेपदावर नाव कोरलं. या विजयासह आयपीएलचा पाचवा किताब चेन्नईनं आपल्या नावावर केला आहे. IPL चे सर्वाधिक विजेतेपद जिंकण्याच्या बाबतीत मुंबई इंडियन्सची बरोबरी केली आहे.
अंतिम सामन्यात दोन खेळाडूंनी आपल्या परफॉर्मन्सनं सर्वांनाच चकीत केलं. ते दोन खेळाडू म्हणजे, गुजरातचा युवा फलंदाज साई सुदर्शन अन् चेन्नईचा ऑलराउंडर रवींद्र जाडेजा. साई सुदर्शननं 47 चेंडूंत 6 षटकार ठोकले आणि 8 चौकारांच्या मदतीनं 96 धावांची तुफान खेळी खेळली. दुसरीकडे चेन्नईच्या सर जाडेजानं सामन्याच्या शेवटच्या दोन चेंडूंवर एक षटकार, एक चौकार लगावला आणि चेन्नईला विजय मिळवून दिला.
तसं पाहिलं तर साई सुदर्शन आणि रवींद्र जाडेजा यांच्यामुळे यावेळच्या आयपीएल फायनलमध्येही एक भन्नाट योगायोग पाहायला मिळाला. गुजरातचा युवा फलंदाज साई सुदर्शन, पण तो आहे चेन्नईचा रहिवाशी. तर, चेन्नईचा ऑलराउंडर रवींद्र जाडेजा, पण तो मुळचा गुजरातचा. दोन्ही खेळाडूंनी प्रतिस्पर्धी संघांविरोधात कहर केला.
सुदर्शनची आयपीएल सॅलरी TNPL पेक्षाही कमी (Sai Sudharsan)
साई सुदर्शनला IPL 2022 च्या लिलावात गुजरात टायटन्सनं 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेतलं. त्यानंतर त्याला आयपीएल 2023 साठीही कायम ठेवण्यात आलं. डावखुरा फलंदाज साई सुदर्शननं IPL 2023 मध्ये गुजरातसाठी 8 सामन्यांत 51.71 च्या सरासरीनं 362 धावा केल्या, त्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे.
तामिळनाडू प्रीमियर लीग (TNPL) च्या माध्यमातून सुदर्शनने क्रिकेटच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला. TNPL च्या माध्यमातूनच वॉशिंग्टन सुंदर, टी. नटराजन, वरुण चक्रवर्ती यांना प्रसिद्धी मिळाली. नंतर या सर्व खेळाडूंनी भारताचं प्रतिनिधित्व केलं. आश्चर्याची बाब म्हणजे, साई सुदर्शनचा TNPL पगार आयपीएलपेक्षा जास्त आहे. TNPL लिलावात सुदर्शनला लायका कोवई किंग्स (Lyca Kovai Kings) नं 21.60 लाख रुपयांना विकत घेतलं.
6️⃣4️⃣4️⃣4️⃣@sais_1509 on song 🔥🔥
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2023
Can he finish on a high for @gujarat_titans? 🤔
Follow the match ▶️ https://t.co/WsYLvLrRhp#TATAIPL | #Final | #CSKvGT pic.twitter.com/z7qL4Dav1w
जाड्डूचा विजयी चौकार, चेन्नईकडे पाचवं जेतेपद (Ravindra Jadeja)
34 वर्षीय रवींद्र जाडेजाबद्दल बोलायचं झालं तर तो आयपीएल 2012 पासून चेन्नई सुपर किंग्जसोबत आहे. चेन्नईसोबतच्या प्रवासात जाडेजानं अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. जाडेजानं CSK सोबत तीन आयपीएल खिताबही जिंकले आहेत. एवढंच नाहीतर ऑलराउंडर म्हणून आपली ओळख निर्माण करण्यात जाडेजाला चेन्नईची मोठी साथ मिळाली. आयपीएल 2023 साठी, रवींद्र जाडेजाला फ्रँचायझीनं 16 कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं होतं.
गेल्या मोसमात रवींद्र जाडेजाची कामगिरी खूपच निराशाजनक होती, पण आयपीएल 2023 मध्ये जाडेजानं फलंदाजी आणि गोलंदाजी करताना धमाकेदार फटकेबाजी केली. जाडेजानं 16 सामन्यांत 23.75 च्या सरासरीनं 190 धावा केल्या. त्याचबरोबर गोलंदाजीतही त्याची कामगिरी चांगलीच होती. जाडेजानं 7.56 च्या इकॉनॉमी रेट आणि 21.55 च्या सरासरीनं 20 विकेट्स घेतल्या. तुषार देशपांडे (21) नंतर जाडेजा सीएसकेसाठी या मोसमात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.
𝗗𝗢 𝗡𝗢𝗧 𝗠𝗜𝗦𝗦!
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2023
Two shots of excellence and composure!
Finishing in style, the Ravindra Jadeja way 🙌#TATAIPL | #Final | #CSKvGT pic.twitter.com/EbJPBGGGFu
सुदर्शनचा फायनल्समध्ये विक्रमांचा पाऊस
फायनल्समध्ये साई सुदर्शनचं शतक हुकलं, पण त्याच्या वेगवान आणि जलद खेळीनं त्यानं अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. IPL फायनलमध्ये 50 किंवा त्याहून अधिक धावा करणारा सुदर्शन हा दुसरा सर्वात तरुण खेळाडू होता. सुदर्शनने वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी धमाकेदार खेळी खेळली. सध्या हा विक्रम मनन वोहराच्या नावावर आहे, ज्याने 2014 च्या फायनलमध्ये पंजाबसाठी अर्धशतक झळकावलं होतं. तेव्हा मनन वोहराचं वय अवघं 20 वर्ष होतं.
आयपीएल फायनल्समध्ये 50+ स्कोअर करणारे सर्वात युवा खेळाडू
20 वर्ष, 318 दिवस : मनन वोहरा (PBKS) vs KKR, बंगळुरू, 2014
21 वर्ष, 226 दिवस : साई सुदर्शन (GT) vs CSK, अहमदाबाद, 2023
22 वर्ष, 37 दिवस : शुभमन गिल (KKR) vs CSK, दुबई, 2021
23 वर्ष, 37 दिवस : ऋषभ पंत (DC) vs MI, दुबई, 2020
आईपीएल फाइनल में बेस्ट स्कोअर
117* : शेन वॉट्सन (CSK) vs SRH, मुंबई वानखेडे, 2018
115* : ऋद्धिमान साहा (PBKS) vs KKR, बंगळुरू, 2014
96 : साई सुदर्शन (GT) vs CSK, अहमदाबाद, 2023
95 : मुरली विजय (CSK) vs RCB, चेन्नई, 2011
94 : मनीष पांडे (KKR) vs PBKS, बंगळुरू, 2014