एक्स्प्लोर

चेन्नईची गुणतालिकेत मोठी झेप, हैदराबाद तळाशीच, पाहा तुमचा आवडता संघ कोणत्या स्थानावर?

IPL 2023 Points Table : हैदराबादचा पराभव करत चेन्नईने गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. आठ गुणांसह चेन्नईचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर पोहचलाय.

IPL 2023 Points Table : रविंद्र जाडेजाचा भेदक मारा आणि डेवॉन कॉनवे याचे वादळी अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईने हैदराबदचा सात विकेटने पराभव केला. हैदराबादने दिलेले १३५ धावांचे आव्हान चेन्नईने सात विकेट आणि आठ चेंडू राखून आरामात पार केले. चेन्नईकडून डेवेन कॉनवे याने नाबाद ७७ धावांची खेळी केली. चेन्नईचा हा यंदाच्या आयपीएलमधील चौथा विजय होय... हैदराबादचा पराभव करत चेन्नईने गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. आठ गुणांसह चेन्नईचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर पोहचलाय.  सीएसकेचा नेट रनरेट 0.355 इतका आहे.  

राजस्थान पहिल्या स्थानावर, लखनौ दुसऱ्या क्रमांकावर - 

पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे राजस्थान आणि लखनौ हे संघ आहेत. राजस्थानने सहा सामन्यात चार विजय मिळवले आहेत. राजस्थान, चेन्नई आणि लखनौ या संघाचे प्रत्येकी आठ आठ गुण आहेत. पण राजस्थानचा नेट रनरेट चांगला असल्यामुळे ते पहिल्या स्थानावर आहेत. राजस्थानचा रनरटे 1.043  इतका आहे. गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या लखनौचा रनरेट 0.709 इतका आहे. 

चार संघाचे सहा गुण - 
सध्या गुणतालिकेत चार संघाचे सहा गुण आहेत. यामध्ये गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स या संघाचे सहा गुण आहेत.   पण रनरेटच्या आधारावर गुजरातचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. आरसीबी पाचव्या, मुंबई सहाव्या आणि पंजाब सातव्या स्थानावर आहे.  

अखेरच्या तीन स्थानावर कोण ?
दिल्लीचा संघ तळाशी आहे. दिल्लीला सहा सामन्यात फक्त एक विजय मिळवता आला आहे. दिल्लीचे दोन गुण आहेत. नवव्या क्रमांकावर हैदराबादचा संघ आहे. हैदराबादच्या संघाचे फक्त चार गुण आहेत. आठव्या क्रमांकावर कोलकाता संघ आहे. कोलकात्याचेही चार गुण आहेत. कोलकात्याचा रनरेट हैदराबादपेक्षा चांगला आहे. त्यामुळे कोलकाता आठव्या क्रमांकावर आहे.  

सर्वाधिक धावा कोणाच्या ?
आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस सध्या धावांच्या शर्यतीत पहिल्या स्थानावर आहे. फाफ ने सहा सामन्यात ३४३ धावा चोपल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर दिल्लीचा कर्णधार डेविड वॉर्नर आहे. वॉर्नरने सहा सामन्यात २८५ धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर आरसीबीचा विराट कोहली आहे. किंग कोहलीने सहा सामन्यात २७९ धावा केल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर चेन्नईचे डेवेन कॉनवे आहे. कॉनवेने सहा सामन्यात २५८ धावा केल्यात. पाचव्या स्थानावर जोस बटलर आहे. त्याने सहा सामन्यात २४४ धावा केल्या आहेत. 

गोलंदाजीत सिराजचा बोलबाला - 
गोलंदाजीमध्ये मोहम्मद सिराज याने सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. सिराजने चार सामन्यात 6.7 च्या इकॉनॉमीने १२ विकेट घेतल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर लखनौचा मार्क वूड आहे. त्याने ११ विकेट घेतल्या आहेत. राशिद खान आणि चहल यांनीही प्रत्येकी ११ विकेट घेतल्या आहेत. मोहम्मद शामी आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी दहा दहा विकेट घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Tendulkar on MS Dhoni: धोनीच्या 'त्या' टॅलेंटविषयी विषयी सौरव गांगुलीसोबत बोललेलो, सचिन तेंडुलकरची माहीच्या IPL मधील निवृत्तीवर खास पोस्ट
महेंद्रसिंह धोनीची IPL मधून निवृत्ती, सचिन तेंडुलकरची खास पोस्ट, बांगलादेशातील आठवण शेअर
MS Dhoni Emotional Video After Retirement Of IPL: IPL मधून निवृत्ती घेताच जुन्या फोटोंसह स्वत: व्हिडीओ एडिट केला; MS धोनीच्या पोस्टने सगळ्यांना रडवले
IPL मधून निवृत्ती घेताच जुन्या फोटोंसह स्वत: व्हिडीओ एडिट केला; MS धोनीच्या पोस्टने सगळ्यांना रडवले
RCB Retention List IPL 2027 : गतविजेत्या आरसीबीचा धडाकेबाज निर्णय, सगळेच चक्रावले! फक्त इतक्या खेळाडूंना रिलीज केलं, आता पर्समध्ये किती पैसे उरले? जाणून घ्या A टू Z
गतविजेत्या आरसीबीचा धडाकेबाज निर्णय, सगळेच चक्रावले! फक्त इतक्या खेळाडूंना रिलीज केलं, आता पर्समध्ये किती पैसे उरले? जाणून घ्या A टू Z
Mumbai Indians Retention List IPL 2027 : मुंबई इंडियन्सने एकाच झटक्यात 13 खेळाडूंना केले रिलीज; कर्णधार कोण, लिलावासाठी किती कोटी शिल्लक?, जाणून घ्या A टू Z
मुंबई इंडियन्सने एकाच झटक्यात 13 खेळाडूंना केले रिलीज; कर्णधार कोण, लिलावासाठी किती कोटी शिल्लक?, जाणून घ्या A टू Z

व्हिडीओ

Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Private Hospital new Rule: खासगी रुग्णालयांवर आता सरकारी नियंत्रण येणार, हिवाळी अधिवेशनात मोठ्या निर्णयाची शक्यता, रुग्णांना काय फायदा होणार?
खासगी रुग्णालयांवर आता सरकारी नियंत्रण येणार, हिवाळी अधिवेशनात मोठ्या निर्णयाची शक्यता, रुग्णांना काय फायदा होणार?
Travis Head : ट्रॅविस हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
Maharashtra Live blog updates: 35 वर्षांनंतर काश्मीरमध्ये भारतात जन्मलेला एकही दहशतवादी शिल्लक उरलेला नाही: अमित शाह
Maharashtra Live blog updates: 35 वर्षांनंतर काश्मीरमध्ये भारतात जन्मलेला एकही दहशतवादी शिल्लक उरलेला नाही: अमित शाह
PUC Rule Change: केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले, नव्या आणि जुन्या वाहनांसाठी वेगवेगळे नियम, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले,जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
Mumbai Crime: मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्याची प्रमोशनपूर्वी अचानक बदली, महिला सहकाऱ्याकडून पोलीस ठाण्यात फटाके वाजवून सेलिब्रेशन, नेमकं काय घडलं?
मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्याची प्रमोशनपूर्वी अचानक बदली, महिला सहकाऱ्याकडून फटाके वाजवून सेलिब्रेशन, नेमकं काय घडलं?
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
Embed widget