एक्स्प्लोर

CSK vs GT Pitch Report: फलंदाजीसाठी पोषक की गोलंदाज ठरणार घातक, कशी आहे अहमदाबादची खेळपट्टी?

IPL 2023 : गतविजेता गुजरात आणि चेन्नई यांच्यामध्ये आयपीएल 2023 चा पहिला सामना रंगणार आहे.

IPL 2023 : गतविजेता गुजरात आणि चेन्नई यांच्यामध्ये आयपीएल 2023 चा पहिला सामना रंगणार आहे. शुक्रवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हार्दिक पांड्या आणि धोनी यांच्यामध्ये लढत होणार आहे. दोन्ही संघातील हा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. दोन्ही संघ विजयाने सुरुवात करण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. गतवर्षी झालेल्या दोन्ही सामन्यात गुजरात संघाने बाजी मारली होती, त्यामुळे हार्दिकच्या टोळी वरचढ असल्याचे दिसतेय. पण धोनी पलटवार करण्यात माहिर आहे. त्यामुळे सामना रंगतदार होणार यात शंका नाही. त्यापूर्वी आपण नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी कशी असेल, वातावरण कसे असेल... तसेच प्लेईंग 11 बद्दल जाणून घेऊयात.. 

GT vs CSK : पिच रिपोर्ट  

धोनीच्या नेतृत्वात चेन्नईचा संघ मैदानात उतरणार आहे तर हार्दिक पांड्या गुजरात संघाचे नेतृत्व करत आहे. दोन्ही संघातील सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. दोन्ही संघाकडे अनेक दर्जेदार खेळाडूंचा भरणा आहे.अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गोलंदाज आणि फलंदाजामध्ये तुल्यबळ सामना पाहायला मिळतो. खेळपट्टी गोलंदाजी आणि फलंदाजीसाठी पूरक आहे. सीमारेषा दूर असल्यामुळे फलंदाजांना षटकार-चौकार मारताना मेहनत घ्यावी लागते. तसेच चौकार षटकाराच्या नादात विकेट जाण्याची शक्यता असते. या मैदानावर एकेरी दुहेरी धावांचे तेवढेच महत्व आहे. या मैदानावर कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतात.. प्रथम फलंदाजी करणारा संघ मोठी धावसंख्या उभारु शकतो.. या मैदानावर 180 पर्यंत धावांच्या लक्षाचा पाठलाग होऊ शकतो.  नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक मानली जाते... पण सुरुवातीच्या षटकात येथे वेगवान गोलंदाजांना अधिक मदत मिळते. अचूक टप्प्यावर मारा करणाऱ्या गोलंदाजाला यश मिळतेच. 

गुजरात टायटन्स- चेन्नई सुपर किंग्स हेड टू हेड

गुजरात संघाचे आयपीएलमधील दुसरे वर्ष आहे. पहिल्याच वर्षी गुजरात संघाने जेतेपदाला गवसणी घातली होती. 2022 मध्ये पदार्पणातच गुजरात संघाने आयपीएलवर नाव कोरले. गेल्यावर्षी गुजरात आणि चेन्नई यांच्यात दोन सामने रंगले होते. दोन्ही सामन्यात गुजरात संघाने बाजी मारली होती. पहिल्या सामन्यात तीन तर दुसऱ्या सामन्यात सात विकेटने गुजरातने चेन्नईचा पराभव केला होता. 

आयपीएल 2023 साठी चेन्नई सुपर किंग्सचे संपूर्ण  स्क्वाड -

एमएस धोनी (कर्णधार), डेवोन कॉन्वे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, सुभ्रांशु सेनापति, मोइन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिशेल सँटनर, रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मथीशा पथिराना, सिमर देशपांडे, दीपक चाहर, प्रशांत सोळंकी, 

आयपीएल 2023 साठी गुजरात टायटन्सचे संपूर्ण स्क्वाड

हार्दिक पंड्या(कर्णधार), राशिद खान, राहुल तेवतिया, शुभमन गिल, मोहम्मद शमी, शिवम मावी, जोशुआ लिटिल, यश दयाल, डेविड मिलर, आर साई किशोर, अभिनव सदरंगानी, अल्जारी जोसेफ, मॅथ्यू वेड, केन विलियमसन, रिद्धिमान साहा, जयंत यादव , विजय शंकर, केएस भरत, ओडियन स्मिथ, मोहित शर्मा, नूर अहमद, उर्विल पटेल, प्रदीप सांगवान, दर्शन नालकंडे, साई सुदर्शन  

आणखी वाचा : 

GT vs CSK 1st Match : धोनी vs पांड्या, IPL 2023 च्या पहिल्या सामन्यात हे पाच खेळाडू ठरतील गेम चेंजर 

आरसीबीला डबल धक्का! मॅक्सवेल-हेजलवूडच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह

इम्पॅक्ट प्लेअरचा इम्पॅक्ट पडणार, यंदाच्या आयपीएलमध्ये नवे नियम, जाणून घ्या सविस्तर 

IPL 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा पराभव करणं सोपं नाही; पाहा ताकद आणि कमजोरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी फालतू भीका मागत नाही; माहीममधून पुत्र अमितसाठी राजगर्जना, ठाकरेंनी दोघांनाही झोडलं, सदा सरवणकरही लक्ष्य
मी फालतू भीका मागत नाही; माहीममधून पुत्र अमितसाठी राजगर्जना, ठाकरेंनी दोघांनाही झोडलं, सदा सरवणकरही लक्ष्य
Maharashtra Assembly Election : मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
Baba Siddiqui Murder Case : मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर, शूटर शिवकुमारला उत्तर प्रदेशमध्ये अटक
मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर, शूटर शिवकुमारला उत्तर प्रदेशमध्ये अटक
IANS and Matrize Opinion Poll : राज्यात कोणाची सत्ती, महायुतीला मराठवाड्यात फटका; IANS चं सर्वेक्षण, निकालाचा A टू Z अंदाज
राज्यात कोणाची सत्ती, महायुतीला मराठवाड्यात फटका; IANS चं सर्वेक्षण, निकालाचा A टू Z अंदाज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Balasaheb Thorat Majha Katta| देशमुखांच्या वक्तव्यानंतर बाळासाहेब थोरात, जयश्री थोरात माझा कट्टावरRaj Thackeray Full Speech Prabhadevi:लेकासाठी बापाचं पहिलं भाषण;राज ठाकरेंनी धू धू धुतलं : ABP MajhaAvadiche Khane Ani Rajkiya Tane Bane : सना मलिकांना उमेदवारी कशी मिळाली? Nawab Malik ExclusiveYogendra Yadav Vastav EP 103|भाजप विरोधी पक्षांना सामाजिक चळवळींचे स्वरूप येण्याची गरज-योगेंद्र यादव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी फालतू भीका मागत नाही; माहीममधून पुत्र अमितसाठी राजगर्जना, ठाकरेंनी दोघांनाही झोडलं, सदा सरवणकरही लक्ष्य
मी फालतू भीका मागत नाही; माहीममधून पुत्र अमितसाठी राजगर्जना, ठाकरेंनी दोघांनाही झोडलं, सदा सरवणकरही लक्ष्य
Maharashtra Assembly Election : मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
Baba Siddiqui Murder Case : मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर, शूटर शिवकुमारला उत्तर प्रदेशमध्ये अटक
मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर, शूटर शिवकुमारला उत्तर प्रदेशमध्ये अटक
IANS and Matrize Opinion Poll : राज्यात कोणाची सत्ती, महायुतीला मराठवाड्यात फटका; IANS चं सर्वेक्षण, निकालाचा A टू Z अंदाज
राज्यात कोणाची सत्ती, महायुतीला मराठवाड्यात फटका; IANS चं सर्वेक्षण, निकालाचा A टू Z अंदाज
Video : राहुल गांधी तुम्हाला *त्या बनवत आहेत; प्रकाश आंबेडकरांचा पहिल्याच सभेतून राहुल गांधींवर हल्लाबोल
Video : राहुल गांधी तुम्हाला *त्या बनवत आहेत; प्रकाश आंबेडकरांचा पहिल्याच सभेतून राहुल गांधींवर हल्लाबोल
Mahendra Thorave : अपक्ष उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला आमदार महेंद्र थोरवेंची धमकी, निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
अपक्ष उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला महेंद्र थोरवेंची धमकी, निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांची झाडाझडती; 1 कोटी 30 लाखांची रोकड अन् व्हॅन जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांची झाडाझडती; 1 कोटी 30 लाखांची रोकड अन् व्हॅन जप्त
विधानसभेची खडाजंगी: आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत, महायुतीत मैत्रीपूर्ण, तर बंडखोर धोंडेंचाही अपक्ष अर्ज; कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी: आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत, महायुतीत मैत्रीपूर्ण, तर बंडखोर धोंडेंचाही अपक्ष अर्ज; कोण मारणार बाजी?
Embed widget